झाले रामराज्य काय उणें आम्हांसी | धरणी धरी पीक गाई वोळल्या ह्मैसी ||१||
राम वेळोवेळा आम्ही गाऊं ओविये | दिळता कांडीतां जेवितां गे बाइये ||ध्रु||
स्वप्नीं ही दुःख कोणी न देखे डोळां | नामाच्या गजरें भय सुटले कळीकाळा ||२||
तुका म्हणे रामें सुख दिलें आपुलें | तया गर्भवासीं येणें जाणें खुंटलें ||३||
?रामकृष्ण हरि?
*?भगवान श्रीराम नवमी निमीत्य विशेष?*