।। कोरोना शिक्षण ।।
कोरोना विषाणू धुमाकूळ घाली । सारेच हैराण जगावरी
कारखाने बंद कामधंदा बंद । घरीच बसली सारे जण
तैसेंच बसली शाळेची ही पोरे । खेळत राहिली घरोघरी
परीक्षा ही नाही अभ्यास ही नाही । पास झाली सारी परीक्षेत
गेला काळ गेला सुरू नाही शाळा । चिंता लावी पोरा अभ्यासाचा
मोबाईल शाळा पोरे झाली गोळा । भांडून घेतली खेळासाठी
काही होत नाही यंदा शाळा नाही । मागे पडेल का शिक्षणात
हे विचार नको आणूया मनात । मिळेल शिक्षण घरोघरी