Quotes by Sanjay Sadashiv Gurav in Bitesapp read free

Sanjay Sadashiv Gurav

Sanjay Sadashiv Gurav

@mazavyaspith.843800


गणराया...
आद्य लेखक तूच...
मी पामरानं तुझ्यावर
लिहावं तरी काय..
तुझ्या सुखद आगमनानं
मात्र दुरावलेले ,
घराकडे वळलेच बघ पाय.

इवल्याश्या अणुपासून ते
अवघं विश्व प्रतिक्षेत असतं
फक्त तुझ्याच
आगमनाच्या.
बघ ना... बळीराजाचं सुख
हिरावून दडी मारलेला वरुणही
पुनःश्च अवतरलाच,
तुझ्या आगमनासाठी.
तुझ्या आगमनामुळेच,
आप्त स्वकीयांच्या
घडून येतात सुखभेटी.
तुझं पाऊल घरात पडलं की
वाटतंच,
असंच पडुन राहावं मारुन
तुझ्या चरणांना मिठी.

तूच सुखाची व्याख्या
माझ्या दुखहर्ता सख्या.
असाच वरदहस्त ठेव
शिरावर,
लेखनीवर प्रेम करणाऱ्या
एका पामरावर नवख्या.

सर्व आप्त, स्वकीय, मित्रपरिवार आणि सुह्रद
लेखक-लेखिकांना गणोशोत्वाच्या मंगलदायी शुभेच्छा 💐
गणपती बाप्पा मोरया.🙏🙏

© एक गणेशभक्त.

सदासन

Read More

आकांत सहज कळावा
हात पाहून पाय वळावा
बुडत्याला काडीचाही..
फक्त आधार मिळावा

-Sanjay Sadashiv Gurav

काठ भरजरी
नजर करारी
पाहतेस अशी
वाढे बेकरारी

©सदासन

संवाद

-Sanjay Sadashiv Gurav

छंद

एक जाहलो तनामनाने
दो ओंजळीचं एक स्पंदन
सांगितल्याविन उमगे मन
दो मनाचं एक आंदोलन

-Sanjay Sadashiv Gurav

त्या टपोऱ्या थेंबांचेही
का उलगडेना वागणे
ओसंडली ओंजळ तरी
घडते नव्याने मागणे.

© सदासन

हे फक्त पाहणं नसतं....बरंच काही कळणं असतं..✍️

epost thumb

सत्य-असत्य

एका हातानं बीज लावलं
त्यानं पहिलटकरीन मातीची
तश्शीच काळजी घेतली.
अंश रुजला...अंकुर फुटला.
दोन्ही हात जोडून मग
उमललं एकेक पान...
तो आनंद त्याने
जगाबरोबर वाटला.
तो इवलासा जीवही
तेव्हा आधारवड वाटला.

एकएक फूटली फांदी
नव्या विचारांची तीच नांदी.
आता काळजी घेणारे
झाले दोन हात. ..
तग धरला झाडानं
उन्हातान्हावर करुन मात.
दोनाचे झाले अनेक हात..
कुणी माया लावली..
कुणी झाडला मानले गुरु..
झाडानं आम्हाला जगणं शिकवलं
जो तो लागला मग प्रचार करु.

झाड विस्तारलं...
झाल्या अनेक शाखा..
अन अचानक गुदरला झाडावर
एक प्रसंग बाका...
जोपासल्या हातांनी घेतला
दुसऱ्या बागेकडे धावा..
"झाड आमचंच आहे "
केला की हो दावा..
शहारलं वयस्क झाड
म्हटले वाटसरुंना विचारा
"आम्ही वाटसरुंना मोजत नाही..
तुम्ही हट्ट आता सोडा..."
जरी होतं जुन्यातलं
त्याला सत्याची होती चाड..
असत्यावर विजय मिळवायला
आता झगडत राहील झाड..
आता झगडत राहील झाड. .


© संजय स गुरव (सदासन)

Read More

तू थेंब होताना वाटे
मी ओंजळ व्हावं
निसटून जातानाही
तुला अलगद झेलावं.

©सदासन