बाबा
तुघडुक तुघडुक घोडोबा
त्यावर बसली लाडोबा
लाडोबाचे लाड करतय कोण?
समजल का?अं..अं...अं
माझे बाबा ! आणखी कोण..? ॥१॥
गंमत आम्हा दोघांची
गुपचूप खाऊ खाण्याची
भातुकली असो वा लपाछपी
मिळून खेळतो खेळ किती
समजल का? मी.आणि ...आणि..
माझे बाबा ! आणखी कोण..? ॥२॥
बाबा नसता घरी
करमेना मज क्षणभरी
कातरवेळी येता घरा
जवळ घेऊन म्हणे कसा
आवरून बघ पसारा 'सारा '
तुझ्यासाठी धावत आलो कोकरा
खळखळून हसतो आम्ही दोघ
समजल का? मी अन् ..अन्
माझे बाबा ! आणखी कोण..? ॥३॥
मी रडता मज घट्ट धरी
डोळे पुसून म्हणे 'कातरवेळी '
रडू नको पोरी
तुझ्यासाठी झुरतो मी
तुझ्यात गुंतला जीव
होवून लहान गंमत करी छान
इंद्रधनू मग फुले गालावरी
समजल का?
मी अन्...अन्
माझ्या बाबांच्या? आणखी कोणाच्या.?॥४॥
गोष्टी अन अंगाई
हातांची मऊ उशी.
दिवस कसा संपून जाई......
बाळकृष्ण सखाराम राणे