The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
#हिम्मत "कर अशी हिम्मत रे तरच जगात किंमत रे नाही कुठले दुमत रे सर्व श्रेष्ठ हिम्मत रे ".. -संदिप चव्हाण .
#सावधान "शत्रुच्या प्रत्येक हालचालीकडे अवधान आहे , माझा सैैनिक सिमेवरती कधीचाच सावधान आहे सेवा करतो माय भुमीची म्हणुनच, प्रत्येक घरात अनं घरातील प्रत्येकाच्या मनात समाधान आहे " ....आम्हाला आमच्या प्रत्येक सैनिकाचा अभिमान आहे.. -संदिप चव्हाण.
#अडथळा "मी काय काय करु शकतो , यात सगळ्यात मोठा अडथळा ,मी करु शकतो का? हाच असतो." ..'विचारावर आचाराची परिसिमा आधारलेली असते ती अशी.....'
#बंडखोर आहेच मी बंडखोर तु केलेल्या अन्यायाचा आहेच मी बंडखोर तु दिलेल्या त्रासाचा आहेच मी बंडखोर मानवा मी सहन केले़ल्या मानसिकतेचाही ... *बंडखोरी ही ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर,सहनशक्तीवर अवलंबुन असते*.... -संदिप चव्हाण.
#शोभेच्या "सगळ्या गोष्टी अवगत असतानाही फक्त शोभेच्या वस्तु बनुन राहणे कितपत योग्य आहे .. म्हणुन आपल़्या ठायी जे जे काही आहे त्याचा पुरेपुर वापर होणे योग्यच.. कलासिद्धी असणे हा त्यातीलच एक भाग.. दुसर्याला आनंद हेही मोठे काम आहे.... *अवलिया चित्रकार बाबूराव पेंटर यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन.. (3जुन) -संदिप चव्हाण.
#न्याय गनिमाविरुद्ध न्याय केला माझ्या शिवाजी राजांनी रयतेला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले माझ्या शिवाजी राजांनी समोर चाललेला छळ सहन करणे हाही गुन्हाच न्यायाने लढायला शिकविले माझ्या शिवाजी राजांनी कल्याणच्या सुभेदाराची सुन आईसमान मानी एका स्त्रीला खरा न्याय दिला माझ्या शिवाजी राजांनी राज्य करणारे अनेक राजे न्यायी कमी जास्त राजकारणी रयतेला खरा न्याय दिला माझ्या शिवाजी राजांनी... कुणाचीही केली नाही गय म्हणुनच तर मिळाला रयतेला न्याय होऊ दिला नाही अन्याय म्हणुनच आमुच्या दिलात वसतात शिवराय... -संदिप चव्हाण.
#फक्त .. आयुष्याच्या गणितात असते नात्यांची ल-सा-वी अन म-सा-वी अवघड अशा या परीक्षेत सोबत 'फक्त' तु असावी .. प्रश्नांची लांबच लांब रांंग त्याहुनही ज्यादा उत्तरे सुचावी ही गोष्ट शक्य आहे तेव्हा जेव्हा सोबत 'फक्त' तुच असावी .... -संदिप चव्हाण.
परिचय... कितीतरी युगे पालटतात भेट त्याची व्हायला, ओळख असुन चालत नाही परम शक्तीचा 'परिचय' झाला पाहीजे... ओळख शिघ्र विसरली जाते परंतु 'परिचय' कायमचा स्मरणात राहतो... -संदिप चव्हाण.
#शिकार गल्लीच्या कोपर्यातुन पाठमोरी झालीस तु लख्ख तुझ्या डोळ्यानी माझी शिकार केलीस तु तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचे खुप प्रयत्न केलेत रोज कितीतरी आशिक वेड्यागत घायाळ झालेत पहिल्या नजरेतच माझी झालीस तु कधी कळालच नाही की लख्ख तुझ्या डोळ्यानी माझीही शिकार केलीस तु.... -संदिप चव्हाण.
#ऐकले गायले ते ऐकणे नव्हते भाग्य माझे ऐकण्याचे दुःख तेव्हा नव्हते एवढे ताजे बोल होते माझे परी बोलणे नव्हते माझे त्याने बोलायाला लावले तुम्ही तेवढे ऐकले अंतरात होते शब्द परंतु मी तेवढा निशब्द गात होतो बेधुंद मी गायक झालो अंध.... -संदिप चव्हाण.
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser