चांगले संस्कारच माणसाला उच्च पातळीवर नेतात?
संस्कार....... म्हणतात की जिथे चांगले संस्कार असतात. तिथे लक्ष्मी व सरस्वती निवास करीत असते आणि जिथं कुसंस्कार असतात. तिथं तसं घडत नाही. जे सकाळी नित्यानं मदिराप्राशन करतात. तिथं लक्ष्मी जास्त काळ राहात नाही व मदिरा प्राशन करणाऱ्यांची समाजात इज्जतही नसते. लोकं त्याला वाईट म्हणतात. कारण सुरा ही समुद्रमंथनानातून दानवांना मिळाली. देवांना नाही. हे म्हणणं खरं आहे. त्यामुळे, ज्या घरी दारु व मांसाचं सेवन केलं जातं. तिथं लक्ष्मी टिकतच नाही. विद्याही कामात येत नाही. तशीच संगतही महत्वाची असते. आपली संगत चांगल्याशी असेल, तर आपली लोकं इज्जत करतात आणि वात्रटाशी असेल तर....... अशा कुटूंबाची हळूहळू अधोगती होते. जसा रावण. रावणाचा भाऊ कुंभकर्ण, रावणाची मुलं हे रावणासारख्या व्यक्तीमत्वाच्या सोबत होते. पर्यायानं रावणासोबत त्यांचाही नाश झाला. त्याबाबत आणखी एक उदाहरण पाहतांना सचीन तेंडूलकरचं पाहू.
सचीन तेंडूलकर, विनोद कांबळी व अनिल गुरव. हे तीन मित्र. अनिलला रिचर्डसनच म्हणायचे त्या काळात. एवढा तो चांगला खेळायचा. तसाच विनोद कांबळी. तोही सचीनपेक्षा चांगलाच खेळायचा. परंतु त्या दोघांजवळही संस्कार नव्हते. जे संस्कार सचीनजवळ होते. म्हणूनच सचीन टिकला व आजही टिकत आहे. सचीन कधीही दारुवर वा नशेवर असलेली जाहिरात करायला घेत नाही.
अनिल गुरव बद्दल सांगायचं झाल्यास त्याचं आयुष्य हे त्याच्या भावामुळं उध्वस्त झालं म्हणतात. त्याचा भाऊ हा क्रिमीनल डोक्याचा. ज्याला मदत करतांना तोही बदनाम झाला. हळूहळू त्याचं कॅरीअरकडे दुर्लक्ष झालं व सध्या तो मुंबईत लहानशा घरात राहतो. ज्याप्रमाणे रावणाला त्याचा भाऊ कुंभकर्णानं मदत करताच तोही मारल्या गेला. तसंच आयुष्याचं वाटोळं अनिल गुरवचं झालं. म्हणतात की सचीननं पहिली शंभरी अनिल गुरवच्याच बॅटनं केली. अनिल गुरव अशी बॅट वापरायचा की ज्या बॅटमधून सहजच रन निघत असत.
विनोद कांबळी हा सचीननंतर क्रिकेटमध्ये आला. परंतु तो अल्पावधीतच सचीनपेक्षा हिरो ठरला. त्यानं दोनवेळा लगातार मारलेले दोनशे रन आजही लोकांच्या स्मरणात आहेत. तो सहज रन काढायचा आणि तेही कितीतरी पटीनं जास्त. मग असा हा क्रिकेटचा हिरो. अचानक तो क्रिकेटमधून कसा बाद झाला? त्याला का बाद केले क्रिकेटमधून. त्याचं कारण आहे, त्याचा विवाह. त्यानं अशा मुलीशी विवाह केला की तो क्रिकेटमध्ये जायचा आणि ती बाहेर फिरायला जायची. ती अनैतिक मार्गानं चालायची. ज्यातून त्याला ते माहीत हचताच तो नशा करायचा. तेच ते विचार असायचे मनात. मग काय, त्यातून त्याचं लक्ष क्रिकेट खेळतांना विचलीत व्हायचं. याचाच अर्थ त्याला क्रिकेट काही जमायचं नाही. हळूहळू तो क्रिकेटमधून बाद होत गेला.
ही झाली संस्काराच्या बाबतीतील तीन मित्रांची गोष्ट. सचीन सात्विक होता. त्यानं, दारु, मांस याला हात लावला नाही व शिवलंही नाही. त्यानं कधी कुणाचा द्वेष केलेला नाही. विचार चांगलेच ठेवले आपले. कुणाचा राग केला नाही. प्रसिद्धीचा हव्यास केला नाही. तो सात्विक जगला. म्हणूनच तो महान झाला. याऊलट अनिल गुरव व विनोद कांबळी. ज्यांनी निरनिराळी व्यसनं केली. दारु, मांसच्या आहारी गेलेत. आपल्या मनात वाईट विचार ठेवलेत. द्वेष केला. ज्यातून ते उच्चकोटीला पोहोचू शकले नाहीत. त्यांची अधोगतीच झाली.
क्रिकेटमध्ये अनेकजण आले आणि चांगले चांगले खेळाडू आले. परंतु दोन पैसे जास्त मिळताच त्यांना हवा लागल्यागत त्यांनी आपला मार्ग बदलवला. ज्याची परियंती त्यांची अधोगती होण्यात झाली. उदा. अजय जडेजा व पार्थीव पटेल.
हे झालं क्रिकेटचं. सामान्य जगतातही असंच घडलं. महात्मा गांधींनी विदेश सोडल्यानंतर सत्याचा मार्ग अनुसरला. मांस, मदिरेला शिवलं नाही. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर की ज्यांच्या जीवनात ते जेव्हा वयात आले. तेव्हा मांस, मदिरा नसेलच.
विशेष सांगायचं म्हणजे जर माणसाच्या आयुष्यात सात्विकता नसेल तर संस्कारही नसतील आणि संस्कार नसतील तर लोकं आपोआपच त्याच्या दूर जातील आणि लोकं दूर गेले की त्याच्यापासून त्याची विद्वत्ताही दूर जाईल व विद्वत्ता दूर गेली की पैसा. साहजिकच फात्विकता व संस्कार नसतात, त्या घरी लक्ष्मी नसतेच आणि सरस्वतीही नसतेच.
आज आपण पाहतो की जी मंडळी दारु पितात. निरनिराळी व्यसनं करतात. विचार बरोबर ठेवत नाहीत ते. मांस खातात. त्यांच्याकडे कितीही उच्चश्रेणीची विद्वत्ता असेल तरी आपण विचारतो का त्यांना. दारु पिणाऱ्यांची कुणी इज्जत करतांना दिसतात का? तर त्याची उत्तरं नाही अशीच आहेत.
आजही आपण पाहतो की लोकं एका विशिष्ट समाजाच्या बाबतीत ताशेरे ओढतात. म्हणतात की त्या समाजातील लोकं नोकरीला आहेत. जरी त्यांची संख्या कमी आहे तरी. त्याचं कारण आहे, त्या समाजाचं वागणं. त्या समाजातील बरीचशी मंडळी कधी दारुला स्पर्श करीत नाहीत. मांस खात नाहीत. विचार चांगले ठेवतात. एवढंच नाही तर जास्त तिखट खात नाहीत की तमोगुण अंगात शिरेल. तोच समाज एखाद्यावेळेस भाजी अळणी झाल्यावर अळणीच भाजी खातो. कशाचीपण किंचीतही कुरकुर करीत नाहीत. असे ते वागतात. म्हणूनच असा विशिष्ट समाज वर जाणारच. यशाची शिखरं पादाक्रांत करेलच.
विशेष सांगायचं म्हणजे उच्चतम शिखर गाठायचं असेल तर आधी सात्विक बनावं लागतं. तरच उच्चतम शिखर गाठता येतं. त्यासाठी आपली संगतही चांगल्याच लोकांशी असायला हवी.
संगतीवरुन सांगतो. संगत चांगल्या लोकांशी असली तर आपलं चांगलंच होणार. वाईटांशी असली तर आपलं चांगलं होत नाही. कधी हंसानं कावळ्याशी संगत केली तर हंस चांगला असूनही त्याची हत्या होते. कावळ्याची होत नाही. अन् संगत जरी आपली कावळ्याशी असेल तरी आपली सात्विकता सोडायला नको. जरी हंसासारखा मृत्यू आला तरी. कारण वरील कथेत हंस मरणागती जरी गेला असेल तरी तो अमर झाला. कावळा अमर झालेला नाही.
महत्वपुर्ण बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे की संस्कारात सात्विकता महत्वाची असते. ती जर नसेल तर आपल्याजवळ पैसा व विद्या येत नाहीत. हा निसर्गनियम आहे. शिवाय जरी तसा पैसा आलाच तर तो पैसा व ती विद्या नष्ट व्हायलाही वेळ लागत नाही. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्कार व सात्विकता महत्वाची असते. तरच लक्ष्मी व सरस्वती टिकते. अन्यथा नाही. शिवाय चांगले संस्कारच माणसाला उच्च पातळीवर नेत असतात. कुसंस्कार संस्कार नाही. हे तेवढंच खरं. तेव्हा आपण आपल्यात चांगलेच संस्कार रुजवावेत. कुंसंस्कार नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०