*तिचा डबा*
आज सकाळी जरा उशिरा जाग आली
आज सकाळी जरा उशिरा जाग आली...
कामावर पळायची घाई फार झाली...
मग,
घाईघाईमध्ये आज डबा घ्यायचाच विसरलो..
*बायकोचा तेवढ्यात फोन आला*
*बायकोचा तेवढ्यात फोन आला*
आज तुम्हाला हातात डबा द्यायच राहिल...
मोठ्या ताटलीच्या खाली डब्याच झाकण पाहील..
म्हटल राहुदे आता काळजी करु नकोस
आज कँन्टीन मधलच खाईन..
*तुझ्या हाताच्या गोड चवीशिवाय उपाशी राहुन पाहीन..*
जाँबला गेलो , फाईल घेतल्या
काम झाल सुरु
*कळतच नव्हत आज तिच्या डब्याविना*
आज किती वेळ कामात उरु.
हाफ टाईम झाला..
हाफ टाईम झाला..
आँफिस संपुर्ण कँन्टीनमध्ये गेल..
त्याच वेळात दिवसाच पुर्ण काम मी
तेवढ्या वेळेत केल..
लवकर निघायच म्हणुन पटकन सगळ आवरल.
लवकर निघायच म्हणुन पटकन सगळ आवरल..
*भुकेल्या पोटाला घरापर्यत मुठीत घेऊन सावरल..*
बिल्डिंग खाली आलो..
बिल्डिंग खाली आलो..
*आतमध्ये गेल्या गेल्या पापलेटाचा खमंग वास सुटला..*
*पोटात झोपून गेलेला कावळा ताडकन उठला..*
धावत सुटलो ,सुसाट पळालो
पोचलो एकदम दारात...
किचनमध्ये गेलो बसलो जरा
खमंग वास भरला मनात..
ती म्हणाली.
हात धुवा फ्रेश व्हा
*माहीत होत आज तुम्ही लवकर येणार.*
भुकेल्या पोटाला बाहेरच काहीच नाही देणार..
निवांत बसलो
जेवण मस्त पोटभर झाल..
मनामध्ये एकदम अस भरुन आल..
बायकोला म्हटल..
*बायकोला म्हटल इतकी तुझी सवय झाली.*
इतकी तुझी सवय झाली की सगळ असुनही काही मिळेना..
*अन्न समोर असुनही घास काहीकेल्या घसाखाली गिळेना..*
ती म्हटली असंच काहीतरी माझ्याबरोबर झाल..
दिवसभर विचार करत करत मन भरुन आल..
*माहीत होत जेवणार नाही म्हणुन आज असा बेत केला..*
काय करायच याच विचारात अर्धा दिवस निघुन गेला..
*आता रोज तुमच्या हातातच डबा देईल*
आता रोज तुमच्या हातातच डबा देईन.
*गोड तिखट जेवणाच्या चवीच कौतुक*
*तुमच्या दुपारच्या फोनवरुन घेईन..*
*मिथिल दि जोशी*
#kavyotsav