###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
+++ श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर नेवासे , अ.नगर. +++
????????
????????
*_ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसचा खांब होय._*
*_त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे म्हणतात._*
*_'पैसचा खांब' अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे._*
*_ते स्थळ नेवासे गावाच्या पश्चिमेला आहे. ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' त्या खांबाला टेकून बसून लिहिली असे समजतात._*
*_ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन ‘त्रिभूवनैक पवित्र | अनादी पंचक्रोश क्षेत्र | जेथे जगाचे जीवनसूत्र | श्री महालया असे ||’ असे केले आहे._*
*_महादेवाचे मंदिर कालौघात नष्ट झाले, परंतु मंदिरातील तो खांब मात्र त्याचे अस्तित्व टिकवून, त्याचे अलौकिक तेज सांभाळून उभा आहे._*
*_वारकरी पंथातील भाविक त्या खांबामध्ये ज्ञानदेवांचेच अस्तित्व पाहतात. ‘ज्ञानेश्वरी’सारख्या अभिजात ग्रंथनिर्मितीची साक्षात खूण आणि ज्ञानदेवांच्या अलौकिक अस्तित्वाचे प्रतीक म्हणजे पैसचा खांब होय._*
*_पैसच्या खांबावर सुंदर असा शिलालेख कोरलेला आहे._*
*_तो असा -_*
*_‘ओन्नम (कर) विरेश्वराय | पिता महेन यत पूर्व (दत्त) षटकं जगद्गुरो_* |
*_अखंडवर्ती तैलार्य, प्रतिमास सदा हि तत (रूपका) नां षटक संख्या देया अचंद्र सू एकं (यस्वी) करोति दुष्ट: तस्य ( स : ) पूर्वे वर्ज्यत्यथ |_*
*_मंगलमं महाश्री |’ _*
*_पैसच्या खांबांची सध्याची उंची चार फूट पाच इंच व रुंदी सोळा इंच आहे.साधारणपणे, कोणाही माणसाचे डोके त्याच्या वर जाईल इतकीच! तो संदर्भ दुर्गा भागवत यांच्या ‘पैस’ या ललित लेखात लिहिलेला आहे._*
*_तो साधा पाषाणी खांब आहे. तो कोरलेला, कलापूर्ण स्तंभ नाही, निव्वळ टेकू आहे. त्या टेकूचे टेकूपण अद्याप अभंग आहे._*
*_तो खांब, ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे ओथंबा अगर ओळंबा आहे. त्याच्यावर त्यांनी पाठ टेकली आणि सामान्यजन तर त्यांची डळमळीत श्रद्धा त्याच्या आधारानेच उभारू बघतात._*
?????????