Quotes by Archana Rahul Mate Patil in Bitesapp read free

Archana Rahul Mate Patil

Archana Rahul Mate Patil

@archanamate291gmail.com132536
(2)

पाऊस असतो आपल्या नात्यांसारखा!!

एक असतो आपल्या बाबांसारखा कडकडणार्‍या विजेसहित गारवा आणणारा!!

एक असतो आपल्या आईच्या मायेसारखा ,रिमझिम रिमझिम सरी बरसvणारा!!

एक असतो आपल्या ( बहिणी)ताई सारखा,
असेल काही महत्त्वाची कामे तर करून घेण्यासारखा!!

पाऊस असतो आपल्या भावासारखा पाहिजे तेव्हा पाठिंबा देण्यासारखा! !

एक असतो मेघर्जनी सारखा. मित्र मैत्रिणीच्या घोळक्यासारखा!!

पाऊस म्हणजे फक्त पाऊस नसतो, आपला सखा सोबती त्याच्यात दिसतो! !

आपल्या सभोवताली फिरणाऱ्या चक्रासारखा,
नैसर्गिक दिसणाऱ्या निसर्गासारखा! !

मायेचा ओलावा असतो जसा नात्याचा,
सुगंधी सुगंध असतो त्या पावसाचा! !

कडकडणाऱ्या विजेला आतून रीत होण्यासारखा,
आभाळ भरून आलेल्या आभाळासारखा! !!

पाऊस असतो कधी आकाशातल्या रूद्रासारखा, रौद्ररूप धारण करतो, शिवशंकराच्या त्रिनेत्रासारखा!!


थेंबा थेंबात अस्तित्व असतं ज्याचं, अथांग होतो तो जसा समुद्र सारखं!!

नद्या नाल्यांना एकत्र करून वाहतो ,तो खळखळणाऱ्या ओढ्यासारखा,
पाऊस असतो नवरा बायकोच्या नात्यासारखा!!

प्रेम असतं धरित्री आणि नभा सारख, मातृत्व ते आपल्या पुत्रासारखं! !!

पाऊस म्हणजे पाऊस असतो, सगळीकडे पडेल असा तो नसतो!!!

पाऊस म्हणजे पाऊस असतो तुमच्या आमच्याकडे सेम नसतो!!😁😁

पाऊस येतो तेव्हा घेऊन येतो सुख आणि समाधान, पावसामुळेच आहे धरित्री ला मानसन्मान! !!
✍🏽✍🏽Archu❣️❣️

Read More

नि "वड"
करुन संसार केल्यावर
काही दिवसानी
पर "वड "
होऊ नये म्हणून
स "वड "
काढून प्रेमाची
पुन्हा पुन्हा
लाग "वड " करण्याचा
आजचा दिवस..
वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

❤️❤️💐💐🌹🌹

-archana Mate

Read More

योग दिनाच्या दिवशी योग करण्याचा काही योग जुळून आला नाही, तरीपण आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्व योगीमय लोकांना आरोग्यमय शुभेच्छा😇Archu🥰

-archana Mate

Read More

गागर मे सागर म्हणता येईल असा अथांग महासागर,
एक भारदस्त पण प्रेमाची उब, भरभक्कम पाठीचा ताठ कणा नेहमी पाठीशी असणारा, तळाच्या अस्तित्वाला मिळालेलं प्रेरकस्त्रोत, भूतकाळात असताना देखील आपल्या भविष्याचा विचार करून ठेवणारा आपला वर्तमान चांगला घडविणारा आपला बाप माणूस! ! अशा या माणसाला जागतिक पितृ दिनाच्या पितृ मय शुभेच्छा!!!
🥰Archu🥰

-archana Mate

Read More

कसं जमतं काय माहित🧐 ओळखीच्या लोकांना 😕अनोळखी म्हणून वागायला🤨Archu🥰

-archana Mate

जिच्या शिवाय आपण अपूर्ण आहोत,
ती आहे तर आपण परिपूर्ण आहोत..
तिच्या असण्याने जगण्याचा अर्थ आहे,
तिच्या नसल्याने सर्व निरर्थक आहे...
फक्त आजचा दिवस नव्हे तर,
प्रत्येक दिवस फक्त तीच्यामुळेच आहे..
सर्व नात्यांमध्ये श्रेष्ठ ती, प्रेमामध्ये ज्येष्ठ ती..
तिचे नाव स्री शक्ती, आदिशक्ती ,आपली आई!! मातृदिनाच्या सर्वांना मातृमय शुभेच्छा..✍️✍️💞Archu💞

-archana Mate

Read More

आपल्यासमोर संकटाचे वादळ असतं तेव्हा खंबीरपणे उभी ठाकणारी आई, तिच्या प्रेमाने अवघी विश्व एकरूप करणारी आई, अथांग सागराप्रमाणे, आकाशाएवढ्या कर्तुत्ववान मातृत्व प्रदान करणाऱ्या आईला मानाचा मुजरा

-archana Mate

Read More

ज्यांच्या अंगणात आकाश झुकले त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांना जन्म मिळाला त्यांना जरा उचलून घ्यावे..!Archu!(ज्यांना देवाने भरपूर दिले आहे त्यांनी इतरांना होईल तिथकी मदत करावी)

-archana Mate

Read More

स्वप्न पाहिले जे होते ,ते आज स्वप्न बनवून राहिल...
याचा विचार स्वप्नात देखील केला नाही, ते आज समोर आले ...

स्वप्नात देखील असे स्वप्न येऊ नये की, त्या स्वप्नात जाऊनही स्वप्नामध्ये स्वप्न आपलं, स्वप्न होऊन स्वप्नातच स्वप्न म्हणून संपून जावं, अगदी स्वप्नासारखंच!!!

खूप स्वप्न होती माझी अगोदर, स्वप्नाच्या दुनियेतच रमाईची मी..

पण जेव्हा वास्तविकता समोर आली तेव्हा स्वप्न पडून ,स्वप्नातच सगळं जगायची मी! !!

किती ते स्वप्न असतात एका मुलीची, पण सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करता करता तिचे स्वप्न मात्र स्वप्नच बनून राहतं...

माझंही काहीतरी स्वप्न होतं, हे मात्र मला स्वप्नातही आठवत नसतं! !!

माझ्या स्वप्नातील मीच माझी लेखिका मीच कर्तव्यदक्ष गृहिणी मीच माझे रणरागिनी....
हीच प्रत्येक स्त्री जन्माची कहाणी...!!!
🥰Archu🥰

Read More

प्रत्येक वेळी ज्या वेळेची वाट पाहिली ती वेळ पण आली थोड्यावेळासाठी असं वाटलं त्या वेळेला थांबून ठेवू प्रत्येक वेळेसाठी पण ती वेळ सुद्धा थोड्याच वेळासाठी थांबली!!

-archana Mate

Read More