The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
गाव नाही कोणते आडनाव, नाही कोणाला नाव ! माणसांची वस्ती जेथे, असे कोणते सांगा गाव ? -दर्शन जोशी
रसिकांना मोहवणारे लालित्यपूर्ण कृत्य ! संगीत म्हणजे संगम गायन वादन नृत्य ! -दर्शन जोशी
प्रेम भावनेचा भावनेशी, फसवा ब्लाईंडगेम ! खरं म्हणावं की खोटं, तुमचं माझं प्रेम ? -दर्शन जोशी
आटली खरेच येथे उरातील माया ममता ! प्रत्येकाच्या अंतरात भिनते उगा विषमता ! -दर्शन जोशी
कोण जाणते काय होते कळीकळीला फुलताना जाणत नाही कारण कधीही मनाच्या हिंदोळ्यांवर झुलताना ! -दर्शन जोशी
*माझ्यातला परमेश्वर* जीवनात नाही कळले, हे शरीर आहे नश्वर ! पाहिलाच नाही कधी मी, गड्यांनो माझ्यातला परमेश्वर ! दारु , पार्टी , मटणाची मी, अशी काही खैरात केली . धुमधडाक्यात बेभान नाचून, अनेक मित्रांची वरात केली. तेच सारे दोस्त मला , पोहचवायला आले आहेत ! माझी उष्टी दारु माझ्यासमोर, मनसोक्त रिचवायला आले आहेत ! ही सारी मोहमाया आता, आहे का बरे अजरामर ? पाहिलाच नाही कधी मी, गड्यांनो माझ्यातला परमेश्वर ! दर्शन जोशी संगमनेर
हितगुज बरं का आई तुझ्या लेकीला, आभाळापेक्षा मोठं कर ! जिथपर्यंत जात नाही, कोणाचीही नजर वर . स्वावलंबी कर तुझ्या लेकीला, जरा धीट मुलीला होऊ दे ! सूर्यासारखा प्रखर प्रकाश, तिच्या पर्यंतही पोहचू दे ! आजपर्यंत जशी वागली, लेकीसोबत वागू नको . उमलत्या अजाण निष्पाप कळीला, आडबाजूला टाकू नको ! काय म्हणून तू लेकीला, कशासाठी अडवते आहे ? लोकांच्या तकलादू आग्रहाने, स्वत:ची माती करते आहे ? दे टाकून पोरखेळ अन्, पोरीला शाळेत शिकव स्पर्धेच्या नव्या युगामध्ये, लेकीला स्पर्धेत टिकव ! एक दिवस घराचे तुझ्या, लेक तुझी राखेल नाव ! तेव्हा बघंच तुझ्या दारात , होईल आनंदाचा गं वर्षाव ! दर्शन जोशी संगमनेर
गतकाळातील आठवणींचा घेण्या अचूक मागोवा पत्रलेखन करुन सुंदर धाडा तुमचा सांगावा ! -दर्शन जोशी
समय के साथ साथ हरदम चलना सीखो वक्त की रफ्तार से आगे बढना सीखो -दर्शन जोशी
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser