Guru changla asava in Marathi Magazine by Ankush Shingade books and stories PDF | गुरु चांगला असावा

Featured Books
  • DIARY - 6

    In the language of the heart, words sometimes spill over wit...

  • Fruit of Hard Work

    This story, Fruit of Hard Work, is written by Ali Waris Alam...

  • Split Personality - 62

    Split Personality A romantic, paranormal and psychological t...

  • Unfathomable Heart - 29

    - 29 - Next morning, Rani was free from her morning routine...

  • Gyashran

                    Gyashran                                Pank...

Categories
Share

गुरु चांगला असावा

9. गुरु चांगला असावा

आम्ही शाळेत जातो. अभ्यास करतो. आम्हाला आनंद वाटतो. आवडही वाटते. शिकावेसे वाटते. कारण आम्हाला आमचा शिक्षक आवडतो. हवाहवासा वाटतो. कारण तो चांगला असतो.

आम्ही निरीक्षणातून शिकत असतो. वावरत असतो. गुरूचं जेव्हा आम्ही निरीक्षण करतो, तेव्हा चांगल्या गोष्टी ज्या घ्यायला हव्या असतात. त्या घेतो. त्याचबरोबर वाईटही गोष्टी घेतो. आपल्या शिक्षकाचे खर्रा खाणे, दारु पिणे व्याभीचार करणे ह्याही गोष्टी आम्ही घेतो. कारण आमचा शिक्षक तसा असतो.

पुर्वी शिक्षक शिकवायचा आम्ही अनुकरण करायचो. त्यामुळं आम्हाला पावकी निमकी आठवणीत राहायची मोठे होईपर्यंत व म्हातारे होईपर्यंत. पण आज तसं नाही. आज साधे दहापर्यंत तरी विद्यार्थ्यांचे पाढे पाठ राहात नाही. कारण शिकवणं. आजचा आमचा शिक्षक अर्जुनाच्या द्रोणाचार्यासारखा आहे. आंबेडकराच्या गुरुजीसारखा नाही.

गुरु द्रोणांनी अंगठा मागितला विद्येच्या बदल्यात. विद्या ही एकलव्याने चोरुन मिळवली असं त्यांचं मत होतं. पण ज्या गुरुनं त्या विद्यार्थ्यांना शिकवायला नाकारलं. पण शिक्षणाची आस असलेल्या त्या बाळबोधांना कोण म्हणणार?ऐनप्रकारे एकलव्यानं घेतलेली शिक्षा गुरु द्रोणाच्या पक्षपातीपणाच्या आड आली आणि मग काय माझ्या अर्जुनापेक्षा एकलव्यानं श्रेष्ठ ठरु नये म्हणून अंगठा घेणे हा प्रकार का?तर तो भिल्ल जातीचा. इथेही जात आजवी आली. नव्हे तर भरदरबारात द्रोपदी हरण होतांना गुरु म्हणून दुर्योधनाला अडविण्याचे काम न करता गुपचूप बसून राहणे त्या राजपदाला शोभा देणारी गोष्ट नव्हती. हवे तर राजसभेचा त्याग करायला पाहिजे होता. तसेच अर्जुनाला प्रिय शिष्य मानूनही त्यांनी युद्धात भाग न घेता अलिप्त राहायला हवं होतं. पण त्यांनी धर्माचा पक्ष न घेता अधर्माकडून भाग घेतला. हिच गोष्ट आजच्या काळात गुरुंना लाजविणारी आहे. गुरु म्हटलं तर द्रोणाचं नाव लोकांच्या लक्षात येतं. आंबावडेकर बदलवून टाकून आंबेडकर करणा-या गुरुंचे नाव आम्हाला आठवत नाही. त्या गुरु द्रोणापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आबेडकरांचा गुरु चांगला की ज्यांनी शिकवलं जरुर त्याही भेदभावाच्या काळात. बदल्यात अंगठा मागितला नाही तर मध्यान्ह सुट्टीत बाबासाहेबांना जेवनही दिलं नव्हे तर स्वतःचं नावही दिलं.

बाबासाहेब अशाच गुरुंच्या हातातून बनले. नव्हे तर त्यांच्या क्रांतीकारी विचारसरणीचा बाबासाहेबांवर परीणाम झाला.

आमचा गुरु म्हणून सन्मान व्हावा. पण सन्मान केव्हा होईल. जेव्हा आम्ही गुरुच्या पदाला न्याय देवू. कोणासमोर खर्रा, दारु, सिगार ओढणार नाही. व्याभीचार करणार नाही. तेव्हाच आपले विद्यार्थी आपली मान राखतील. आमच्या प्रेमाच्या फुंकराने पुल देशपांडे चा झेल्या तयार होईल. शिक्षण वाघिणीचं दुध आहे असं मानतात. म्हणतात. पण केव्हा?ते जर विद्यार्थ्यांना चांगल्या गुरूच्या हातून मिळाले तर..... नाहीतर ते जर वाईट माणसाच्या हातून मिळाले तर हे वाघिनीचं दुध ठरणार नाही. तर ते विषच ठरेल. म्हणून गुरु चांगला असावा. गुणवान असावा. अवगुण असेल तर ते टाळावे व आपल्या अतर्मनात सद्गुणांची वाढ करावी त्याने. तेव्हाच ख-या अर्थानं चांगले विद्यार्थी घडतील यात शंका नाही.