माणुसकी
दिनांक : 13/11/2021
वार : शुक्रवार
काल च्या दिवशी मी बाजारातून येत असतांना एक वृद्ध जोडपं रस्त्याच्या कडेवर होतं,
*क्षण असा शिकवून प्रेरणा देऊन जाण्यासारखा होता*
त्या जोडप्यात म्हाताऱ्या आजोबांना काठी पकडून उठता येत नव्हतं,
म्हातारी आजीबाई आजोबांना उठवण्याचा प्रयत्नात होती,
आजूबाजूचे लोक त्या जोडप्याकडे नजरेने पाहत होती कोणी मदतीला धावलं नाही
तेवढ्यात मी तिथून जात होतो माझ्या डोळ्यासमोर सुंदर अश्या जोडप्याची एक मेकांना मदतीची ओढ दिसली तेवढ्यात मी मदतीला धाव घेतला
आजोबांना काठीच्या सहाऱ्यात दोन पायावर बळ मिळावा असं त्यांना उठवलं पण वृद्ध आजोबांना काठीचा आणि माझा सहारा दोन पायावर थांबावण्याचा होता वयस्कर आजोबांना उठून दोन पायावर थांबण्याची त्यांच्या पायातली बळशक्ती संपली होती
आजोबांनी ज्या परिस्थितीत रस्त्याच्या कडेवर बसलेले होते त्याच परिस्थितीत जागीच त्यांना बसवलं आजीबाईंनी रिक्षाला बोलावून रिक्षात बसवून आजोबांना घेऊन गेले,
आपला मित्र
युवराज रामचंद्र मानाली