गंधित कोपरा....
एक बरीच चित्रं असलेली पोस्ट सध्या फिरते आहे. ती पाहून कळेलच की एकाच घरातली सगळी माणसं जेवायच्या टेबलावर पण फोन हातात सगळ्यांच्या... नवरा बायको बरोबर पण हातात फोन... मुलांच्याही हातात फोन...
माझ्या कामानिमित्त मला फोन उपयोगी पडतो कारण मला त्यावर सहज विकीपीडिया संपादन करता येते, लेख लिहीता येतात, अभ्यासाची पुस्तकं वाचता येतात आणि इतरांची व्याख्यानंही ऐकायला मिळतात... त्यामुळे त्याचा वापर आपण कसा करतो याचाही विचार महत्वाचा ठरू लागला आहे.
मी पुण्याहून गोव्याला गेले होते दोन वर्षांपूर्वी. विकीचाच एक उपक्रम होता. चेक इन केल्यावर मी वेटींग लाऊंजमधे बसले आणि माझ्या सॅकमधलं पुस्तक काढून वाचायला सुरूवात केली. किती वेळ गेला आठवत नाही..एक परदेशी महिला माझ्याजवळ आल्या... पाठीवर हलकेच हात ठेवला... मी दचकलेच...
त्या-Hello
मी Hello
त्या-What are you doing?
मी गोंधळलेली...
त्यांनी माझ्या पुस्तकाकडे बोट दाखवलं..
मी - I am reading...
त्या-keep it up dear...
हसून त्या निघून गेल्या...
मी सभोवती पाहिलं तर...
नवी लग्न झालेली जोडपी जी नववधूच्या हातातल्या चुड्यामुळे लक्षात येत होती, पन्नाशीतल्या मैत्रिणींचा एक घोळका, तरूण मुलं मुली.. कामानिमित्त निघालेली मंडळी... सर्वांचं डोळे फोनमधे आणि बोटं कीपॅडवर नाचणारी...
एकाच व्यक्तीच्या हाती विमानतळावरचा Times of India किंवा तत्सम काही वृत्तपत्र होतं आणि मी पुस्तकात डोकं घातलेली....
Annoncement झाली आणि हीच मंडळी माझ्याच विमानात आहेत हे रांगेतच कळलं!!!
गोव्याला मधुचंद्राला, फिरायला, उनाडायला निघालेली ही मंडळी रांगेतही मोबाईलमधे डोकी घातलेली??!!?
सर्वांची बोटं नाचत होती त्यामुळे chating किंवा खेळ खेळणं सुरु असावं हे कळत होतं. मोबाईलवर अनेक जण गोष्टी वाचतातही पण इथे ते दृश्य नाही हे कळत होत. आतातर हल्ली वाचण्यापेक्षा कथा ऐकायचीही सोय उपलब्ध झाली आहे...
मधे मैत्रिणींशी गप्पा मारताना विषय निघाला तेव्हा मीत्यांना सांगितलं की मधे एक काळ मी उशिरापर्यंत वाचत किंवा लिहीत बसायचे.पण मग नंतर त्याचा त्रास व्हायला लागला.त्यामुळे ठरवून रात्री उशिराचं लेखन वाचन बंद केलं. सध्या अनेकजण उशिरापर्यंत विविध मालिका म्हणजे वेब सीरीज सलग पाहत राहतात...उत्कंठा वाढविणार्या
या मालिका पाहण्यासाठी रात्र रात्र जागलं जातं आहे...संवाद थांबला,झोप कमी... होणारी चिडचिड...जडणारे आजार...आळसावलेली निष्क्रीय दिवसयात नवी पिढी अडकते आहे....
कधी येणार पुस्तक हातात!??? कधी होणार खुला संवाद??! कधी अनुभवणार जग आणि कधी मोकळं होणार मन रक्तामांसाच्या मित्रमैत्रीणींजवळ???? आभासी जगातून कशी घ्यावी सुटका करून?!!
हा खरंतर ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण तरीही लिहावंसं वाटल...
थोडं हाताने लिहूया...फुलांनी घराचा एखादा कोपरा सजवूया...गरम चहा किंवा काॅफीचा घोट घेत खिडकीतून पहात छान आनंद घेऊया वा झूल्यात बसून स्वजनांशी थेट गप्पा मारूया...
स्वतःचा असा एक छान गंधित काॅर्नर तयार करूया... स्वतःसाठी...सर्वांसाठी...