*** साधिली त्रिपुटी ***
प्रस्तुतीः मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
श्रीविठ्ठल
कर्ता,कर्म व क्रिया ही कर्माची त्रिपुटी असते.
ध्याता,ध्यान व ध्येय ही ध्यानाची त्रिपुटी असते.
ज्ञाता,ज्ञान व ज्ञेय ही ज्ञानाची त्रिपुटी असते.
कर्म,ध्यान व ज्ञान हा सर्व त्रिपुटीने होणारा व्यवहार आहे.
परंतु
साधक या उच्च अवस्थेला पोहचल्यावर त्रिपुटीच राहात नाही तर भेद कुठला राहणार?
पारमार्थीक जीवनाच्या वाटचालीत या तिन्ही त्रिपुट्या मावळल्या पाहिजे.
संसारी माणसाचे मागे त्रिपुटीने व्यवहार होत असल्यामुळे भय आहे व त्यामुळे दुःख आहे.
परंतु
पारमार्थिकाला भय नाही म्हणून दुःखही नाही.
अर्थात
निर्भय असणे म्हणजे सुख.
संसारी जीवन जगत असताना
आपल्या मुखावाटे भगवंताच नाम घेऊन ध्यान करत करत, देवाला वृतीत आणून, ज्ञानाने सर्वाभुती वासुदेवालाच बघण हिच भागवत धर्माची गुरुकिल्ली आहे.
जगदगुरू तुकाराम महाराज म्हणतात.
*"साधिली त्रिपुटी|दिप उजळीला घटी||"*
*!! रामकृष्ण हरी !!*
?