#पाऊल
हे माय भु ..
तव चरणी स्व ची जाणिव होता
तव चरणी मग झुकतो माथा
तव चरणी मिळतो मजला धीर
तव चरणी होते मन अधीर
तव चरणी शब्द होती फिके
तन चरणी काव्य झाले मुके
तव चरणी उन्माद उफाळे
तव चरणी मन हे मोकळे
तव चरणी लागे नवी चाहुल
तव चरणी माझे पहिले पाऊल
तव साठी माझे जीवन राऊळ
तव मुळे मिळाले पहिले पाऊल..
-संदिप चव्हाण.