Quotes by Yogita vital Takatrao in Bitesapp read free

Yogita vital Takatrao

Yogita vital Takatrao

@yogitavitaltakatrao9307


कविता:-आयुष्य असंच जगायचं असतं

दुखत असेल काही मनात....
सर्वांना दाखवायचं नसतं,
त्रास कितीही होवो परंतु
आयुष्य असंच जगायचं असतं

येतात लाखो अडचणी....
तरीही रस्ता चालावाच लागतो,
सगळा वेळेचाच खेळ जणू
मधुनच डाव सोडायचा नसतो !

सावरून घ्यावे जीवन आपले...
आपल्याच ईच्छा शक्तीवर,
आपणच मार्गदर्शक व्हावं
आपल्याच जीवन वाटेवर !

तावून सुलाखून निघतात...
तेच सोन्यासारखे चकाकतात,
दुःखांना सामोरे जाऊन
जग जिंकून दाखवतात!

सौ.योगिता वितल तकतराव,मुंबई

Read More

म्हणतात ना,पणती सदैव दुसऱ्यांना प्रकाश देते पण त्या खाली अंधकार असतो,पण खरंच मुळात असं तिच्या बाबतीत घडू शकतं ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता !आज तिला असं वाटतं होतं, की फार अडाणी आहे ती ! खरंच, मला काहीच येत नाही का ? मी कुठे कमी पडतेय का ? मला घरचे समजुन का घेत नाहीत ? माझ्या ऐवजी दुसरी कोणी व्यक्ती  असती तर ? ती, ह्या अश्या गंभीर आजारातून लवकर बाहेर येऊ शकली असती का ? असे अनेक का ,तिला छळत होते.छे ! छे ! काय भलते सलते विचार येत आहेत मनात ! ज्योती स्वतःशीच म्हणाली ! 

नाही,नाही ! मी जो मुर्खपणा आधी केला ना,तो परत नाही करणार.मी ह्या घरातली पणतीच आहे. मी स्वतःवर प्रेम करायला शिकेन.स्वतःला खुश ठेवणे ही सर्वस्वी माझीच जबाबदारी नाही का ? मी नेहमी दुसऱ्यांनी मला खुश ठेवावं ही चुकीची अपेक्षा ठेवून असायचे.खूप केलं मी सर्वांसाठी आता स्वतःसाठीही करेन,स्वतःचे खूप,खूप लाड आणि कोडकौतुक करेन ! माझ्या आवडी निवडीं विषयी जागरूक राहीन.माझे छंद जोपासेन,माझी स्वप्नं पूर्ण करेन. मी खुश राहिले तर अख्ख घर आनंदी राहील.मीही ताज,गरमागरम अन्न खाणार.शिळपाक खाणार नाही,ते खाल्ले तर ताज अन्न शिळं होतंच की परत...!

मनाशी तिने खूप नवे करार केले,आणि ती उठली!आज देवाला तिने प्रसन्न मनाने पणती लावली .हो,पणती जणू तिचं मनापासुन लख्ख उजळलेलं नवं रुपच ! तिने एक नवीन पण केला देवाला मनापासुन हात जोडत ! ज्योतीने तिच्या घरासाठी प्रकाशमान पणती व्हायचं ठरवलं .आणि ती देवाला म्हणाली,देवा ! बघ ही पणती आता हे घर कस सुख समृद्धीने भरभराटीला आणते ते ! पण तु नेहमी माझ्या बरोबर रहायचं हा देवा !अशी धमकीवजा तंबी देखील दिली तिने देवाला. आणि काय आश्चर्य एक प्रकारची शितल हवेची झुळूक तिच्या दिशेने आली. त्या झुळुकेत तिला खूप सकारात्मक असं काहीतरी विशेष वेगळेपण जाणवलं,आणि तिला जाणवलं की ते,प्रेमच आहे,तिलाच, तिच्या विषयी निर्माण झालेलं.आणि ज्योती नावाची पणती अंतर्बाह्य तेजाने प्रकाशित झाली ,कायमचीच !

Read More

विषय:- सुगंध

सुगंध दरवळ
धुंद गुलाबाचा 
हा परिमळ
करितसे
निर्मळ
मन
ते !

ईश्वराचे चरणी
पहुडले सुखी 
निर्मिली कोणी 
ही प्रेमाची 
निशाणी
सार्थ 
ती !

ईच्छा वेड्या जीवाची
व्हावे फुलराणी 
हाव धनाची
नसे ध्यानी
मनाची 
राणी 
मी !

सौ.योगिता वितल तकतराव,मुंबई 
 

Read More

तेरे नाम की मैं लिखू शायरी
कुबुल हैं,तेरी शिकायतें सभी,
जरा अपनी गलतियाँ भी देख जालीम
वक्त का जनाजा निकला अभी अभी !

-योगिता

Read More

ज्वालामुखी झाली अशी
माझी तुझी ही भावना ,
रौद्र रूपे उसळते 
मनालाही ती ऐकेना !

किती कोंडमारा असा  
एकटीने सोसायचा,
परतावे मागे सदा
भाग हा परंपरेचा !

कन्या आहे म्हणोनी मी 
कानी हेच आदळले,
थोडं सोसायचं पोरी
जगी हेच आढळले !

थोडी उंच उडालेली
आपटते कोसळून,
दिल्ली ते हिंगणघाट
पंख टाकले छाटून !

अशी कशी मी सबला
आवरेना हा आक्रोश,
घनघोर आता युद्ध 
सारे तोडून हे कोष !

होत स्वयं सिध्द नारी
काली,दुर्गा मी होईन,
एक एका नराधमा
धडा सुध्दा मी देईन !

एक एका नराधमा
धडा सुध्दा मी देईन !

-योगिता

Read More