The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
मेहनती मासे पाण्यातले मासे नाही थांबत सतत काही काम चालू असत काय बरे शोधत असतील ध्यान तर करत नसतील पाणी त्यांना अडवतो खुप खुप थांबवतो तरी पुढे जातात अन पुन्हा मागे येतात का घेतात इतका त्रास थोडा निवांत घ्या श्वास आहे त्यांना माहिती उपयोग नाही काही नको टीव्ही नको मोबाईल नको कार नको घर उद्याची काही फिकीर नाही आणि पोहणे यांच थांबत नाही
अजुन घंटा तयार नाही एकदा की ना उंदराची भरली मोठी सभा तीस चाळीस उंदीर झाले की हो जमा विषय तसा होता खूपच गंभीर मांजराचा गळ्यात घंटा कोण बरे बांधणार ? सगळेच म्हणू लागले मी नाही मी नाही मग सभापती म्हणाले मी करतो काही तरी सगळे उंदीर झाले भलतेच खुश ठरल मग जागा आणि वेळ मांजर आली मोठ्या तोऱ्यात लागली हसायला म्हणते कशी, घंटा कोण येणार बांधायला? सगळे एकमेकाकडे बघू लागले काय करूया विचार करू लागले एक म्हणाला, "घंटा अजुन तयार नाही." मांजर लागली हसायला हा हा हा.. ही ही ही..
चिडुन काय होणार दगडाच फुल व्हायला वेळ तर लागणार आव्हान स्विकारून तर बघा मदत करणारे हात नक्की पुढे येणार वेळ का घालवता रेषा बघत यशाचा दिशेने चालत राहा.. ज्याची अपेक्षा आहे ते अशक्य आहे कधी प्रयत्न करून तर बघा
Create and live in world where you can breath freely as a tortoise.
प्रयत्न आणि सराव कोको कोबंडा गावभर हिंडत फिरायचा. तुरूतुरू चालायचा. त्याच्या डोक्यावरचा सरळ, उभा असा लालभडक तुरा कधी कधी एका बाजूस झुकलेला असायचा. त्याला तो शोभून दिसायचा. त्याचा चोचीचा खाली लालभडक कल्ला होता. संपूर्ण शरीर तपकीरी काळ्या पिसांनी झाकलेले होते. गावात चंदुशेट राहत होते. त्यांचा घराचे बांधकाम चालु होते. बांधकामाला लागणाऱ्या वीटा, वाळू बांधकामाजवळच ठेवल्या होत्या. तिथेच रस्त्याचा कडेला मातीचा ढीग होता. कोको कधी कधी तिथेच खेळत असे. असाच तो एके दिवशी नेहमीप्रमाणे त्या ढिगाऱ्यावरून वर खाली करत होता. तितक्यात कीको कोबंडी आली. किकोची पिसे पांढरीशुभ्र होती. ती आणि कोको एकत्र खेळायचे. त्या दोघाना नीलु बकरी झेब्रा म्हणायची. नीलु बकरी तिथेच बाजुला होती. ती म्हणाली, "माझा झेब्राचा पांढरी पट्टी आली." कीकोने काही लक्ष दिले नाही. किको कोबंडी कोकोला म्हणाली, "किती सहज तु वर चढतो आणि भरकन खाली येतोस. मी पण येऊ का?" तसा कोको कोबडा प्रेमळ होता पण विचारलेल बर अस किकोला वाटल. कोको म्हणाला "ये लगेच." वर किको चढायला गेली तसा तीचा पाय त्या वाळूत रूतला. तिने पाय ओढला तशी ती पडली. हे पाहून नीलु बकरी हसली. किकोला नीलु बकरीचा राग आला ती म्हणाली, "कोणी पडल तर अस हसतात का?" आपल हसु दाबत ती म्हणाली, "अग चुकलच माझ." आणि ती पुन्ही हसायला लागली. आता मात्र कीको कोंबडीला राग आला ती म्हणाली, "तुला इतक सोप वाटत तर तु चढुन दाखव." निलू बकरीनेही प्रयत्न केले पण तीचाही पाय रूतला. ते पाहून कोको कोबंडा म्हणाला, " मी रोज सकाळी येथे गेल्या दोन-तीन दिवसापासुन येतोय आणि वर खाली चढत उतरत होतो. पहिल्यांदा मीही असाच घसरलो. मग पुन्हा वर चढण्याचा प्रयत्न केला. मग जमल. तुम्ही पण करा. जमेल तुम्हाला." नीलू बकरी म्हणाली, " किको तु प्रयत्न कर. तु करू शकतेस." मग किको वर चढली. हळूहळू पाय पुढे नेत नेत ढिगाऱ्यावर पोहचली. तशी नीलु बकरी म्हणाली, "किको तु करून दाखवलस."
Copyright © 2025, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser