रोज भासतो नवा नवा....
दिवसासारखाच दिवस!
रात्रीसारखीच रात्र
वेगळे भासतात या दिवसात मात्र!!
कारण याला असतो उत्सवाचा आनंदाचा परिसस्पर्श!!
दिवाळी सुरु झाली की रात्री झोप लागत नाही कारण समोर दिसत राहते डोळ्सांसमोर पाणत्यांची तेवती आरास,टांगलेला रंगीत आकाशकंदील आणि झिळमिळत्या माळा प्रकाशाची उधळण आणि अचानक दूरून येणार्या फटाक्याचा आवाज,,, इतक्या रात्री कोण आणि कुठे उडवला असेल हा याच्या उत्सुकतेचा ....
दिवसा दुसरं काही सुचतच नाही.वेगळा स्वयंपाक,फराळाची लगबग, घरालाही नटवणं,ठेवणीतल्या वस्तू,पडदे,चादरींनी घर खुलवणं.
अंघोळही रोजचीच असते.. बादली तीच,गडू तोच पण आता ते सचैल स्नान होतं उटण्याच्या मंद सुवासात..क्वचित् फटाक्यांच्या साथीने..
आपणही तेच असतो की.... पण आता मनात असतो निवांतपणा सुट्टीचा,उत्साह सणाचा,भेटींचा,झगमगत्या लखलखत्या नात्यांच्या विणलेल्या गोफाचा.... दिवाळीचा!!
आर्या