*सुंदर कोण ?*
-----------------------
एकदा शनिदेव आणि लक्ष्मी देवाधिदेव इंद्राकडे गेले व आमच्यापैकी सुंदर कोण हे सांगा असा त्यांनी आग्रह धरला. लक्ष्मीला सुंदर म्हणावे तर शनिदेव महाराज रागावतील. पण शनिला सुंदर म्हणावे तर लक्ष्मी रागावेल. तेव्हा काय करावे असा प्रश्न पडला म्हणून इंद्रदेव म्हणाले, ”असं करा ब्रह्यदेवाला भेटा. तेच उत्तर देतील” दोघेही ब्रह्यदेवाला भेटतात. ब्रह्यदेव सांगतात ”दोघेही समोरच्या वडाच्या झाडाला हात लावून परत या, मग मी सांगतो.” दोघेही वडाच्या झाडाला हात लावून परत येतात तेव्हा ब्रह्यदेव सांगतात, ”शनिमहाराज तुम्ही जेव्हा जात होता तेव्हा तुम्ही सुंदर दिसत होता आणि माता लक्ष्मी, तू परत येत होतीस तेव्हा सुंदर दिसत होतीस ?” ब्रह्मदेवांनी दोघांनाही नाराज न करता सत्य सांगितले. राशीतून *जाणारा शनि* चांगला वाटतो आणि *येणारी ‘लक्ष्मी’* केव्हाही सुंदर असते.
*तात्पर्य – सत्य सांगतांनाही कोणास नाराज न करता सांगावे.*
???
संकलनः मच्छिंद्र माळी औरंगाबाद .