###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
# *!! जय हरी विट्ठल !!*
?
आज कमिका एकादशी निमित्य अभंगचींतन..
? *अभंग गाथा* ?
*भाव धरी तया तारील पाषाण ।*
*दुर्जना सज्जन काय करी ।।१||*
*करिता नव्हे नीट श्वानाचे हे पुंस ।*
*खापरा परीस काय करी ।।२||*
*निंबाचिया झाडा साखरेचे आळे ।*
*बीज तैसी फळे येती तया ।।३||*
*तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ ।*
*कठीण हा खळ तयाहुनी ।।४||*
? *भाव निरूपण-*
शुध्द भाव ठेवुन जो पूजा करतो त्याला पाषाणातला देव देखील तारून नेतो.
दुर्जन,हट्टी व दुराग्रही माणसाचे मन वळवणे सज्जनाला कदापिही शक्य नसते,असे तुकाराम महाराज म्हणतात व दृष्टांत देतात की 'कुत्र्याचे वाकडे शेपूट कधीही सरळ करता येणार नाही.खापराला परीस लावला तरीही त्याचे सोने होणार नाही.कडुनिंबाच्या झाडाला साखरेचे आळे घालून काय उपयोग ? त्याचा कडूपणा जाणार नाही, कारण जसे बीज तसेच फळ येते.'
एक वेळ कठिण अशा वज्राचेही तुकडे करता येतील,पण दुर्जन,दुराग्रही,हट्टी माणसाचे हृदय त्यापेक्षा जास्त कठीण आहे.त्याचे परिवर्तन करता येणे अवघड आहे.
*।। रामकृष्ण हरी ।।*
?