### Good morninh #%$ मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" अहंपणाचे दिवे "
*?वारकरी पुष्प*?
*एक माणूस रात्री आपल्या झोपडीत बसून एक छोटासा दिवा लावून शास्राचा अभ्यास करत होता. बराच वेळ झाला होता म्हणून त्याने फुंकर मारून दिवा विझवला , परंतू हे बघून तो चकित झालाकीं जेव्हां दिवा चालू होता त्यावेळेस पौर्णिमेचा चंद्र बाहेर उभा होता व दिवा विझताच चंद्राची किरणे त्या झोपडीत सर्वत्र पसरली. तो विचारात पडला की, एका छोट्याशा दिव्याने इतक्या मोठ्या चंद्र किरणांना बाहेर रोखून ठेवले होते*.
*त्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनात जे अहंकाराचे छोटे छोटे दिवे लावून परमात्मा रुपी चंद्राची किरणे बाहेरच थांबून ठेवली आहे . ती जोपर्यंत आपण आपल्या वाणीला आराम देत नाही तोपर्यंत मन शांत होत नाही, जेव्हां मन शांत होईल तेव्हाच भगवंताची उपस्थिती जाणवेल, नामस्मरण होईल व भगवंत रुपी चंद्राची किरणे सर्वत्र पसरतील*.
*??रामकृष्णहरि*??