Sarkari Nokri - 3 in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | सरकारी नोकरी - 3

Featured Books
Categories
Share

सरकारी नोकरी - 3

******************* ३ ********************

         आरक्षण काही लोकांना मिळालं होतं तर काही लोकांना आरक्षण नव्हतं. ज्यांना आज आरक्षण नव्हतं. तो समाज मागासलेला बनला होता व ज्यांना आरक्षण मिळालं होतं. त्यातील काही लोकं नक्कीच वर गेले होते. ज्यात आरक्षण असलेला समाज शिक्षीत होताच त्याला नोकरीत असलेल्या आरक्षणानं नोकऱ्याही लागल्या होत्या. ज्या सरकारी स्वरुपाच्या होत्या. परंतु त्यांना सरकारी नोकऱ्या जरी लागल्या असल्या तरी त्या सरकारी नोकऱ्या नोकरीवर असलेल्या वर्गाचे एवढे निकृष्ट हाल करीत होत्या की त्यांच्यावर नोकरी करुच नये. असं म्हणण्याची वेळ यायची. नोकरी करुच नये असं वाटायला लागत असे.
         आरक्षण असल्यानंच ज्यांना आरक्षण होतं, त्या सृष्टी व प्रभासलाही सरकारी नोकरी लागली होती. परंतु त्यांचे जे सरकारी नोकरीतून हाल झाले. त्यातून नोकरीच नको असंही म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली होती. 
        आरक्षण तमाम जातींना मिळालं होतं. ज्या जाती चामड्याचं काम करीत होत्या. ज्या जाती डोंगराळ भागात राहात होत्या अन् ज्या जाती भटकंती करीत होत्या. त्यांना आरक्षण मिळण्याचं कारण त्यांचं मागासलेपण. या जाती एवढ्या मागास होत्या की त्यांचा इतर लोकांना भेदभावच होत होता. ते त्यांचं पशुगत राहाणं त्यांच्या वाट्याला आलं होतं. प्रसंगी पशुंची घरात इज्जत होती व ही माणसं असूनही त्यांची घरात इज्जत नव्हती. शिवाय अन्न मिळत नव्हतं. अन्न मिळत नसल्यानं त्यांना अन्नासाठी वणवणच भटकावे लागत होते. 
         गाव तसं पाहिल्यास स्वावलंबी होतं. कृषक वर्ग म्हणजेच आजचे कुणबी, माळी वा मराठा समाज हा अन्न पिकवीत होता. असं अन्न पिकवितांना कृषक वर्गांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. पाऊस सतत पडत असल्यानं शेतात धान्याच्या मोडीवर मोडी होत. शिवाय त्या काळात ट्रॅक्टरचा शोध न लागल्यानं व शेतजमीन ओलीच राहात असल्यानं शेतजमीन वराणी येत नसे व शेतात वखर, नांगर फिरवायचा असल्यास फिरवता येत नसे. ज्यातून शेतात तण असायचं. शेतातील हे तण शेतातील मालाला मिळणारे पोषक घटक खावून टाकत. ज्यातून रोपं कुपोषीत व्हायची. ज्याचा परिणाम पीक पिकण्यात व्हायचा. 
          शेती पिकत नव्हती. पिकायचीही ती कमी प्रमाणात. अन् जे काही पिकायचं, ते पीक कृषीवर्ग स्वतःच्या खाण्यासाठीच वापरायचा. पैशाचा शोध लागला नसल्यानं धान्य देण्याची पद्धती होती. शिवाय शेतजमीन ही जमीनदाराच्याच ताब्यात असल्यानं पावसाच्या अतिवृष्टीनं कितीतरी हेक्टर जमीन ही पडीतच राहात असे. तशीच खालची माती वरखाली न आल्यानं शेतीचा पोत घसरत असे. तणनाशक औषधीचा शोध लागला नसल्यानं तण नष्ट होत नसे. त्यातच पिकांना लागणारे पोषक घटक पिकांसाठी अस्तित्वात नसल्यानं त्याचा परिणाम शेती न पिकण्यावर होत असे. शिवाय शेतमालावर जो आजार यायचा. त्याची तोड नव्हती. अन् बियाणांचीही अंकुरणक्षमता, रोगप्रतिकारकक्षमता अस्तित्वात नव्हती. त्यामुळं पिकणारं अन्नधान्य हे जास्त नव्हतं. 
          अन्न मिळत नव्हतं. त्यामुळंच लोकं झाडांचा पाला खावूनच वर्षानुवर्ष आपलं जीवन व्यथीत करीत होते. त्यांना अन्नच मिळत नसल्यानं ते मेलेल्या प्राण्यांचेही मांस खायचे. मग ते मांस कितीतरी दिवसाचे का असेना, गोठवून ठेवण्यासाठी पुरेसं साधन नसल्यानं ते सडलेले का असेना, लोकं खात असत. त्या मांसाची तीव्र वासही येत असे. परंतु भुकेसमोर ते सगळं पोटात जात होतं. त्या पोटातील भुकेनं सगळ्यांच्या नाकातील वासनळ्या बुजून गेल्या होत्या. चवीचा संबंधच नव्हता. केवळ पोट भरणं हाच एक एकमेव उद्देश होता. मात्र काही लोकांना हे मांस खाणं आवडायचं नाही. ती मंडळी झाडाचा पाला आणायचे. त्याला उकडवायचे व तोच उकलेला पाला अन्न म्हणून चवीनं खायचे. 
           समाजात वेगवेगळ्या जाती होत्या. त्यातील काही जाती म्हणजे विशेषतः तेली, माळी, कुणबी या जाती त्या काळात सधन जाती म्हणून गणल्या जायच्या, तर चांभार, महार, मांग, मेहतर, इत्यादी जाती या सधन नव्हत्या. त्यानंतर हाच वर्ग जेव्हा माधुकरी मागायला जायचा. तेव्हा माधुकरीत पुर्ण अन्न मिळायचं नाही. कधी भाजीच मिळायची तर कधी भाकरी वा भातच मिळायचा. त्यावेळेस ते अन्न जसंच्या तसं खाण्याची पद्धत रुढ झाली होती. जेव्हा एखाद्यावेळेस काहीच मिळायचं नाही. तेव्हा मृत प्राण्यांचे सडलेले मांस नाईलाजास्तव खाण्याशिवाय पर्याय नव्हता. तसं पाहिल्यास त्यावेळच्या चांभार, मांग, मेहतर, खाटीक वा महारांकडे शेतजमीनी नव्हत्या की ते त्यातून अन्न पिकवून अन्न मिळवून खावू शकतील. नाईलाजास्तव भीकही मागितली असतांना भीक न मिळत असल्यानं त्यांना मृत प्राण्यांचेच सडलेले मांस खावे लागायचे. ज्यातून ती मंडळी मृत प्राण्यांचे सडलेले मांस खातात. हे तथाकथित इतर समाजाला माहीत झाल्यानं त्यांना हीन वाटू लागलं व येथूनच तथाकथित समाज, ज्यांच्या शेतात अन्न पिकत होतं, तो समाज एकंदरीत दूर दूर राहू लागला. त्यांचा राग करु लागला आणि येथूनच निर्माण झाला भेदभाव. स्पर्शाच्या भावभावना. तो तिरस्कार की जो तिरस्कार आजही लोकांच्या अंतर्मनातून गेलेला नाही. लोकांना त्यांची त्यावेळची मजबूरी माहीत नाही की हा समाज अन्नासाठी किती झुजला. अन्न न मिळाल्यानं त्यांनी मृत प्राण्यांचं सडलेलं मांस खाल्लं. अशा लोकांनी आपल्याला स्पर्श करु नये. हा तद्नंतरच्या पिढीत आलेला विचार. जसजशा पिढ्या-पिढ्या होत गेल्या. तसतशी हीन भावना वाढत गेली. मग साहजिकच भेदभाव शिरला. जो आज वरवर गेलेला वाटत असला तरी अंतर्मनात आहे.
         हा समाज तद्नंतरच्या काळात पशुगतच राहायला लागला. त्यांची परिस्थिती कोणीच सुधरविण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांच्याबाबत भेदभावच मानत गेला इतर समाज. त्यात काही बंधनं टाकली. शिवाय त्या बंधनात वाढच केली. त्यामुळंच इतर लोकांना असं वाटायला लागलं होतं की हा समाज कधीच सुधरु शकत नाही. अन् ते सत्यही होतं.
           इंग्रज भारतात आले होते. त्यांनी सुधारणांचा विडा उचलला होता. हे बाबासाहेबांनी हेरलं होतं. त्यातच त्यांच्याबाबत इतर समाज भेदभाव करतोय. हे इंग्रजांनीही हेरलं होतं. इंग्रज मात्र भेदभाव करणारे नव्हते. ते फक्त राजकारण कसं करायचं यात माहीर होते. तसं पाहिल्यास ओबीसी समाज हा जास्त प्रमाणात भेदभाव करीत होता. कारण त्यांच्या घरी सर्वकाही होतं. तो समाज सुसंपन्न असा होता. तसं पाहिल्यास अस्पृश्य समाज हा त्यावेळेस भुताटकीच समाज होता. तो समाज कोणालाच घाबरत नव्हता. अगदी हिंस्र प्राणीमात्रालाही. त्यांच्यासाठी फक्त भूक महत्वाची होती. अशातच त्यांच्यामधील भुकेचा फक्त त्यावेळेसच्या राजेरजवाड्यांनी गैरफायदा घेतला. या समाजाला फक्त इस्तेमाल केलं. त्यांच्या भुकेची आग मिटवली नाही. तोच गैरफायदा इंग्रजांनीही घ्यायचं ठरवलं. बदल्यात पोटाला अन्न देवू असं ठरलं. नाईलाजास्तव लाचार असलेल्या या समाजानं इंग्रजांना मदत केली व आपल्यावरील भेदभावाची बंधनं काढून घेतली. त्यांनी थोड्याफार प्रमाणात सुरुवातीला इंग्रजांना मदत केली. परंतु त्यानं संपुर्ण समाज हा सुधरु शकला नाही. ज्यातून त्यांची परिस्थिती परिपूर्ण सुधारण्यासाठी गरज होती विशेष अशा प्रावधानाची. ज्याला आरक्षण हे नाव आहे. आरक्षणानं त्यांची परिस्थिती सुधारेल असं वाटल्यानं डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांचा समावेश आरक्षणात केला होता. तसं पाहिल्यास त्यातून समाज आरक्षण असलेले समाज वर गेल्यानं बाकी समाजानंही आरक्षण मागणं सुरु केलं होतं. त्यानुसार ओबीसी वर्गानंही आरक्षणाची मागणी करताच ओबीसी वर्गालाही आरक्षण मिळालं होतं. त्यातच ओबीसीला मिळालेलं आरक्षण पाहून मराठा समाजही आरक्षणाची मागणी करु लागला होता. त्यात त्याही समाजाला आरक्षण मिळालं होतं. परंतु ते आरक्षण त्यांना नको होतं तर आम्ही मराठा कुणबी जातीचे असून आमचा समावेश कुणबी जातीत करा. असं मराठा समाजाचं म्हणणं होतं. त्यासाठी मराठा समाज हैदराबाद गॅझेटचा हवाला देत होता.
          मराठा...... मराठा ही जात आहे असं कोणी म्हणत होते तर कोणी मराठा हा समुदाय आहे असं म्हणत होते. मराठा म्हणजे अठरापगड जातीनं बनलेला समाज. ज्याला समुदाय म्हणता येईल असंही म्हणत होते. परंतु लोकांच्या त्यावेळच्या नोंदी तपासताच मराठा ही एक वेगळीच जात होती. त्यातच हैदराबादच्या जाती जनगणनेत मराठा जातीचा समावेश झाला होता. फक्त स्वल्पविरामाचा फरक होता. लेखनकर्त्यानं नजरचुकीनं मराठा जात लिहिल्यानंतर स्वल्पविराम न दिल्यानं सर्व भानगड निर्माण झाली होती. ज्यातून मराठा वर्गातील काही मंडळी स्वतःला कुणबी समजू लागले होते, तर काही मराठे, तर काही मराठे कुणबी. तसा पुर्वीपासूनच मराठा समाज हा मागासलेला असल्यानं तो समाज स्वतःला कुणबी समजून आरक्षणाची लढाई लढत होता. 
           प्रभास हा जातीनं मराठा असलेला मुलगा. तो भरपूर शिकला होता. परंतु आरक्षण नसल्यानं त्याला नोकरी लागली नव्हती. तसं त्याला नेहमी वाटायचं की आरक्षण असतं तर तो लवकर नोकरीला लागला असता. परंतु त्याला आरक्षण नसल्यानं व नोकरी न लागल्यानं त्याला आरक्षण असलेल्या जातीवर राग येत होता व आपल्यालाही आरक्षण असायला पाहिजे होतं असं त्याला वाटत होतं.
           प्रभासची ती मैत्रीण. तिचं नाव होतं सृष्टी. ती गरीब होती. तशी ती अतिशय हुशार मुलगी होती. परंतु तिच्या हुशारकीला पाठबळ मिळत नव्हतं. तशा त्या घरात चार बहिणी होत्या. भाऊ जन्माला यावा म्हणून तिच्या वडिलांनी जन्माला घातलेल्या. ज्यात तद्नंतर भाऊ जन्माला आला. तरीही त्यांनी मुलं जन्मास घालणं बंद केलं नाही. अशातच ती गरोदर राहिली. मग काय, त्याच्या पत्नीला राग आला व ती आपल्या आईच्या घरी निघून गेली होती. परंतु काही काळानं संगनमत झालं व ती सृष्टीच्या वडिलाजवळ राहू लागली होती.
         सृष्टी तिचं नाव. तिचे वडील जास्त दारु प्यायचे. त्यातच ते जास्त बडबड करायचे. ज्याचा परिणाम अभ्यासावरही पडत होता इतरांच्या. तसा सृष्टीवरही त्यांच्या वागण्याचा परिणाम व्हायचा. परंतु ती डळमळली नाही. कारण तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक हे अतिशय सुंदर मार्गदर्शन करणारे होते. परंतु शिक्षक तरी मार्गदर्शन कितीसे करणार. शेवटी सगळं तिच्या घरच्या परिवारावर होतं. तसं आईला वाटायचं की मुलगी शिकावी. परंतु मुलगी शिकणार कशी? कारण घरात खाणारी तोंड भरपूर. त्यातच घरी दारु प्यायचा छंद. परिस्थिती सृष्टीची नाजूकच होती. अशातच ती हिंमत न हारता मोठी झाली व एक शिक्षिका म्हणून नोकरीत रुजू झाली होती. 
            सृष्टीला नोकरी लागताच तिनं आधी आपल्या बहिणीचे विवाह पार पाडले होते आणि तसे आपल्या बहिणीचे विवाह पार पाडत असतांना तिचंही वय विवाहाच्या वर झालं होतं. ते ढळलं होतं. त्यातच ज्यावेळेस तिचे वडील तिच्यासाठी रिश्ते आणत. ते तिला पसंत यायचे नाहीत. तसं पाहिल्यास तिचीही अपेक्षा होती की आपण विवाह एखाद्या नोकरी करणाऱ्या मुलाशी करावा.
            सृष्टीचा तो विचार. विवाह करायचा आहे तर नोकरी करणारा मुलगा आपल्याला मिळावा. परंतु तिला पाहायला येणारी मुलं ही नोकरी करणारी नसायची. त्यांच्याकडे शेतजमीन असायची. परंतु तिही थोडीथोडकीच. तसं पाहिल्यास तिच्या समाजात जास्त शिकलेले लोकं नव्हतेच. काही नोकरीला होते. परंतु त्यांनी विवाह केले होते. त्यातच सर्व रिश्ते सृष्टी नाकारत असल्यानं एक दिवस तिची आई म्हणाली,
            "बाळ, असे जर रिश्ते तू नाकारत जाशिल तर एक दिवस तुझ्या आयुष्यात असा उजाडेल की तुझ्याशी विवाह करायला कोणीच तयार होणार नाही व तू पडून राहशील."
              ते तिच्या आईचं बोलणं. त्यावर उत्तर देत ती म्हणाली,
               "अगं आई, मी कशी राहणार पडून. नोकरी करतेय."
             "नोकरी करतेय म्हणून काय झालं. हा विवाहाचा प्रश्न आहे. कुणी एखादा मुलगा पाहून ठेवला की काय?"
              "नाही. तसं नाही. परंतु आपल्या समाजात नाही मिळाला तर नक्कीच दुसऱ्या समाजाचा पाहावा लागेल." ती बोलून गेली.
             "कसं बोलतेय बेटा. आपल्या समाजात अशी रीत नाही. अन् दुसऱ्या जातीशी विवाह करायला बंधनच आहे बाळ आणि तू म्हणतेय की दुसऱ्या जातीचा मुलगा विवाहासाठी पाहावा लागेल म्हणून. नाही बाळ. भविष्यात जातीच्या भिक मागणाऱ्या मुलाशी विवाह करशील. परंतु दुसऱ्या जातीच्या मुलाशी विवाह करशील नको. नावही काढशील नको. नाहीतर तुझे वडील तुला मारुन टाकतील वा स्वतः तरी मरतील. तुला माझी शपथ आहे." 
           आई आपल्या प्रिय मुलीला बोलून गेली. तशी तिची आई तिला बोलून जाताच ती गप्प झाली. तसं पाहिल्यास सृष्टी ही नव्या काळातील होती. ती शपथ, देव, धर्म, या सर्व गोष्टींना थोतांड समजत होती. परंतु आईचा मान राखणं तिला गरजेचं वाटत होतं. त्यातच गरजेचा वाटत होता बाप. जो दारु पीत असला तरी बाप बापच होता तिचा. ती बापावर जास्त प्रेम करीत होती. कारण तिच्या वडिलांनीच तिला बोट धरुन शिकवलं होतं. ते तिला आठवत होतं. अन् आठवत होत्या त्या कटू गोड आठवणी. ज्या आठवणीत तिला वडिलांनी मदत केल्याचं आठवत होतं.
          काही दिवस तिचे बरे गेले होते. तसं एक दिवस वार्धक्यानं तिचे वडील मरण पावले व ती आणि आईच तेवढी राहायला लागली होती. शिवाय तिला वडिलांचा आधार नसल्यानं तिची होत असलेली तारांबळ. आईही म्हातारी झाली होती. तिलाही पोसायची जबाबदारी आता तिच्यावरच येवून ठेपली होती. बहिणी आपआपल्या घरी अगदी सुखात होत्या. त्यांचाही विवाह तिनंच करुन दिला होता. त्या तिच्याकडे ढुंकूनही पाहात नव्हत्या. 
          सृष्टीला एक भाऊही होता. त्याचाही विवाह तिनंच करुन दिला होता, स्वतःचा विवाह न करता. परंतु त्यानं आपल्या मायबापाची सेवा न करता आपली वेगळीच चूल मांडली होती. तसं पाहिल्यास तिला कोणाचाच आधार नव्हता.
          प्रभास तिला कधीकधी भेटायला यायचा. तिचे हालहवाल विचारायचा. परंतु विवाह करण्याविषयी बोलायचा नाही. कारण त्याला नोकरी नव्हती. त्यातच त्याला वाटायचं की आपण विवाह केल्यानंतर आपली पत्नी पोसायची कशी? त्यामुळंच कदाचित आपण विवाह तरी कसा करणार? तो प्रश्न त्यालाही होता. तशी त्याची सृष्टीशी विवाह करण्याची इच्छा होती. परंतु आता तो विचार करीत होता. महाविद्यालयातील काळ बरा होता की तो सृष्टीशी अगदी बिनधास्त मनमोकळेपणानं बोलायचा. परंतु आज त्याला तसं बोलताही येत नव्हतं. वाटत होतं की आपल्याशी विवाह करण्याबद्दल सृष्टीला विचारल्यास सृष्टी रागावेल व तिच्या घरी त्याला येणंही कठीण होवून जाईल. 
          सृष्टीलाही तेच वाटत होतं. परंतु तिला चिंता वाटत होती. जर तिची आई मरण पावली तर ती एकाकी होईल. तिचा आधार जाईल. अशावेळेस सोबती बरा. तसाच विचार करीत असतांना ती एक दिवस आपल्या आईला म्हणाली,
          "आई, मला विवाह करायचाय. तशी तू म्हातारी झाली आहेस. तुला वागवतही नाही. अन् ती तुझी मुलं तुझ्याकडे लक्षही देत नाहीत. ना तुझा मुलगा येत ना मुली येत. म्हणूनच मला आधार हवा आणि आधारासाठी तरी मला विवाह करायचाय."
          तो तिचा विचार. त्यावर तिची आई म्हणाली,
           "बाळ, तुला थांबवलं कोणं? तू केव्हाही विवाह करु शकतेस."
           "परंतु आई, मला आंतरजातीय विवाह करायचा आहे."
            "आंतरजातीय विवाह ! नको करु बेटा. तुझ्या वडिलांची इच्छा नव्हती."
           "हो खरं आहे. परंतु जातीतले लोकं तरी येवून राहिले का माझ्याशी विवाह करायला. नाही ना. मग जर कोणी माझ्याशी बाहेरच्या जातीतील व्यक्ती विवाह करायला तयार असेल तर काय चुकणार माझं. आई, काळ बदलला आहे व या बदलत्या काळानुसार लोकं आता आंतरजातीय विवाहही करु लागले आहेत. आता तरी सांग की मी आंतरजातीय विवाह करु की नाही?"
           सृष्टीनं आईला विचारलं होतं. त्यावर आई विचार करु लागली. विचार होता की कोणतीच जातीची मुलं तिच्याशी विवाह करायला येत नाहीत. मग ती विवाह तरी कसा करेल. शेवटी विचार करीत आई म्हणाली,
           "बाळ, जशी तुझी इच्छा. तुला जसं करायचं असेल तसं कर. तुला जो मुलगा आवडेल, त्याचेशी तू विवाह कर."
            सृष्टीची आई तिच्याशी बोलून गेली. तशी आईची परवानगी मिळताच तिला आठवलं ते महाविद्यालयीन जीवन. ज्या जीवनात प्रभास व ती सोबत सोबत जात असे. त्यावेळेस तो तिच्यावर प्रेम करु लागला होता आणि ते विवाहही करणार होते. परंतु लागलीच आज दुसरा विचार आला. आज प्रभास मोठा झालाय. तसे त्याचे विवाहाबद्दलचे संदर्भही बदलले असतील. त्यावेळच्या प्रभासचं ठीक होतं. परंतु खरंच आजचा प्रभास आपल्याशी विवाह करेल काय की नकार देईल विवाहाला. 
            तिचा तो विचार. त्यातच ती आणखी विचार करु लागली. आपण विचारुनच पाहावं प्रभासला. खरंच प्रभास आपल्याशी विवाह करायला तयार होतो की काय ते. तसा विचार करताच ती त्याला विचारण्याविषयी तयार झाली होती.
           सृष्टीचा विवाह झालाच नव्हता. तिची नोकरी सुरु होती. अशातच एक दिवस प्रभास तिच्या घरी आला. त्यातच तिनं हिंमत करुन त्याला विचारुनच पाहिलं. तसा तो म्हणाला, 
           "हे बघ, मला नोकरी नाही. मी तुझ्याशी विवाह केला तर रिकामाच असेल. ते तुला पटेल काय? शिवाय माझ्या जातीची माणसं. ते तुला बोल बोल बोलतील. तुला ते पटेल काय? या सर्व गोष्टी जर तू सहन करायला तयार असशील तर मी तयार आहे तुझ्याशी विवाह करायला. बोल तयार आहेस काय?"
            ते प्रभासचं बोलणं. त्यावर ती यथोचित तयार झाली होती व दोघांचाही थाटामाटात विवाह पार पडला होता. आता तो आणि ती सुखात होती. तसे दोनचार वर्ष अगदी सुखात गेले व दोनचार वर्षानंतर शालार्थ आयडी घोटाळा निघाला. मग जे जे दिलेल्या तारखेच्या नंतर लागले होते नोकरीला. त्याच शिक्षकांना धारेवर धरलं गेलं होतं. 
           शालार्थ आयडी घोटाळ्यात सृष्टीही सापडली होती. बिचारीनं काहीच पैसे संस्थाचालकाला दिले नव्हते तर संस्थाचालकानं स्वतः खिशातून पैसे टाकून तिची शालार्थ मान्यता आणली होती. परंतु दिलेल्या तारखेनंतर तिची नियुक्ती झाल्यानं तिही त्याच श्रेणीत आली. ज्या श्रेणीत इतर सर्वच शिक्षक आले होते.