####Good evening !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
*_भक्ती गीत_*
*कुणी विठ्ठल म्हणे,कुणी सावळा म्हणे*
कुणी पांडुरंग,कुणी कानडा
कुणी माधव म्हणे,कुणी मुरली मनोहर
घनश्याम ब्रिज गोपाळा
कोणते रे नाव तुझे कोणते रे गाव, ?
तुझी सारी उठाठेव आम्हा नसते रे ठाव,
विठ्ठला पांडुरंगा कानड्या श्रीरंगा,………….!! धृ !! `1
तुझ्या कपाळी बुक्या सम आभाळ भरुनी यावं,
थेंब, थेंब मायेन त्या भक्तीरूप ओले व्हावं
तुझ्या चरणी वाहण्या तुळशी परी रुजावं
मातीच्या कणा, कणाला ओल्या अंकुराची हाव
विठ्ठला पांडुरंगा कानडया श्रीरंगा………….!!1!!
?☘?☘?☘?☘?☘