#####Good evening !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" संत ज्ञानदेव माऊली विचार "
सगळ्यात एकच परमात्मा दिसतो म्हणजे काय ?
------------------------------------------------------------
सोन्याचा अलंकार घडवला तरी सोने हे सोनेच असते. त्याला उणेपणा येत नाही. सर्वसामान्यांना दागिना दिसतो, पण जाणत्या सुवर्णकाराला सोनंच दिसतं. एखाद्या चकाकत्या दागिन्यालाही सर्वसामान्य माणूस सोन्याचा अलंकार मानण्याची चूक करू शकतो, पण जो जाणता सुवर्णकार आहे त्याला लगेच त्यातला खरे-खोटेपणा कळतो. म्हणजेच नाम-रूप, आकार हे सुरूप असोत की कुरूप, अस्सल असोत की नकली, सर्वामध्ये असलेला चैतन्य शक्तीचा अर्थात अस्तित्वाचा आधार केवळ या भक्ताला उमगतो.
ज्ञानेश्वर माउली म्हणतात, " समुद्रात काय तरंगांच्या खाणी असतात का ? पण वाऱ्याच्या बळानं ते उत्पन्न होतात . अगदी त्याचप्रमाणे हे समस्त जगत जरी परमात्ममयच असलं, तरी विकारांच्या वाऱ्यांनी ‘मी’ची वेगळी लाट निर्माण होते, स्वत:ची सत्ता जोपासण्याच्या ऊर्मीनं उंचच उंच उसळते, पण अखेरीस पाण्यातच लय पावते. अखेरीस एक पाणीच पाणी उरतं. तसं हे जग निर्माण होतं, ‘मी’च्या भ्रामक सत्तेनं स्वतंत्र अस्तित्व जोपासू पाहतं, पण अखेरीस एकाच चैतन्य शक्तीत लयही पावतं. "
-------- *** -------- *** -------- *** --------