Quotes by Pradnya Chavan in Bitesapp read free

Pradnya Chavan

Pradnya Chavan

@i.pradnyachavangmail.com234740


(अ)पूर्ण प्रेम 💔💔💔

मी मीरा तुझी रे अन् तू माझा कृष्ण सावळा रे ,
हक्क आहे तुझ्यावर सर्वांचा फक्त मीच एकटी का झाले वंचित रे ...
सहत्र सोळा कन्यांचा तू पती  परंतु
राधा तुला प्रिय रे ....
तुमची प्रीत झाली अजरामर ,
जेव्हा लोक म्हणती हा तर राधेचा शाम रे....
तुजसाठी वेडी झाले,
माझ्या नशिबी का हे वैराग्य रे ....
तुझ्यावर प्रेम मी ही केले परंतु,
तुला दिसले फक्त राधेचेच   प्रेम रे,
अन् तिचा त्याग रे .....
तुझ साठी सोडले सर्व घरदार अन् मुखी फक्त एकच नाम,
माझा शाम .....
लोक ही म्हणती तरीही तुज राधेचाच शाम रे
मी काय गुन्हा केला ,
लोक मज् म्हणती ही तर , फितूर रे ....💔

    - : Written by "Unknown Writer 🌼 "

Read More

दुरावा तुझ्या आणि माझ्यातला 🥀

खरंतर तुझ्या माझ्यामध्ये इतके अंतर नाही
की ते मी किंवा तू पार करू शकत नाही
पण जेव्हा मी थकले होते तुझ्या मागे धावून
तेव्हा मनाने आवाज दिला माझ्या तो  जर तुझा असेल
तर येईलचना फक्त तुझा होऊन....💌💌💌
नातं दोन व्यक्तींनी बनतं
मग ते वाचवायला कायम एकानेच का करावे प्रयत्न
कधी तरी समोरच्या ने ही घ्यावेत थोडे कष्ट
पण म्हणतात ना की इगो आडवा आला की
किती ही प्रेम असल मनी तरी
मिटता मिटत नाही दोघांमधली दरी.... 🌼🌼🌼

Read More