Kasturi Methi - 2 in Marathi Women Focused by madhugandh khadse books and stories PDF | कस्तुरी मेथी - भाग 2

Featured Books
Categories
Share

कस्तुरी मेथी - भाग 2

रात्रि उशिर झाले पण उद्या पुन्हा लवकर सराव म्हणुन मोजक्या लोकांनी सेटवरच मुक्काम ठोकला. सुरभिला एका जुनाट मराठी चित्रपट स्टुडिओतील छोटंसं ड्रेसिंग रूम मिळाली.पिवळसर झाक असलेला बल्ब हलकी प्रकाश टाकतो. वरचा पंखा घरघरतो, त्याचा आवाज वेळोवेळी शांततेला छेद देतो.आरशाभोवतीची बल्बांची रांग अर्धवट पेटलेली, काही पूर्ण गेलेली.

हवेतील वास — चंदनाचा,

केशतैलाचा आणि जुन्या ग्रीसपेंटचा.भिंती हलक्या समुंद्री हिरव्या रंगाच्या, थोड्या ठिकाणी रंग उडालेला. कोपऱ्यात एक गोदरेजची स्टील कपाट, टेबलवर एक लाकडी कंगवा, सिनेमा मासिकांची ढीग, आणि एक अर्धवट सुकलेली मोगऱ्याची गजरा.रेडिओवरून मंद तानपुरा वाजतो आहे. एका बाजूला १९७४चा..

दिनदर्शक—त्यावर पाकीज़ा मधील मीना कुमारीचा फोटो.

सुरभी..

कधीकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना..

आरशासमोर बसलेली. डोळ्यांखाली थोडासा काळसरपणा, पण काजळ अजूनही परिपूर्ण. साडी अर्धवट नेसलेली, केस अर्धवट खोचलेले. ती स्वतःच्या प्रतिमेकडे शांतपणे पाहते.

सुरभि (अंतर्मनात):"आरसा.. तो एक जणू न्यायाधीश झालाय माझ्या. चेहऱ्यावरची थकवा, डोळ्याखालीली ती बारीक रेषा, ओठांवरचा जुनाट लिपस्टिकचा रंग... सगळं काही सांगतो — २९वर्ष, पण ‘वेळ संपतेय सुरभि.’

ती हळूच आपल्या जबड्यावरून बोट फिरवते, मग हळूच हात मानेवरून हाडांवरून खाली.कधी गौरवलेलं ते अंगकाठी आज थोडं थकलेलं.ती एक खोल श्वास घेते.

सुरभि (आतल्या आवाजात - अंतर्मनात)(हसत-हसत, पण शांतपणे): "पूर्वी स्वप्नातलं रंगमंच... आता एकदम शांत झालंय. ती टाळी, ते शब्द, तो आविष्कार... सगळं काही थांबलेलं.".

"ती ‘लोकप्रभा’चं एक जुने मासिक तिच्या पिशवीतून उचलते. तिचा एक जुना फोटो—डोळ्यांत तेज, भरतनाट्यमच्या मुद्रेत.

लेखाचं शीर्षक: "हिंदी चित्रपट सृष्टीत मराठी नृत्य-रंगभूमीची उगवती तारका.".

ती एक हसू टाकते—थोडंसं उपहासात्मक.

सुरभि (अंतर्मनात): "ते दिवस वेगळेच होते… मराठी नाटक आणि सिनेमा यांना आत्मा होता.आता सगळे म्हणतात—‘हिंदी सिनेमात ग्लॅमर आहे, कलर आहे, स्टार्स आहेत’...आपण फक्त कला केली."

दारावर टकटक.मावशी (बाहेरून): “ताई, मेकअप तयार आहे का? शॉट लवकर आहे.”

सुरभि एकदम भानावर येते. ती साडी नीट लावते, केस खोचते, बिंदी लावते.नंतर ती आपले जुने घुंगरू काढतेजुन्या वापराने थोडे झिजलेले.ती दरवाजाकडे जाते, पण थोडक्यात थांबते. पुन्हा एकदा आरशात पाहते.एक शांत, पण स्वतःवरचा अभिमान असलेलं स्मित.

सुरभि (अंतर्मनात): "चालेल… कला आधी होती, आजही आहे...फक्त लोकांचं पाहण्याचं दृष्टिकोन बदललाय."

ती दरवाजा उघडते.प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडतो.ती शांतपणे बाहेर पडते, पुन्हा एकदा एक नव्याने रंगमंचाकडे.तिचा साधा कोपऱ्यावरचा शालू, नीटसा अंबाडा, आणि कपाळावर चंद्रकोर. खांद्यावर कापडी पिशवी, जिच्यात घुंगरूंची माळ आणि काही पुस्तकं आहेत.ती रंगमंदिरच्या दाराकडे जाते, जिथे तिच्यासारख्या आणखी काही तरुण नृत्यांगनाही आत जात आहेत. सर्वजणी एकसारख्या: कपासाचे कुरते, साड्या ओढणीसकट, आणि केस गाठ बांधलेले. त्यांच्या चालण्यात एक प्रकारची नम्रता आणि शिस्त आहे.

भिंतीवर पोस्टर्सची रांग..

एकामागोमाग एक – विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर..

एकेकाळच्या ख्यातनाम पण आता वयोवृद्ध नृत्यांगनेचा चेहरा, पूर्ण मुद्रेतील भरतनाट्यम पोझमध्ये.सुरभि थोडा वेळ थांबून पोस्टरकडे बघते. तिच्या नजरेत थोडा अहंभाव मिसळलेला आदर.ती साइड स्टेजच्या दाराकडे वळते. तिथे बसलेला शिपाई वृत्तपत्र वाचत असतो.एक लहानशी, जुनाट ग्रीन रूम. भिंतीवर जुन्या आरशांचे तुकडे, आणि एका कोपऱ्यात हरिपाठाचा आवाज चालू आहे.सुरभि आणि पाच तरुण नृत्यांगना सकाळच्या रियाझसाठी तयारी करत आहेत. कोणी केसांमध्ये मोगऱ्याची फुले खोवतेय, कोणी झिणझिणीत तेल लावतेय, कोणी घुंगरूच्या दोऱ्या शिवतेय, तर कोणी बाम लावतंय.सुरभि आपले नवे घुंगरू काढते, त्यांना थोडा वेळ हातात धरून बघते, जोड जोडीच्या पायताणाकडे (घुंगरूच्या पादत्राणांकडे) पाहत, काही क्षण त्या नाजूक सौंदर्याचा विचार करते, आणि मग कात्रीने त्यांचा पुढचा भाग कापते. आणि मग अलगद घोट्याच्या संरक्षकाला शिवायला सुरुवात करते.

पार्श्वभूमीला दोन मुली 

मनीषा (थोडी टीकाटिप्पणी करणारी) आणि सुषमा (बंगळुरूहून नुकतीच आलेली) 

कुजबुजत आहेत.मनीषा (हळू आवाजात): "अजूनही स्टेजवर येतेय बघ…"

सुषमा (हसत): "हया पिढीची विठाबाई आहे ती… सहज सोडेल का?"

मनीषा: "तिचे हिंदी चित्रपट चालतात ना पण नृत्य कार्यक्रम आता कुणी पाहतच नाही. सुदर्शन मध्ये तर अर्धं प्रेक्षकही नव्हतं."

नृत्यांगना १: "लोक आता हिंदीत मुमताज बघू लागलेत. क्लासिकल हिंदी तर आता मरत चाललंय. लोकांना फक्त चित्रपट गाणी हवीत."

मनीषा: "छान! परवा हंसा वाडकरचं कथक बघायला सगळा पुणे आलं होतं म्हणे!"

सुषमा::"आता वेगळं काही करायला हवं."मनीषा"नाही! नवीन कोणीतरी यायला हवं."

नृत्यांगना १: "कोण?"

मनीषा: "कोणी तरी, जी रियाझ करण्यासाठी बाम किव्हा विक्सवर अवलंबून नाहीये."

(सर्वजणी सूरभिकडे बघत खसखसून हसतात.)

सुरभि (शांतपणे, मनापासून): "मला वाईट वाटतं."

मनीषा: "कशाचं?"

सुरभि: "विठाबाई म्हणजे एक काळ होता… तिचं अभिनय, तिचं अभिनयम "अप्रतिम!"

सुषमा: "माझी आजी पण सुंदर लावणी करत होती, तरी आम्ही तिला स्टेजवर नाही आणत."

सुरभि (ठामपणे): "बालासरस्वती तर साठीतही नाचल्या होत्या…"

मनीषा (डोळे फिरवत): "हो हो, माहिती आहे.. ते आम्ही ऐकलंय…"

सुरभि (थोडी रागात): "मग माहित असेल, कला टिकते"

सुषमा (जागा सोडून सामोर येत थोडी): "हो, नक्कीच टिकते, पण कलाकार तितकं टिकत नाहीत. कित्येक येतात आणि कित्येक जातात, मग दिसेनासे होतात"

सुरभि थोडी चिडते आणि घुंगरू जमिनीवर जोरजोरात आपटते, आवाज खोलीत घुमतो. तिच्या तश्या प्रतिसादाने सगळे पुन्हा आप आपल्या तैयारीकडे लक्ष देऊ लागतात..

सुरभि (सर्वांना ऐकु येइल असे): "कधी वाटतं, माझं अस्तित्वच पुसलं जातंय — हळूहळू, चिमटीने. कुणाच्याही लक्षात न येता.काही तरी हरवलंय... कदाचित ते मीच आहे..."

मनिषा (पुढं येऊन सुरभिच्या जवळ येऊन बसत): "कधी काळी जे पाऊल जमिनीवर आपटल्यावर आवाज घुमायचा, आज तेच पाऊल जड झालंय. तु यश बघितलं पण मी मात्र अजूनही 'आवाज पक्का कर' म्हणणाऱ्या उस्तादांच्या सावलीतच अडकल्ये. शरीर बोलतंय — ‘थांब आता.’ पण मन?"

सुरभि (स्वतःला सावरत): "मन... माझं मन .. ते अजूनही म्हणतंय — ‘एक संधी हवी... शेवटची'"

अचानक तिची नजर दरवाजाकडे वळते. तिथे एक नवीन मुलगी उभी आहे

उंच, आत्मविश्वासपूर्ण. सूटमध्ये, ओठांवर गडद लिपस्टिक, आणि केस मोकळे.ती इतरांपेक्षा वेगळी आहे

गूढ आणि मोहक.सुरभि तिच्याकडे बघत थांबते. काही क्षण.

दारात एक नवीन मुलगी उभी आहे — "नवीन मुलगी",

वेगळीच थाट... चेहऱ्यावर गडद मेकअप, केस मोकळे सोडलेले, डोळ्यांत एक जिद्दी तेज.

नवीन मुलगी (थोडं रुक्षपणे):

"एकल नृत्य करणाऱ्या मुली, तुम्हीच?"

बाकी मुली एकमेकींकडे पाहून हलकेच मान हलवतात.

नवीन मुलगी (थोडं हसत):

"छान. मी पण."

ती त्या सगळ्यांच्या मधून आपला झोका सांभाळत, खालच्या चटईवर बसते. नजरेत किंचित उपहास. कोणीच काही बोलत नाही.

नवीन मुलगी:" अगं, चुकीच्या बस-स्थानकावर उतरले. मग काय, चालतच यावं लागलं ७९ व्या गल्लीपासून!"

सुरभी आणि बाकीच्या मुली तिच्याकडे थोड्याशा विस्फारलेल्या नजरेने पाहतात.

सुरभी जरा गोंधळलेली. अशा बिनधास्त मुलीचा इतका सहज वावर तिला नवीन आहे.

नवीन मुलगी हसते आणि आपली पायजमा घालण्यासाठी तयार व्हायला लागते. ती सगळ्यांच्या  नजरा टिपते, ओठावर थोडसं विजयी स्मित उमटवत, आपल्या पिशवीतून सहजतेने एक रंगीत पायजमा काढते. तिने नजरेत काहीही न लपवता तो चढवायला सुरुवात केली  

जणू तिला कोण काय म्हणतंय, याचा काहीच फरक पडत नाही.

त्या क्षणी सुरभीचं लक्ष पूर्णपणे तिच्यावर केंद्रित होतं.

ती थांबते, हातातले घुंगरं थोडेसे सैल होतात. नजरेत एक मिश्र भावना — कुतूहल, थोडं अस्वस्थपण, आणि कुठेतरी नकळत असलेला आदर.

सुरभीला वाटतं: "ही मुलगी... अगदी वेगळी आहे. तिच्यात काहीतरी अस्सं आहे — शिस्त नाही, पण आत्मविश्वास आहे. मी इतकी वर्षं इथं नाचतेय, तरी तिच्यासारखी मोकळीक वाटली नाही कधीच..."

सुरभी हलक्याच उसास्याने पुन्हा आपले घुंगरं आवळते, पण आता तिच्या मनात नकळत काहीतरी हलून गेलं आहे...

सुरभि (ती पायजमा नेसत असताना ही तिला एकटक कुतूहलाने पाहत): "तुझं नावं काय"

नविन मुलगी (हलके स्मित देत)": रसिका, सातारातून फलटणची"

......

सुरभी आता नृत्यगृहात. झुंबराच्या प्रकाशात उजळलेलं. पारंपरिक संगीताच्या धीम्या लयीवर सर्व विद्यार्थी सराव करतायत. नृत्यानिर्देशक (गुरुजी) आदेश दणदणीत आणि तंतोतंत.

सगळ्या विद्यार्थ्यांसोबत वॉर्म-अपमध्ये मग्न.

गुरुजी समोर उभे — गंभीर, बारीक लक्ष देणारे.

गुरुजी अचानक तिच्या समोर येतात.

सुरभी दचकते — पण आता तिचा चेहरा जरा वेगळा आहे. रसिकाकडून आलेल्या खळबळीतून एक नवीन जाणीव जन्म घेत असते.

गुरुजी (धाडकन आवाजात): "पाठीवर ताण! उजवा पाय मागे. अर्ध-पद्मासनातून उभं राहा. हो, असं! आणि मग समपदं!"

(एका विद्यार्थिनीला ओरडत): "अगं, असं नाचतात का? नाचाच आत्मा कुठे आहे?"

सुरभी आरशात आपली हालचाल बारकाईने पाहते.

ती प्रत्येक हालचालीत परिपूर्णतेचा ध्यास घेतलेली आहे.

अचानक गुरुजी तिच्या समोर येऊन थांबतात.

सुरभी दचकते.

गुरुजी काही क्षण तिच्याकडे पाहतात — नजरेत अपेक्षा आणि थोडंसं कौतुक.

गुरुजींचा आवाज: "सैल कर! अंग सैल कर. नृत्य झऱ्यासारखं वाहायला हवं."

सुरभी गोंधळलेली. मान हलवत सूचनांचे पालन करायचा प्रयत्न करते, पण तिच्या हालचालीत अजूनही काहीसं तणाव आहे.

अचानक आजूबाजूच्या मुली आपल्या शाल, उबदार कुर्त्या, आणि पायघोळ वस्त्रं उतरवू लागतात.

सुरभी त्यांच्याकडे बघते — तिला समजतं की काहीतरी वेगळं घडतंय.

दरवाज्यातून कलागुरु 'रमाकांतजी देशपांडे' आणि दिग्दर्शक मगद सर प्रवेश करतात — गंभीर आणि कलात्मक चेहऱ्याचे, चेहऱ्यावर थोडा थकवा पण डोळ्यांत तेज.

त्यांचं अस्ताव्यस्त कुरळं केसांचं झूपड, ढगळ कुर्ता, आणि गळ्यात एक जुनं रेशमी उपरणं.

सगळ्या नर्तकी आपल्या देहबोलीत साक्षात साद घालू लागतात — कोणीतरी मान थोडी अधिक उंचावते, कोणाच्या हालचाली अधिक मोहक होतात.

देशपांडे गुरुजी हळूहळू नजरा फिरवत नर्तकांकडे पाहतात.

कुठे कुठे ओठांवर गूढ स्मित उमटतं, कुठे हलकीशी नजरानजर होते.

एका वयस्क नृत्यशिक्षिकेच्या गालावर हलकं चुंबन देतात. तिच्याही चेहऱ्यावर मृदू हास्य.

ते 'एकल नर्तकांच्या' ओळीसमोर येतात. सगळे स्तब्ध.

"देशपांडे गुरुजी (गंभीर स्वरात मुलींच्या ओळीकडे पाहत): "आपण सगळ्यांनी ही कथा ऐकलीय...

एक निष्पाप मुलगी — शकुंतला.

ऋषींच्या कुंजात वाढलेली, निसर्गाच्या कुशीत रमलेली.

तिचं मन निर्मळ होतं, तिचं प्रेमही शुद्ध होतं.

एक दिवस एक राजकुमार येतो — ती प्रेमात पडते.

पण काळ फसवतो. भाग्य हरवतं. आणि ती विस्मरणात जाते...

प्रेम होतं, पण त्यावर संशयाचं सावट पडलं.

तिच्या आठवणी उडून जातात — आणि उरते फक्त ती..

तिच्या प्रेमाची, तिच्या अस्तित्वाची, आणि तिच्या स्वत्वाची वाट पाहत.

मग काय?

प्रेम परत येतं — पण तोपर्यंत ती बदललेली असते.

ती फक्त शकुंतला नसते,

ती होते — स्वतःचं पुनर्जन्म घेणारी स्त्री...."

ते एका मुलीच्या खांद्यावर हलकं हात ठेवतात.

ती आनंदाने उजळते. तिला मगदसर कडे जाण्याचा इशारा करतात.

ते पुढे जातात. दुसरीकडे एका विद्यार्थिनीला स्पर्श करतात. तिला देखील जाण्याचा इशारा करतात.

हे जणू काही निवड प्रक्रिया असते.

सुरभीच्या श्वासांची लय बदलते.

तिला जाणवतं, काही तरी निर्णायक घडतंय.

ती नकळत त्यांच्याकडे पाहत राहते, काळजीत पण आशेने.

देशपांडे गुरुजी: "...आणि एके दिवशी तिच्या जीवनात तो राजपुत्र येतो.तो तिची सुटका करू शकतो असे तिला वाटते, तिच्या नृत्याला अर्थ देतो..."

ते सुरभीजवळ पोहोचतात.

ती नजरेखालून त्यांच्याकडे पाहते — आतून स्फूर्त, पण संयमित.

देशपांडे गुरुजी हलकंसं स्मित करतात... मान हलवतात...

...पण ते पुढे निघून जातात.

सुरभीच्या चेहऱ्यावर उमटलेली आशा हलकेच कोसळते. ती मनातच गप्प होते.

देशपांडे गुरुजी आता नवीन मुलीजवळ जातात.

सुरभीचं मन गडद ढगांसारखं — एक अनामिक अस्वस्थता,

जणू एखादं सुंदर स्वप्न मोडणार आहे....पण ते तिच्या खांद्यावर हात ठेवत नाहीत.

सुरभी आश्चर्यचकित. तिच्या चेहऱ्यावर एक क्षणभर हळुवार आश्वासक सावली उमटते.