Quotes by Ashwini Kasar in Bitesapp read free

Ashwini Kasar

Ashwini Kasar

@ashwinikasar7191
(19)

वळणावरील वळण..

वळणा-वळणाने घेतलेले वळण
सरळ मार्गापेक्षा अवघड ठरते पण ,
वळणावळणावर जी विलक्षण
अनुभुती येते,
त्याची व्यापकता अलौकिक असते...
वळणाने वळण लागते पण,
वळणाआधीचा माज माञ
जबाबदारीनेच संपतो.....
उनाड बालपणातील अवखळ पिटारा..
शिस्तीच्या आवर्तनाने प्रभावी होतो..
त्यातील जिद्द , तळमळ उधळली जाते..
पुढे........
तंद्री सावरायला पारिजातकाच्या
नाजुक वळणावर हळवी चाहुल
पुरेशी असते....
भरजरी , दिखाऊ अशा फिरंगी
रातकिड्यांचा तो मार्ग ....
चौकातील वळणावरच्या टप्पोरी
गल्लीत संपतो....
नेसलेलं डोरलं , जगण्यातल्या
शाश्वतीतला नवखेपणा,
अनुभुतीच्या वळणावरचं दार ठोठावत
भांभावल्यागत वावरु लागतं.....
इथल्या प्रत्येक वळणावर भिरभिरणारं
मनपाखरु गुफ्तगु करत व्यापक
सुखाचा शोध घेऊ लागतं....
जीव टांगणीला लावुन खेळलेला खेळ
माञ आयुष्याचा डोंबारी बनवुन जातो..
हजारो मार्गाचे वळण समोर 'आss'
वासुन उभे असते.....
त्यातील योग्य-अयोग्य या भ्रमात
धावपळीचे भुत मानगुटीवर बसुन असते
निर्णयाचा निकाल काही असो....
पण खरं तर हेच नं....
वळणावळणाने घेतलेले वळण
सरळ मार्गापेक्षा अवघड ठरते पण
वळणावळणावर जी विलक्षण
अनुभुती येते,
त्याची व्यापकता अलौकिक असते ...
वळणाने वळण लागते पण
वळणाआधीचा माज माञ
जबाबदारीने संपतो......

✒@shwini_kasar

Read More

दिन के उजाले मे भले ही
सुरजकी रोशनी चाँदको
फिका बना दे..
पर चाँद तो चाँद होता है,
अपने दामन पर लगे
हर दाग को छुपाके ,
सबको प्यार बांटना...
उसीसे तो सिखा है , जिंदगी
जीने का नया तरिका.....

@ashwinikasar

Read More

उगवल्या सांजेला
पाकोळ्यांची दिशा
तिच्या निरव शांततेला
चांदण्यांची नशा
रातकिड्यांच्या सुरात
कसा भिनलाय बघ वारा
सांग सये कसा सावरु मी
तुझा मनकवडी तोरा.....
धुंद तुझ्या पिरतीची
जणु काजव्यांची पाचवे
कावर्‍या नयनी नवी
बावरी आसवे...
काजळाच्या धुक्यामंधी
मनाला या घोर
सांग सख्या कशी सावरू मी
तुझी लहरी ओढ.....

@ashwinikasar

Read More

Ego (अहंकार), self respect (स्वाभिमान)
खरं तर प्रत्येकाकडेच असतो...पण मान्यच करायचा नसतो...
कधी... तो मी नव्हेच प्रमाणे डोकावतो तर कधी कधी पार शिगेला पोहचतो.....
म्हणायचं एकच ....
असावा पण या दोन शब्दांना ,,,,भावनांना
जोडणारा एक नाजुक धागा असतो विश्वास नावाचा तो तुटू नये म्हणजे झालं....

©अश्विनी कासार

Read More