####Goodevening !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*प्रात: वन्दन*
---------------------
परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी शुद्ध प्रेमाची गरज आहे. ज्ञानादिकांचे महत्त्व तितके नाही. शब्दज्ञानाची काहीच ग. वेदांताचे सिद्धांत निरर्थक नाहीत पण त्यांचा अनुभव साधकाला भक्ती व प्रेमावाचून येऊ शकत नाही. सर्व साधने आणि साधना यांचे फळ आहे भगवंत प्रेम. ज्या साधनेने प्रभुप्रेम जागत नाही, ती साधना निरर्थक होय. प्रभूला प्रसन्न करण्याची दोन साधने आहेत. सेवा आणि स्मरण. सेवा व पूजा यात भेद आहे. जिच्यात प्रेमाचे प्राधान्य असते ती सेवा होय. जिच्यात वेदमंत्राचे प्राधान्य असते ती पूजा होय. त्यामुळे पूजा करायची तर प्रेमाने करा. प्रेमाविना केलेले समर्पण व्यर्थ जाईल. कपडे खराब होतील या भीतीने आपण मंदिरात साष्टांग दंडवतही घालत नाही; अशांना प्रभुप्रेम कसे लाभणार? सेवापूजेत मुख्य प्रेम असते. धन नव्हे. मन प्रधान असते. स्नेह हेच मुख्य पूजाद्रव्य होय. तुलसीदासांच्या एका कथासंग्रहात पद्मनाभदासांची कथा आहे. ते गरीब होते. ते देवाला चण्याच्या छिलक्यांचा नैवेद्य दाखवीत असत, देवाला तेच मिष्टान्न वाटत असे. देव कोण काय देतो हे पाहत नसतो, कोणत्या भावनेने देतो, हे तो पाहतो. प्रेमभावे मूर्तीची पूजा करताना देखील उपास्यामधे आपले मन संलग्न करणे म्हणजेच सेवा होय. तुम्ही आपल्या शरीरावर जसे प्रेम करता, तसेच देवाच्या मूर्तीवरही करा! जोवर मूर्तीत भगवद्भाव जागणार नाही, तोवर प्रत्येक गोष्टीत ईश्वर पाहता येणार नाही. असे प्रेममय सेवा-स्मरण जो करील त्याचे अंतःकरण पवित्र होऊन तिथेच परमेश्वर प्रत्यक्ष वास करतील.
??।।राम कृष्ण हरी।।??