****************** १० *******************
ती सरकारी नोकरी. तिचा त्रास सृष्टी व प्रभासलाही झाला होता, ते नोकरीवर असतांना. आज त्याच सरकारी नोकरीच्या त्रासातून ते घरी बसले होते ऐन वेळी. नवीन सरकारच्या नियमानुसार ना त्यांना पेन्शन मिळत होती. त्यातच त्यांचे हाल हे बघण्यासारखे होते. ज्यावेळेस त्यांची नोकरी सुटली होती. त्यावेळेस त्यांना कोणत्याही कामाची लाज वाटत होती. कामाची एवढ्या वर्षापासून सवय नसल्यानं कोणतंही काम करावसं वाटत नव्हतं. त्यानंतर जवळ जो काही पैसा होता, तो पैसाही त्यांनी नोकरीवर असतांनाच नोकरी टिकविण्यासाठी खटले लढतांना खर्च केला होता. परंतु जेव्हा ते टेटची परिक्षा आली. तेव्हा टेटच्या न्यायालयीन आदेशानं जबरदस्तीनं निवृत्त झाले. तेव्हा जी पी एफ मध्ये स्वतः त्यांनी जो पैसा गोळा केला होता, तो मिळाला होता, त्या पैशानं ते जगत होते. परंतु वाटत होतं की जर आपल्याजवळ गोळा असलेला पैसा असाच खर्च झाला तर एकवेळ अशी येईल की आपल्याला उपासाचे चटके शोषावे लागतील. म्हणूनच ते कोणताही अमेयसारखा उद्योग उभारायचा विचार करीत होते.
प्रभास त्यावर विचार करीत होता व तसा उद्योग उभारण्याचाही विचार करीत होता. कारण मुलं लहान लहानच होती व ती शिक्षणाची होती. तसा त्यांचा विवाहही जरा उशिराच झाला होता.
सृष्टीला आठवत होती समाजाची व्यवस्था. गतकाळात वाटत होतं की सरकारी नोकरी असल्यास समाज त्याला डोक्यावर घेवून नाचतो. विवाह करीत असतांना सरकारी नोकरी असणाऱ्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. परंतु तिच्याबाबतीत तसं काही घडलं नव्हतं. तिच्याशी तिचं वय झाल्यावर कोणताही तरुण विवाह करायला तयार नव्हता. जरी तिला सरकारी नोकरी असली तरी. त्यासाठी तिला प्रभासला विचारावं लागलं आणि प्रभासनं त्यावर होकार दिला.
प्रभासनं होकार दिला. कारण त्याला सरकारी नोकरी नव्हती. तसा त्याचेशी विवाह केल्यानंतर त्याला बरेच दिवस खालीपीली पोसावं लागलं. त्याला नोकरी त्याचा विवाह झाल्यानंतर लागली होती. तिलाही अपेक्षा होती की तिला सरकारी नोकरी असल्यानं सरकारी नोकरी करणाराच व्यक्ती विवाहासाठी मिळावा व त्याचेशीच तिचा विवाह व्हावा. परंतु जेव्हा तसं घडलं नाही. तेव्हा तिचा अपेक्षाभंग झाला. ज्यातून तिला नाईलाजास्तव बेरोजगार असलेल्या प्रभासशी विवाह करावा लागला.
सृष्टीला आठवत होता गतकाळ. गतकाळात तिला विवाह करतांना आलेल्या अडचणी. गतकाळात तिला विवाह जातीच्या तरुणांशी जुळला नाही. ती बरेच वर्ष राहिली. परंतु कोणताच जातीचा व्यक्ती तिला विवाहासाठी मागणी घालायला आला नाही. अन् जेव्हा आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव प्रभाससमोर ठेवला. तेव्हा तोही नकारच भरला होता. त्यातच तिनं त्याला गतकाळातील प्रेमाची आठवण करुन दिली. तेव्हा बऱ्याच प्रयत्नानं त्यानं होकार दर्शवला. तेही ती नोकरीवर असल्यानं. कदाचित त्याला वाटलं असेल की ही नोकरीवर आहे. मला ही पोसू शकते. तसाच काळ बदलला असल्यानं गतकाळात जेव्हा तिनं प्रभासशी विवाह केला. तेव्हा वाटलं होतं की समाज तिला स्विकारेल. कारण अलिकडील काळात असे प्रेमविवाह होत होते राजरोषपणे. असं वाटलं होतं तिला. परंतु ते गाव व ती गतकाळातील कितीतरी दिवसांपासून चालत आलेली परंपरा. जातीशीच विवाह करण्याची पद्धती. त्याच पद्धतीनं त्या काळातील प्रेमीयुगलांचा जीव घेतला होता. कित्येक आंतरजातीय विवाह करणारेही त्याच व्यवस्थेचे बळी ठरले होते. कित्येक मायबापांनी आपल्या स्वलेकरांना गावातच घरातल्या घरात मारुन टाकले होते व पुरावेही नष्ट करुन टाकले होते.
सृष्टीला आठवत होतं सगळं. आठवत होतं की जेव्हा तिनं प्रभासशी विवाह केला. तेव्हाही समाजानं रोषच दर्शवला होता त्यांचेवर. त्यांच्या घरावर समाजानं बहिष्कार टाकला होता. गावातील लोकं त्यांच्याशी बरेच दिवस व्यवहार करीत नव्हते. बोलतही नव्हते. कोणत्याच कामाची मदत करीत नव्हते. ते आपली झालेली वाईट अवस्था पाहून त्यांनी एकेकाळी गाव सोडून शहरात जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु प्रभासनं त्याला नकार दिला होता. म्हटलं होतं की आज तो बेरोजगार आहे. कदाचित त्याला नोकरी लागली की सगळं सुधारेल. परंतु जेव्हा प्रभासला नोकरी लागली, तेव्हाही गाव सुधारलं नव्हतं. गाव आंतरजातीय विवाहाला सहन करणारं नव्हतं. मग तो मुलगा कितीही चांगला का असेना.
सृष्टीला आठवत होता तो विवाहानंतरचा काळ. ज्यावेळेस शालार्थ आयडी घोटाळा उघड झाला होता व तिला वेतन नव्हतं. त्यावेळेस तिची फारच तारांबळ उडाली होती. ती तिचा पती व तिची आई, तिघेच घरात होते व त्यांची उपासमार होत होती. त्यावेळेस ज्या बहिणीचा विवाह तिनं करुन दिला होता. त्या बहिणी सधन असूनही घराकडे फिरकत नव्हत्या. ना तिचा भाऊही घराकडे फिरकत होता. सर्वांना जातीचा विवाह प्रिय होता.
सृष्टीनं केलेला आंतरजातीय विवाह प्रिय नव्हता. त्यातच प्रभासनं अमेयच्या सांगण्यावरुन तो कुवारा असतांना जो धंदा टाकला होता. तो त्यानं आंतरजातीय विवाह केल्यानं चालत नव्हता. त्यामुळंच त्यानं विवाहानंतर काही दिवसानं आपला धंदाच बंद करुन टाकला होता. तसं पाहिल्यास शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस येईल व आपलं वेतन बंद होईल. हे स्वप्नही ना तिनं पाहिलं होतं, ना प्रभासनं.
तिला आठवत होता तो शालार्थ आयडी घोटाळा. असाच घोटाळा सगळीकडं सुरु असतांनाच व त्यानंतर सृष्टीनं टाकलेला खटला सुरु असतांनाच त्याला नोकरी लागणं हे चांगल्या भाग्याचंच लक्षण होतं. तशी त्याला नोकरी लागली. ज्या नोकरीच्या पैशातून तिला खटला लढता आला आणि तो जिंकताही आला. कदाचित त्या काळात प्रभासला नोकरी लागली नसती तर परिस्थिती काहीशी वेगळीच असती. तिच्याजवळ पैसे नसल्यानं ना ती खटला भांडू शकली असती, ना तिला खटला जिंकता आला असता.
सृष्टीला आठवत होती, ती खटल्यानंतरची परिस्थिती. ती खटला जिंकली होती. त्यातच आता प्रभासलाही नोकरी लागली होती. परंतु समाजाची मानसिकता सुधारली नव्हती. आजही समाज त्यांच्याशी पाहिजे त्या प्रमाणात बोलत नव्हता. संपर्कही ठेवत नव्हताच. अन् ते नातेवाईक. त्यांनाही आंतरजातीय विवाहाचा विटाळ झोंबत होता. त्यांनी तर नातेवाईकाच्या कळपातून त्या दोघांनाही हद्दपारच करुन टाकलं होतं. जरी तिनं आपल्या बहिण व भावाचा विवाह करुन दिला असला तरी.
तिला आठवत होता त्या गावच्या लोकांचा व्यवहार. ते गाव व त्या गावच्या लोकांचा तो व्यवहार पाहून जेव्हा प्रभासला नोकरी लागली व सृष्टीही शालार्थ आयडी घोटाळ्याचा खटला जिंकली. त्यानंतर वेतनाचा प्रश्न मिटला. तद्नंतरचा काळात गावच्या अशा अनैतिक वर्तनानं पुर्ववत झालेल्या वेतनाच्या भरवशावर त्या दोघांनीही शहरात एक लहानसं मकान विकत घेतलं व ते गावातून शहरात स्थानांतरीत झाले. तेव्हा मात्र त्यांची परिस्थिती थोडीफार बदलली. नव्या ओळख्या होत गेल्या. समाजाची नवीन माणसं भेटत गेली. काही मोजके नातेवाईक घराकडे यायला लागले. एकंदरीत सांगायचं झाल्यास त्यांच्या कुटूंबात नवा उत्साह निर्माण झाला होता. मात्र तरीही तिच्या मनात एक खंत होती. ज्या बहिणींचे तिनं विवाह करुन दिले होते. तसाच स्वतःचा विवाह न करता ज्या भावाचा तिनं विवाह करुन दिला होता. ते भाऊबहिण आजही तिच्या घरी येत नव्हते. ते आईच्या मरणालाही आले नव्हते.
तिला आठवत होतं ते आईचं मरण. तिची आई जेव्हा मरण पावली. तेव्हा तिनं भावाला फोन लावला होता. तसा तो फोन तिच्या वहिणीनं उचलला होता. त्यानंतर तिनं आई मरण पावल्याची वार्ता तिला सांगितली. तेव्हा ती म्हणाली होती की ती वार्ता तिनं त्यांना सांगू नये. कारण तिची आई देखील त्यांच्या बिरादरीची राहिली नाही. जेव्हा तिनं आंतरजातीय विवाह केला. तेव्हा सारेच संबंध तुटले. तिनं जर आंतरजातीय विवाह केला नसता, तर कदाचित ते आईच्या मरणालाही आले असते. सारेच विधी त्यांनीच केले असते. तेच बोल होते तिच्या सर्वच बहिणींचे. तिच्या बहिणींनीही आईच्या मरणाला येण्यास नकारच दिला होता. म्हटलं होतं की आमच्या पतींना तुझ्या घरी येणं मान्य नाही. आता आमचे पतीच येवू शकत नाही तर आम्ही कसं यावं. आम्हाला संसार चालवावा लागतो. आमचं येणं आमच्या पतीला आवडलं नाही आणि त्यांनी आम्हाला सोडलं तर आम्ही कुठे जाणार. आम्ही काय खाणार. तेव्हा आम्ही येवू शकत नाही. त्यामुळंच मरण धोरण तिनंच आटोपवून टाकावं.
तिला आठवत होता तो आईच्या मृत्यूनंतरचा काळ. ती विचार करीत होती की ज्या आईनं त्यांना जन्म दिला. ज्या आईनं त्यांना लहानाचं मोठं केलं. ज्या आईनं त्यांना बहरवलं अन् ज्या आईच्या प्रेमाखातर तिनं स्वतः त्यांचा विवाह करुन दिला. त्या सर्वच भाऊबहिणीनं आईच्या मरणालाही न येणं. तिच्या पिंडाला न शिवणं. ही एक लाजीरवाणीच गोष्ट होती. कशीतरी तिनं आपल्या आईची मैयत आटोपवली होती. मात्र आजही तीच खंत व ती मनाची कुरकूर तिच्या मनात होती.
प्रभासबाबतही हेच घडलं होतं. प्रभासनं सृष्टीशी विवाह तर केला होता. परंतु खुद्द त्याच्या आईवडिलांनी त्याचेशी संबंध तोडले होते. त्यातच गावातच राहात असतांना त्याचे जेव्हा वडील मरण पावले. तेव्हा घरातील भावांपैकी कोणत्याच भावानं त्याला निरोप दिला नव्हता. शिवाय शेजारच्या गावातील एका व्यक्तीकडून त्याला माहीत होताच तो जेव्हा आपल्या वडिलांना पाहायला गेला. तेव्हा त्याला आपल्या वडिलांची मैयत पाहू न देता घरातील वडीलधारी सदस्यांनी हाकलून लावलं होतं. त्यातच घाटावरही त्याला दूरुनच मैयत करावी लागली होती, तेही गावातच राहून.
आज त्यांची परिस्थिती सुधारली होती. त्यातच शहरात त्यांनी एक चांगलं घर घेतलं होतं. परंतु सरकारी नोकरीतील परिस्थिती जैसे थे अशीच होती. नोकरीतही समस्याच समस्या होत्या. अन् आज नोकरी गेल्यावर तर महाभयंकर समस्या त्यांच्यासमोर निर्माण झाली होती.