####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
@@@ संत अभंग वाणी @@@
? *रामकृष्णहरि माऊली?*
? *अभंग चिंतन?*
*सांगते तुम्हाला वेगळे निघा*
*सांगते तुम्हाला वेगळे निघा !*
*वेगळे निघून संसार बघा !!१!!*
*संसार करिता शिणले बहु !*
*दादल्या विकून आणले गहू !!२!!*
*गव्हाचे दिवशी जेवली मावशी !*
*मजला वेडी म्हणता कैशी !!३!!*
*संसार करता दगदगले मनी !*
*निंदा विक्या चौघीजणी !!४!!*
*एका जनार्दनी संसार केला !*
*काम, क्रोध देशोधडील नेला !!५!!*
???????????
? *निरूपण* ?
???????????
*संत एकनाथांचा हा भारूड या प्रकारातला अभंग आहे. या अभंगात एक संसारी स्त्री आपल्या नवऱ्याला वेगळे बिर्हाड करा, असे सांगत आहे. ती म्हणते, धनी मी तुम्हाला सांगते, तुम्ही वेगळे बिर्हाड करा. वेगळे निघून आपण चांगला संसार करु. या खटल्याच्या घरात काम करून मी भारी जमून गेले आहे. घरातली सारी कामं, त्यात सासू-सासर्यांची भर. जीव अगदी ऊबगुन गेला आहे. संसाराच्या व्यापाने मी शिणुन गेले आहे. दादल्याला विकून मी गहू आणले आहेत. गहु आणल्यावर मावशीला मी जेऊ घातले. मग मला वेडी कशी म्हणता ? संसाराच्या नाना अवधानांनी मला भारी दगदग झाली. मग मी चारी नंदा विकून टाकल्या. मी संसार केला आणि काम, क्रोध हे लांब देशोधडीला गेले.*
*संत एकनाथांनी एका स्त्रीचे संसारचित्र मांडून अध्यात्माचे रूपक केले आहे. या अभंगात स्वार्थी मनोवृत्तीचे प्रतिनिधित्व करणारी एक स्री आहे. सासु-सासरे, नणंदा या या सर्वांना बाजूला ठेवून दोघे नवरा-बायको राजा-राणीसारखे राहु असे ती नवऱ्याला सांगते आहे.*
*संसार काम, क्रोध, मोह, माया, लोभ, मत्सर, आदी विकारांनी भरलेला आहे. सासु-सासरे म्हणजे प्रत्यक्ष मातापिता. पण त्यांना न सांभाळता दूर ठेवा असे म्हणणे हा स्वार्थीपणाचा आणि संकुचितपणाचा कळस आहे. घरच्या गरजा भागवण्यासाठी तिने दादला विकला. इथे दादला म्हणजे अहंकार, स्वार्थ. ती सासु-सासरे नको म्हणते. पण गहु आणून आपल्या मावशीला मात्र जेवु घालते. म्हणजे माहेरचे, सासरचे असा दुजाभाव आला. मंद, मोह, मत्सर आणि लोभ हे चार विकार म्हणजे नंदा विकून टाकल्या. मग संसारातून काम, क्रोध हे विकारही निघून गेले. आता संसारात निर्मळपणा आला.*
*नाथांनी सर्वसामान्य संसारी स्त्रीचे चित्र रेखाटले आहे. आजची सामाजिक स्थिती आहे ती चारशे वर्षांपूर्वी नाथांचे वेळीही होती. मी- माझे या संकुचित क्षेत्रात संसारी स्त्री वावरते. पण विकारांचे पाशा सरले की सारे काही निवळते. संतांना लोकांच्या मानसिकतेची चांगली जाणीव होती. संत हे समाजमनाचे मार्गदर्शक होते. परमार्थाचे तत्त्व सांगता-सांगता संतजनांनी संसारी जनांच्या आयुष्यातील आशा-आकांक्षांचे, सगलोभाचे चित्रण केले आहे. अभंगाच्या शेवटच्या ओळीतील संसार केला याचा अर्थ अध्यात्माचा संसार केला. काम, क्रोध गेल्यावर संसार भक्तीमय झाला, ईश्वरमय झाला. नाथांनी सांगितलेल्या संसाराचे अनुकरण करायचे की नाही, हे ज्याने-त्यांने ठरवायचे आहे.*
*? जय जय रामकृष्ण हरी ?*