###Good afternoon
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
।। रामकृष्ण परमहंस ।।
अनमोल बोध
एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . "
रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय करणार ? "
त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . "
परमहंसांनी विचारले , " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? "
तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या .
रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या .
त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. "
तात्पर्य : नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते . " कागद अनेक असतात पण पाचशे रुपयाच्या नोटेवर गव्हर्नरची सही असते . म्हणून त्या कागदाला महान मूल्य प्राप्त होते .
**** **** ****