।। जीवनकथा ।।
प्रत्येक जीवनाची कथा, न संपणारी आहे व्यथा
जन्मल्यापासून मरेपर्यंत, चालूच असते रडकथा
सुखामध्ये हुरळू नको, दुःखात बसू नको रडत
जीवनाचे सार हे सांगते, तुकारामांची अभंगगाथा
गरिबांना साहाय्य करावे, अनाथांना द्यावी मदत
वडिलांचे आशीर्वाद घ्यावे, टेकवूनी चरणावर माथा
समाजात किती आहे पत, हे संस्कारावरून कळते
जसे उंच हिमालयाला त्याचा आधार असतो पायथा
- नासा येवतीकर, 9423625769