माणसापेक्षा दगड जपली जातात येथे..
खरंतर अंधश्रद्धेने पुजले जातात येथे...
ठेवती जिवंतपणे उपाशी माय-बाप आस....
पंचपक्वान वर्ष श्रद्धा मध्ये वाढले जातात येथे....
आधुनिक जगात तंत्रज्ञान सिद्ध युगाच्या
उद्घाटनाला नारळ वाढविले जातात येथे....
विसरून शास्त्र आधुनिक विज्ञान वाटा...
रूढी परंपरा प्रमाण मानले जातात येथे....
चाललोय जरी आपण मंगळावरील
घेऊनी मंगळ यान....
उतारे धुपारे आजही केले जातात येथे....