### Good night ### मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*बरवें झालें आलों जन्मासी ।*
*जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी ।*
*महा लाभाची उत्तम रासी ।*
*जेणें सुखासी पात्र होइजे ॥१॥*
*दिलीं इंद्रियें हात पाय कान ।*
*डोळे मुख बोलावया वचन ।*
*जेणें तूं जोडसी नारायण ।*
*नासे जीवपण भवरोग ॥ध्रु.॥*
*तिळेंतीळ पुण्य सांचा पडे ।*
*तरि हें बहुतां जन्मीं जोडे ।*
*नाम तुझें वाचेसी आतुडे ।*
*समागम घडे संतांचा ॥२॥*
*ऐसिये पावविलों ठायीं ।*
*आतां मी कांई होऊं उतराई।*
*येवढा जीव ठेवीन पायीं ।*
*तूं माझे आईपांडुरंगे ॥३॥*
*फेडियेला डोळीयांचा कवळ ।*
*धुतला गुणदोषांचा मळ ।*
*लावूनि स्तनीं केलों सीतळ ।*
*निजविलों बाळ निजस्थानीं ॥४॥*
*नाहीं या आनंदासी जोडा ।*
*सांगतां गोष्टी लागती गोडा ।*
*आला आकारा आमुच्या चाडा।*
*तुका ह्मणे भिडा भक्तिचिया ॥५॥*