भावना अनावर
#kavyotsav
भिती वाटते मला तिच्या गोड हसण्याची ...
नकोश्या वाटतात भेटी, नकोश्या वाटतात आठवणी ...
तरीसुद्धा ...तरीसुद्धा नजर तिथेच जाते मन रमवायला ....
आणि मग गालावरची खळी आणि ओठांवरले तिळ उभेच असतात माझा पराभव पाहायला ...
तेवढ्यात नजरेला नजर भिडते ...
आणि मग ढगातून कोसळणारी विज थेट काळजात शिरते...
मग बाहेर पाण्याचा आणि आत गाण्याचा, बेधुंद पाऊस पडतो ...
मातीचा सुगंध काय दरवळतो ,छत्रयांची गर्दी काय होते नी काय नी काय ...
निसर्ग कितीही खुणावत असला तरी मी काही धजावत नाही ...
त्या बरसणार्या पावसात ती आडोशाला उभी असते सौंदर्याचे प्राजक्त फुलवीत ...
मीही पाहत असतोच तिला कट्ट्यावर बसून ...
एवढ्यात ती खुणावते मला , साथ छत्रीची देण्यासाठी ...
मी मात्र धजावत नसतो , माझ्या भूतकाळातल्या आठवणींमुळे ...
शेवटी निसर्गाच्या त्या कलाकृतीत झेप घेण्यावाचून मी ही थांबू शकत नव्हतो ...
शेवटी केली मनाची तयारी आणि गेलो तिच्याजवळ ...
तिला छत्रीत घेऊन चालू लागलो स्वतःच्याच नशिबाशी भांडत ...
अंधार हळू हळू दाटत होता, सोबत माझ्या ती होती, तिचा हात माझ्या हातात होता ....
हात हातात धरून तिचा, हलके पाऊल पुढे टाकत होतो ...
पहिलीच अशी भेट होती आमची, म्हणून मी ही थोडा लाजत होतो ...
विज तर गाजतच होती, आणि माझ्या मनातली 'ती' माझं काळीज भाजत होती ...
आता पाउस विझत होता , आठवणींनी मात्र भिजवत होता ...
अखेर तो थांबला ....
आणि मगापासून चाललेला लांबलचक प्रवास ...
अखेर शिष्टाचारावर येऊन थांबला...
आणि चालू लागलो आम्ही आपापल्याओल्या वाटा ...
पण तेवढ्यात पुन्हा विज चमकली ...
ती पुन्हा मागे वळली, पुन्हा गोड हसली ...
पुन्हा कैफ चढला भिजलेल्या मनावर ...
देहभानावर ....भावना अनावर ....
- साहिल जठार ?