Quotes by Chandrashekhar wagaskar in Bitesapp read free

Chandrashekhar wagaskar

Chandrashekhar wagaskar

@heartbucket


तुझ्यापासून गेलोय दूर तर,
हल्ली मन नाही रमत!!!

मग या कवितें-शिवाय मला नाही जमत...

शब्दाच्या या दुनियेत, मला नाही करमत,
दुनियेच्या शब्द भांडारात ओळ नाही मिळत,
वेचली अनेक शब्द फुले पण शब्दाला शब्द नाही जुळत,
खेळ हा शब्दांचा, मनाला नाही कळत,

तुझ्यापासून गेलोय दूर तर,
हल्ली मन नाही रमत !!!

मग या कवितें-शिवाय मला नाही जमत...

कविता करायला, हल्ली वेळच नाही मिळत!!!
रचल्या शब्दांच्या ओळी, पण यमक नाही जुळत,
लिहिलेल्या कवितेला मग अर्थ नाही उरत,
कशी आहे हि वेळ, सरता नाही सरत,

तुझ्यापासून गेलोय दूर तर,
हल्ली मन नाही रमत !!!

#HeartBucket

Read More

?"फोन"?


आजच्या युगात अविभाज्य घटक झालाय हे खरंय..बाय द वे फोन मीन्स 'स्मार्टफोन' बरं का, टेलिफोन नाही!! माणसं स्मार्ट असोत वा नसोत, फोन स्मार्ट असणं आवश्यक झालंय.?

'खिडक्या,यंत्रमानव….' असं वरवर अर्थहीन वाटणारं नाव वाचून स्मार्ट लोकांना लिखाणाचा विषय लक्षात येईलही. पण जे स्मार्ट नाहीयेत (नथिंग पर्सनल बरं का!!?)
त्यांच्यासाठी थोडं स्पष्टीकरण- स्मार्ट फोनची दिवसेंदिवस वाढणारी बाजारपेठ सध्या चार मुख्य प्रकारच्या फोन्सनी व्यापली आहे!
खिडक्या -'विंडोस' फोन,
यंत्रमानव -'ऍन्ड्रोइड फोन्स,
सफरचंद - 'ऍपलचा iफोन' (न्यूटनचं सफरचंद नाही स्टीव्ह जॉब्सचं)
काळबेरं - ब्लॅकबेरी
फोनसाठी वापरलेला प्रतिशब्द आहे (या फळासाठीचा मराठी प्रतिशब्द कुणाला माहित असल्यास सांगावा). सहा-सात वर्षांपूर्वी भारतात फार थोड्या लोकांकडे नोकियाचा ९३०० अर्थात कम्युनिकेटर असायचा (आत्मस्तुती: माझ्याकडे पण होता). आपल्याकडे वापरला गेलेला तो पहिला स्मार्टफोन…पण तो स्मार्टफोन कमी आणि 'शोफोन' जास्त होता कारण त्याचा वापर दिखाव्यासाठीच जास्त करायाचो. या फोनचे व्यावहारिक,तांत्रिक फायदे कुणी घेतलेले मी ऐकले नाहीयेत किंवा त्याच्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानसुद्धा तेव्हा उपलब्ध नव्हतं (इंटरनेट, थ्रीजी, वाय-फाय वगैरे). मग साधारण २००८ च्या आसपास स्मार्टफोनचा गवगवा सुरु झाला. मोबाइल फोन ही गोष्ट एव्हाना कॉमन झाली होती पण आयफोन प्रकार नवीन होता. स्टीव्ह जॉब्सने "मोबाइल फोन निव्वळ बोलण्यासाठी नसतो आणि त्याचा वापर इतर गोष्टींसाठी व्हायला पाहिजे! फोन जीवनशैलीचा भाग व्हायला हवा" असं विधान
आयफोनसंदर्भात केल्याचं वाचलेलं आठवतंय! मला जेव्हा पहिल्यांदा आयफोनच्या तंत्रज्ञानाबद्दल कळलं तेव्हा मला त्याचं अजिबात कौतुक वाटलं नव्हतं..कारणं पुन्हा एकदा- फोन वापरायला आवश्यक तंत्रज्ञानाचा अभाव आणि अवाजवी किंमत! माझ्या दृष्टीने तेव्हा नोकियाचे चांगले कॅमेरे असणारे किंवा सोनीचे गाणी ऐकायला बनवलेले फोन्स ही मोबाइल विषयक अपेक्षांची लिमिट होती! मग शिक्षणानिमित्त दौंड ला आलो आणि स्मार्टफोन लोकांच्या जीवनशैलीचा भाग होताना पाहिलं. सगळ्यांनी घेतला म्हणून, स्वस्तात मिळतोय म्हणून, गरज आहे म्हणून अशी वेगवेगळी कारणं स्वतःलाच देत शेवटी स्मार्टफोन घेतला आणि स्टीव्ह जॉब्सला मनातल्या मनात नमस्कार केला....?

#HeartBucket

Read More

तिला स्वप्नात पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात‬ पाहिलेलं खुप बरं‬ वाटतं कारण स्वप्नात पाहिलं कि डोळ्यांना बरं वाटतं आणि प्रत्यक्षात ‎पाहिल कि हृदयाला बरं वाटतं!



#HeartBucket

Read More

सांग ना ,ती सध्या काय करते...!
पहाटे येणारी वाऱ्याची मंद झुळूक रोज विचारते,
सांग ना , ती सध्या काय करते...!

अजुन कुणावर प्रेम करत असेल ती,
कि माझ्याच आठवणीत असेल ती ?
हसमुख चेहरा घेऊन,
मी नाही म्हणून रडत नसेल ना ती...!
विसरु तिला नाही शकत, अजूनही ती मला माझीच दिसते...!
सांग ना, ती सध्या काय करते...!

तिला नसेल वाटत का,
सर्व सोडून माझ्याजवळ यावं...!
राहिलेलं आयुष्य स्वतःचं,
धुंद होऊन माझ्या ताब्यात द्यावं...!
असे वाटते झोपण्यापूर्वी, ती जरूर माझी वाट पाहते...!
सांग ना, ती सध्या काय करते...!

बघावसं वाटतं तिला,
संगणकात ठेवलेल्या फोल्डर मध्ये जाऊन...!
स्पर्श करण्याची होते मग इच्छा,ओठ अलगद गालावर ठेऊन...!
आभास बनून राहतात माझ्या साऱ्या इच्छा, आणि स्वप्नही कुठेतरी हरवून जाते...!
सांग ना, ती सध्या काय करते...!

आता तिला एकच सांगा,
मी तुझं खुप काही चोरून आणलंय...!
इकडे-तिकडे शोधू नकोस म्हणावं,
जेवढ होत तेवढ सार आणलंय...!
बघू, आणलेलं सर्व घेऊन जायला येईल का,
हट्ट करत माझ्यापाशी, मनसोक्त रडेल का...!
सांग ना , ती सध्या काय करते...!

Read More

म्हणून तर एकदा भेटावं म्हणतोय !
मनातलं गुपित सत्य सांगण्याचा
प्रयत्न करावा म्हणतोय,
तुझ्यापासून दूर आल्यापासून,
मन आपलं माझ्याशीच भांडतयं,
तुला भेटायला आजच जायचं,
हा विचार मन रोजच करतंय.
म्हणून तर एकदा भेटावं म्हणतोय !
तुझ्या आवाजाचा झाला जरी भास,
तरी गळ्यातच अडकतोय घेतलेला घास.
मन सारखं तुझ्याबद्दल विचारतंय,
बघ ना तुझ्या भेटीसाठी किती अतुरतयं,
तुझ्यासाठी हे मन मला खूप छळतयं,
त्याचं हे छळन मला पण कळतंय.
म्हणून तर एकदा भेटावं म्हणतोय !
घेतलायं मनाने निर्णय तर मीही
त्याबरोबर येणार,
काही झालं तरी आता एकट नाही राहायचं,
तुला भेटल्याशिवाय मागे नाही फिरायचं,
माहिती आहे आठवणींशिवाय काही नाही उरायचं.
पण या हट्टी मनाला आता कोण समजवायचं !!!

#HeartBucket
★चंद्रशेखर वागसकर.★

Read More

***तुजसाठी काहीतरी ***

तुजसाठी काहीतरी 
असे मनात असते 
अन अगदी नकळत 
एक कविता सुचते 

तुझी आठवण रोज
अशी मनास रुचते 
आणि सहजच मग 
एक कविता सुचते 

अदा तुझी मनास भावते
आठवण हृदयामाजी वसते 
मग सुंदरशीच प्रेमाची 
एक कविता सुचते  

अवचित कधीतरी 
तुझी छबी दिसते
आणि मग सहजच
एक कविता सुचते

का कसे, कधी, कुठे 
काही समजत नसते
पण या उनाड मनाला
एक कविता सुचते

Read More


' सावली '
सावलीला म्हणालो थांब
ती म्हणाली मला जायचय 
मी म्हणालो का ? तुला नाही का 
माज्या बरोबर रहायचय
ती म्हणाली तुज्यात 
आता काय राहिलय
कारण तुज्या डोळ्यात 
तुला येणार मरण मी पाहिलय
तीच उत्तर ऐकून 
मी तर सुन्नच पडलो 
आसवच हरवली डोळ्यातून 
क्षणभर कोरडाच रडलो
पुन्हा सावलीला म्हणालो थांब 
ती पुन्हा म्हणाली मला जायचय
मी म्हणालो थोडाच वेळ , तर म्हणाली 
तुला मरताना मला नाही पहायचय 
खुप आग्रह केला 
शेवटी ती निघून गेली 
पण हो, जाता जाता माज्यासाठी 
आसव दोन ढालून गेली 
आणि आता .....
आणि आता माज्याशिवय ती 
एक एकटीच रहातेय
मी निजलोय सरणावर 
ती दुरून खेळ पहातेय
होय ..... 
ती फक्त दुरून खेळ पहातेय

Read More