देशपांडे गुरुजी (थोड्याशा थांबीनंतर, भारदस्त आवाजात):
"...शकुंतला जेव्हा प्रेमात पडते, ती फुलते.
पण जेव्हा ती विस्मरणात जाते — जेव्हा तिचं अस्तित्वच नाकारलं जातं —
तेव्हा ती दगड बनत नाही.
ती स्वःताला शोधते. आणि त्या शोधात, ती एका टोकाला पोहोचते —
जिथे आशा संपते,
आणि मुक्तता सुरु होते.
"ती त्या दु:खावर मात करते — एका डोंगरावरून उडी मारते..पण त्या उडीत...
ती मरत नाही. ती मुक्त होते."
गुरुजी अजून एका मुलीच्या खांद्यावर हलकं हात ठेवतात.
मग टाळी वाजवतात. संगीत अचानक थांबतं.
सर्व मुली त्यांच्याकडे वळतात — जरा घाबरलेल्या, पण एकाग्र.
मुली एकमेकींकडे पाहतात — उत्सुक, पण सावध.
देशपांडे गुरुजी: या वर्षीच्या ऋतूची सुरुवात... 'शकुंतला' ने करतो. हो, ही कथा संध्याचं आत्मचरित्त्राच चित्रीकरण संपताच, सुरू करण्यात येइल. शकुंतला सादर करणाऱ्यापत..
सुगंध नको, सत्य हवं. अलंकार नको, आत्मा हवा.
आणि अशा नव्या मांडणीला हवी आहे —
नवीन शकुंतला. 'ही शकुंतला नव्या युगाची' ' फिक्शनाल' ' अध्यात्मिक नाही' एक चेहरा — जो जगाला दाखवता येईल.
पण केवळ सुंदर असून भागणार नाही."
"कोण embody करू शकतं दोघी शकुंतला? ती निष्पाप जिचं प्रेम हरवलेलं आहे...
आणि ती जिच्या मनात वसना आणि रागही जागा घेतो."
---
सुरभी आतून ताठ झालेली — कारण ती ओळखते या निवडीच्या नियमाला.
पुन्हा नकाराची तयारी.
देशपांडे गुरुजी (शांत पण निर्णायक स्वरात):
"ज्यांच्या खांद्यावर मी हात ठेवला... त्यांनी आपापल्या नियोजित सरावपुर्ण होताच ऑडिशनलां दुपारी हजर राहावं."
सर्व मुली एकमेकांकडे पाहतात — संभ्रमित.
गुरुजी (थोडंसं हसत):
"आणि ज्यांच्यावर मी हात ठेवला नाही... त्यांनी संध्याकाळी पाच वाजता, स्टुडिओ ऑडीटोरियम मध्ये मला भेटावं."
सुरभि (अंतर्मनात)
"...माझ्यावर स्पर्श नाही केला.
म्हणजे... मी अपात्र?
पण मग स्टुडिओ ...?
म्हणजे मी बाहेर नाही... पण आत सुद्धा नाही?
हे काय आहे? संधी आहे का शिक्षा?"
(ती हलकेच आजूबाजूच्या मुलींना पाहते)
"सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रतिक्रिया आहेत. कुणी खुश, कुणी गोंधळलेलं...
पण मला का वाटतं की मी कोणीच नाही?"
गुरुजी... त्यांनी माझ्याकडे पाहिलं. हसले...
पण मग पुढे गेले.
त्या हसण्यात काय होतं? संमती? की सहानुभूती?"*
"*मी इतकी वर्षं मेहनत करतेय.
रोज घुंगरं आवळते, प्रत्येक बारीक हालचाली लक्षात ठेवते...
आणि मग येते एखादी —
मोकळी, बेधडक, वेगळी —
आणि सगळं बदलतं.*"
(श्वास खोल घेते, डोळे मिटते)
"*पण नाही. मी अजून इथे आहे.
म्हणजे काहीतरी बाकी आहे.*
कदाचित...
शकुंतला जशी विस्मरणात गेली,
तशी मलाही स्वतःचं प्रेम आणि शक्ती शोधायचीय.*"
"*पण... मी तयार आहे का?
आणि...
मी कुठली शकुंतला आहे? ती शुद्ध, प्रेमळ...?
की ती — जी अंतर्बाह्य पेटून उठते...?"
त्या प्रशस्त, शांत rehearsal hall मध्ये लाकडी मजला. भिंतींवर जुन्या नाट्यप्रयोगांचे पोस्टर्स. एका भिंतीवर लांबसडक आरसा. सर्व विद्यार्थी रांगेत उभे आहेत. देशपांडे गुरुजी टकमक चालत आजुन निरीक्षण करत आहेत. शांती आहे, पण हवेत तणाव जाणवतो.
देशपांडे गुरुजी (सर्वांना उद्देशून)
"शकुंतला हे नाटक नाही, हे एक शोध आहे – तिच्या आतल्या स्त्रीचा, तिच्या मौनाचा, आणि तिच्या आगीत दडलेल्या शांततेचा."
(सुरभी त्यांना बघतेय आणि ते जाऊन रसिकासमोर थांबतात.)
"तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून मेहेनत घेतली क
आहे आजपर्यंत. पण नुसते पमेहेनत पुरेशी नाही... रंगभूमीला सत्ता लागते – उपस्थिती लागते."
(एक क्षण थांबतात)
‘शकुंतला’च्या भूमिकेसाठी...मी निर्णय घेतला आहे."
(सुरभीचा श्वास रोखलेला. रसिका आत्मविश्वासाने उभी आहे.)
देशपांडे गुरुजी (सोप्या पण ठाम आवाजात)
"रसिका...
तू शकुंतला साकारशील."
(हळुवार टाळ्या. रसिका नम्रपणे मान झुकवते. सुरभीचा चेहरा क्षणभर निस्तेज होतो – तिला अपेक्षा होती.)
रसिका (नम्रपणे)
"गुरुजी, तुमचं आभार. शकुंतलेला माझ्या श्वासात साठवेन."
देशपांडे गुरुजी
"मला खात्री आहे. तू तंत्र जाणतेस. संयम राखतेस.
ह्याच संयमाची गरज आहे मला —
एक शकुंतला, जी वादळ पिऊन गेलेली आहे"
(गुरुजी आता सुरभीकडे वळतात)
देशपांडे गुरुजी (शांतपणे, परंतु थेट)
"सुरभी... तुझं अभिनय प्रेम अफाट आहे.
तू अंगार आहेस.
पण ही शकुंतला... ही प्रलयंकारी निःशब्द आहे.
तू मला काली दाखवलीस, पण मला हवी होती गंगा.
(थोडा विराम)
.. ही भूमिका तुझी नाही. अजून नाही."
(सुरभी डोळ्यांतून अश्रू थांबवते. ती केवळ मान हलवते.)
सुरभी (शांत आवाजात)
"हो गुरुजी. समजलं."
देशपांडे गुरुजी
"नाही, मुली. समजून नको घेऊ.
हे बोचू दे.
जळू दे...
कारण एक दिवस हेच जळण तुला अजेय बनवेल."
सुरभि (थोड्या दबक्या आवाजात)
"नक्कीच गुरुजी, नक्कीच होइल असेल "
देशपांडे गुरुजी (तिच्या दोन्ही दंडावर हाथ ठेवून)
"मला देखील असाच व्हावं म्हणून मी तुला ह्यात एक ही भूमिका ठेवली नाही. मला विश्वास होता जर शकुंतलाची माता ' मेनका' ची भूमिका दिली असती तर तू ती नक्कीच माझ्या मनासाठी केली असती, पण.."
सुरभि (गोंधळल्या स्वरात)
"पण काय गुरुजी"
देशपांडे गुरुजी (आता ठाम स्वरात)
"पण त्याने तू देखील सुलोचना किंव्हा उषा किरण सारखे सहकलाकरी भूमिकेत सिमित राहू नये म्हणुन मी हा निर्णय घेतलाय."
दिग्दर्शक मगद कुलकर्णी (समोर येत)
"संध्याच्या आत्मचरित्रावर तुझ्याकडून खुप अपेक्षा आहेत. यंदा ही तूझ्या वाटेत राष्ट्रीय पुरस्कार यावा अशी अपेक्षा करत गुरुजींनी हा निर्णय घेतलाय"
सुरभि (भावूक होउन येणारे अश्रु पुसत)
"त्या पत्रकार परिषदेत मला म्हंटले ते सत्य वाटतेय. मी प्रथम देउन ही प्रथम निवड नसते"
(गुरुजी हळूहळू निघून जातात. रसिका इतर विद्यार्थ्यांचे अभिनंदन स्वीकारते. सुरभी, एकटी, गोंधळलेली... पण आतून काहीतरी घडतंय. मनिषा आणि सुषमा तिला बघतात, तिच्या दुःखात तिने एकटे लढावं म्हणुन नाइलाजाणे ते तिथून निघतात. सगळे हॉलमधून हळूहळू निघतायत. सुरभी एकटी उभी आहे. तिच्या चेहऱ्यावर हळूवार हसू आणि डोळ्यांत अडकलेलं ओलावलेलं जग. आतून एक संवाद)
सुरभी (अंतर्मनात)
"मी अंगार आहे... पण आज गंगा हरवली.
काहीतरी उणी राहिलं का माझ्यात? की मी खूप जास्त दाखवलं... जास्त तीव्र झाले?
गुरुजी म्हणाले, 'वादळ पिऊन गेलेली शकुंतला' हवी होती... माझ्यातलं वादळ बाहेर आलं, पण ते पिऊन ठेवण्याची ताकद नाहीये का अजून?"
(क्षणभर श्वास थांबतो)
"रंगभूमीवरचं प्रेम पुरेसं नाही म्हणतात... तर काय हवं? संयम?...शांतता?.... की स्वतःच्या आत खोल शिरायची तयारी?"
(ती स्वतःशी हसते, कटुतेने.)
"मी भूमिका हरवली नाही, मी एक संधी हरवली... पण मला भूमिकेपेक्षा मोठं काही घडवायचं आहे.
गुरुजी म्हणाले, 'हे जळण तुला अजेय बनवेल' — तर मग मी ही आग वाया घालवणार नाही. मी ती लेखनात ओतते, मी ती नवं काही साकारायला वापरते."
(ती हळूच जागेवर बसते, नजर जमिनीवर, पण मन दूर चाललेलं)
"माझ्या आतली 'काली' त्यांना दिसली. पण आता मला माझ्या आतली 'गंगा' शोधायची आहे. ती संयमी, ती निःशब्द,
ती जी केवळ दिसते नाही — पण जाणवते."
(हळूवार डोळे मिटते, एक खोल शांततेत.)
"माझं ध्येय भूमिका मिळवणं नाही...माझं ध्येय असं काही घडवणं आहे... की भूमिका माझ्याकडे याव्यात — कारण मी त्या पात्रांसारखी 'सत्य' झाली आहे."
(श्वास घेतो ती, नव्या उमेदीनं. एक नवीन सुरभि उभी राहते. हरलेली नाही — फक्त तयार होत आहे.)
[अंतर्मनात ही ती आता शांत आहे. फक्त तिचा श्वास ऐकू येतो.]