Kelyane hot aahe re aadhi kelechi pahiche in Marathi Magazine by Ankush Shingade books and stories PDF | केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे

Featured Books
  • DIARY - 6

    In the language of the heart, words sometimes spill over wit...

  • Fruit of Hard Work

    This story, Fruit of Hard Work, is written by Ali Waris Alam...

  • Split Personality - 62

    Split Personality A romantic, paranormal and psychological t...

  • Unfathomable Heart - 29

    - 29 - Next morning, Rani was free from her morning routine...

  • Gyashran

                    Gyashran                                Pank...

Categories
Share

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे

4. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे

कोणतेही काम करीत असतांना एक श्लोक नेहमी आठवतो, त्या श्लोकात रामदास स्वामी म्हणतात. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. बरोबर आहे. कोणतेही काम केल्याशिवाय फळ मिळत नाही.

आम्ही काम करतो. नव्हे तर आम्हास ती कामे करावीच लागतात. अगदी बालवयापासून. पण काही काही लोकं अशीे असतात की त्यांना कामंच करायला आवडत नाही. कारण त्यांना कंटाळा येत असतो. काही काही लोकं मात्र भाग्यवानही असतात. त्यांना वाडवडीलोपार्जीत कमविलेल्या संपत्तीने त्यांना कामाला जावेच लागत नाही. नव्हे तर जास्त काम करावे लागत नाही. कारण त्यांच्या हाताखाली नोकर असतात. ते आळशी नसतात काही अपवाद सोडले तर.

श्रम ही पुजा आहे. श्रम करावे. जो करीत नाही. त्याच्या मागे असंख्य आजार लागलेले असतात. त्या आजारातून सुटका नाही. ज्यांना आम्ही भाग्यवान समजतो. अशी माणसे स्वतःस मात्र भाग्यवान समजत नाही. कारण त्यांना वेगवेगळ्या असाध्य रोगानं छळलेलं असतं. कोणाला ह्रृदयविकाराचा त्रास असतो. तर कोणी शुगर. कोणी कँन्सरचेही शिकार असतात.

कालपरवाला मरण पावलेले इमरान व ऋषी कपूर. काय कमी आहे त्यांच्या घरी. तरीही कँन्सर आणि ह्रृदयविकार. देशातले असे काही हिरो आहेत की ज्यांना रोगानं छळलं आहे. पण सोनाली बेंद्रे - कँसर

अजय देवगन - लिट्राल अपिकोंडिलितिस

(खांद्याचा गंभीर आजार)

इरफान खान - कँसर

मनीषा कोइराला - कँसर

युवराज सिंह - कॅन्सर

सैफ अली खान - हृदय घात

रितिक रोशन - ब्रेन क्लोट

अनुराग बासु - खूनी कँसर

मुमताज - ब्रेस्ट कँसर

शाहरुख खान - 8 सर्जरी

(गुडघा कोहनी, खांदा इत्यादी)

ताहिरा कश्यप (आयुष्मान खुराना ची पत्नी) - कँसर

राकेश रोशन - गळ्या चा कँसर

लीसा राय - कँसर

राजेश खन्ना - कँसर,

विनोद खन्ना - कँसर

नरगिस - कँसर

फिरोज खान - कँसर

टोम अल्टर - कँसर.. .

ही सर्व मंडळी अशी आहेत की ज्यांचं जेवन सर्व आहार व जावनसत्वानं युक्त आहे.. त्यांचा उपचारही वेळोवेळी होत असतो. तसेच त्यांच्या जवळ पैसाही भरपूर. तरीही ते स्वस्थ नाहीत. कारण श्रम. ते जास्त मेहनत करीत नाहीत. घरी नोकर चाकर असतात छोटी छोटी कामं करायला. मग असाध्य रोग होणार नाही तर काय?शिवाय खायला फास्टफुड असतं. ही मंडळी दूध पितात. तसेच एसीच्या हवेत राहतात. सगळं कुत्रीम. कारखान्यात काम करणारा मजूर आरोेग्याच्या दृष्टीनं कणखर असतो. तर शेतात काम करणारा शेतकरीही आरोग्याच्या दृष्टीनं सक्षम असतो.

आम्ही आजही मेहनत करायचे सोडून या कुत्रीमतेच्या नादी लागलो. आम्हाला आज नोकर हवा. कामं करण्यासाठी यंत्र हवं. कपडे धुवायला वाँशिंगमशीन अन्न ठेवायला फ्रिज, हवा घ्यायला पंखा, कुलर, एसी. आता खाली सारवण करावं लागत नाही. नाही सडा टाकावं लागत. भांडे धुवायला मोलकरीणच असते. आजार होणार नाही तर काय?कारण शरीराची मेहनतच होत नाही. तसेच कामं करायला जास्त वाकावं लागत नसल्यानं शरीराच्या संपुर्ण भागाची मेहनत होत नाही. मग परीणामी आम्हाला कितीही चांगली खुराक मिळत असली तरी ती खुराक आमचं आरोग्य टिकवीत नाही.

चांगलं आरोग्य हे चांगलं जिनस खाल्ल्यानं मिळत नाही, तर ते श्रमानं मिळत असतं. आम्ही श्रम जर करीत नसेल आणि जेवायला कितीही चांगलं जीवनसत्वयुक्त आहार वापरला तरीही आम्हाला चांगलं आरोग्य प्राप्त होणार नाही. त्यासाठी श्रमाची गरज असते. पण श्रमाबाबत आम्ही विचार करतांना आमची योजना चुकते. करुच्या चक्करमध्ये राहूनच जाते. कधी आळसपणा येतो. तर कधी आमची लाज आम्हाला खाते. कधी आमची श्रीमंती आमच्यात अहंकार उत्पन्न करते आणि तिथूनच मग आमच्या आरोग्याला आजाराचं खतपाणी मिळून आमचं आयुष्य समाप्त होतं.

हं, कोणीही म्हणत असतील की श्रम करा अगर नका करु. मरण हे येणारच. मरणानं कोणाला सोडलेलं नाही. बरोबर आहे. पण त्यासाठी श्रम करु नये काय?अन् तुमचा आजार बरा नाही. तुम्ही तर आजारी असता. त्यात तुम्हाला इंजेक्शन, सलाईनचा, दुखणे याचा त्रास होत असतोच. पण तुमच्याबरोबर जो तुमची सेवा करणा-या तुमच्या नातेवाईक, शेजारी पाजारी यांना त्रास होतो ना. तो बरा नसतो. कधीकधी याच शेजारी माणसाच्या तोंडून शापवाणी ती शापवाणी बरी नसते. म्हणून श्रम करा. घरातील छोटी मोठी कामं करा. त्यासाठी लाजू नका. श्रीमंतीनं माजू नका. मग व्यायाम नाही केला तरी चालेल. तुमचं आरोग्य चांगलं राहिल. पण त्यासाठी केल्यानं होत आहे. आधी केलेची पाहिजे हे ब्रीदवाक्य आचरणात आणा. नाहीतर श्रम करु करु म्हणता म्हणता दिवसं निघून जातील आणि मग तुम्ही आजाराचे शिकार व्हाल आणि शेवटी पश्चाताप करावा लागेल. त्यासाठी आधीच श्रम करण्यासाठी सावध झालेले बरे.