आठवणी असतात फुलासारख्या,
मनाला दरवळणाऱ्या आणि
ताजेपणा ही देणाऱ्या
आठवणी असतात झाडासारखे,
सावली देणाऱ्या आणि
श्वासही देणाऱ्या
आठवणी असतात पाण्यासारख्या
थंडावा देणाऱ्या आणि
प्रवाहित करणाऱ्या
आठवणी असतात सूर्य देवा सारख्या
मनाला चटका देणाऱ्या आणि
ऊबही देणाऱ्या
आठवणी असतात वायू सारख्या,
मनाला घुसमटून टाकणाऱ्या आणि,
आल्लाहाद देणाऱ्या
आठवणी असतात मेघा सारख्या,
दाटून येणाऱ्या आणि पावसाने चिंब करणाऱ्या