? || दिन विशेष || ?
###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" श्री स्वामी समर्थ रामदास "
-------------------------------------
?
? *दिन विशेष*
*।। दास-वाणी ।।*
*उपमे द्यावा सागर ।*
*तरी तो अत्यंतचि क्षार ।*
*अथवा म्हणों क्षीरसागर ।*
*तरी तो नासेल कल्पांतीं ।।*
*उपमे द्यावा जरी मेरू।*
*तरी तो जड पाषाण कठोरू।*
*तैसा नव्हे की सद् गुरू।*
*कोमळ दिनाचा ।।*
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०१/०४/१७-१८
श्रीगुरूची विशालता महासागरासारखी आहे, असे म्हटले तरी ते योग्य नाही कारण तो चवीला अत्यंत खारट असतो. गुरूवाणी ही मधुर अमृत असते सप्तसागरामधील दुधाच्या समुद्राची उपमाही सद् गुरूना थिटी पडते कारण क्षीरसागराला सुद्धा कल्पांती नाश आहेच, परंतु गुरूतत्व अविनाश आहे.
मेरू पर्वत प्रचंड महाकाय आहे. तो पृथ्वीचा कणा आहे. परंतु तो देखील जड म्हणजे अचेतन आहे. पाषाण म्हणजे दगडी आहे. कठोर म्हणजे अत्यंत टणकही आहे. सद्गुरू तर अत्यंत कोमल ह्रदयी मवाळ अन् दयाळू असतात.
*दिनाचा दयाळू मनाचा मवाळू ।*
*स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू ।*
हे सद् गुरूचे स्वरूप असल्याने मेरू पर्वतही त्यांच्याशी तूलनेला फिकाच पडेल. अशा या श्रेष्ठतम त्रिकालाबाधित गुरूतत्वाला
माझे ग्रंथारंभीच वंदन !
*!! जय जय रघुवीर समर्थ !!*
?