शब्द
शब्द हसवतात शब्द रडवतात ....
शब्द शब्दांची सांगड घालत
मनात रूजंवतात नवं कोर वाक्य !
शब्द तारतात शब्द मारतात
शब्दच तलावरीचे घाव होऊन
मन घायाळ करतात ....!
शब्द अन् शब्दाचा समजून
घेण्याचा भाव बदलला की
शब्दच रूसून छळू पहातात ....!
शब्द आतड्यांत उकीरडयाचे
भक्ष विनतो शब्द शब्दांची
रानफुल होऊन मृगजळ बनतो !
शब्द कोवळे घन थरारतो
थवे होऊन पक्षाचे उंच डोंगरावर
संध्येच्या प्रहरी गंधारतो !
शब्द निद्रेमधले गीत होतो
शब्द माझ्या कवितेचे प्रित होतो
शब्द करुणाघन होऊन शिळ
घालत क्षितीजाच्या संग
शुभ्र रत्न होऊन कोकिळाच्या
कंठातले मधुर सूर होतो .......
© कोमल मानकर , सिंदी रेल्वे . वर्धा