मौन....
तुझी माझी पहिली भेट..!!
तुझ्या बोलक्या डोळ्यानी..मला खुप काही सांगितले..
मी फक्त हसलो..!
दुसर्या भेटीत ..तु खुप काही बोललीस..
मी ऐकत राहिलो..
आपल मन तु माझ्याकडे रिते केलसं..
माझ्या वरच्या प्रेमाचा..उच्चारही केलास..
अहर्निश....संगतीची शपथही घेतलीस...!
पण मी काहीच बोललो नाही...
तु रागावलीस..!!माझ्या प्रीतीबद्दल साशंक झालीस..
पण खर सांग..माझ्या शब्दांची..काय गरज होती ग???
माझे मौनच तर सारे काही सांगत होते ना...
..........................................व्रुषाली..