तु हसलास तर ते जळतील,
तु रडलास तर ते हसतील,
काही नवं केलं तर पाप म्हणतील,
जुन्यात अडकुन राहीलातर श्राप म्हणतील,
गमावलं तर दळिंद्री म्हणतील,
कमावलं तर माज म्हणतील,
पुढे निघाला तर मागे ओढतील,
मागे राहीला तर तुडवतील,
तु हात दिला तर साथ म्हणतील,
तु तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील,
कौतुक केलं तर वाहं म्हणतील,
उणीव दाखवली तर जा..म्हणतील,
काही केलं तर... *काय केलं??* म्हणतील,
नाही केलं तरी... *काय केलं??* म्हणतील,
म्हणुनच...
*तु जग तुला हव तसं ...*
जगाचं काय???
ते काहीही म्हणतील....
????????manu