*********** ८ ***************************
सृष्टीला शालार्थ आयडी घोटाळ्याची चिंता होती. तसे तिच्या नोकरीला तब्बल सात आठ वर्ष झाले होते. तशी तिला नोकरीही उशिराच लागली होती.
सृष्टीला लागलेली शालार्थ आयडी घोटाळ्याची चिंता. मोठमोठे अधिकारी पकडले जात होते. अशातच त्याची गाज शिक्षकांकडे फिरली. ज्यात सृष्टी सापडली. त्यातच तिची सुनावणी झाली व सुनावणीदरम्यान सृष्टी दोषी आढळली व तिची नोकरी गेली.परंतु तिला सारखं वाटत होतं, दोष आपला नाही. दोष आहे संस्थाचालकाचा. त्यांनी आपल्याला नोकरी दिली. हे खरं असलं तरी त्या नोकरीची मान्यता तिनं गैरव्यवहार करुन घ्या म्हटलेलं नाही. तसं संस्थाचालकानं तिला शाळेत घेतलं. त्याची दोन कारणं होती. एक तर ती महिला होती व दुसरं कारण होतं आरक्षण. आरक्षणानुसार शाळेत असलेली राखीव टक्केवारी पुर्ण करणं आवश्यक होतं. त्यातच ती अस्पृश्य असल्यानं संस्थाचालकानं तिला शाळेत घेतलं होतं. ज्यात त्यालाच लाभ झाला होता. तिला जे वेतन सुरु झालं होतं. त्या वेतनातील अर्धा भाग तिनं त्याला द्यावं. असा तो व्यवहार होता व आपल्याला निःशुल्क नोकरी मिळत आहे, या भावनेनं ती खुश झाली होती. त्यातच जेव्हा शालार्थ आयडी घोटाळ्यासंदर्भात चौकशी झाली. तेव्हा तिनं आत्मीयता बाळगून संस्थाचालकाला दोषी धरलं नाही आणि आपली नोकरी गमावली.
सृष्टीची नोकरी जाताच तिला विचार येत होते. कशीतरी नोकरी मिळाली होती तिला. तिही गमावली गेली होती. त्यातच विचार करता करता तीन महिने निघून गेले होते. नोकरी मिळण्याची संधी तशी कमी होती.
सृष्टी आज घराच्या बाहेर बसली होती. एकटीच होती. त्यातच तिला विचार आला होता. 'आपली नोकरी. आपल्या नोकरीत आपल्याला त्रास नव्हताच. किती सुख होतं आपल्याला आपल्या नोकरीत. परंतु त्यात संस्थाचालकाचा दोष नाही. त्यानं तर आपल्याकडून एक रुपयाही न घेता नोकरी दिली.'
तो तिचा विचार. तसा दुसरा विचार आला. विचार आला की तो संस्थाचालक. ज्या संस्थाचालकानं मला निःशुल्क नोकरी देवून उपकार जरी केले असले तरी त्यात त्यांचे दोन स्वार्थी हेतू होते. पहिला हेतू होता आरक्षण. ज्या आरक्षणानुसार रिझर्वेशन कोट्यातून उमेदवार भरणं आवश्यक होतं अन् महिला जास्त बोलत नसते म्हणून माझी नियुक्ती केली. मी दोषी नाही, कारण आरक्षण कोट्यातून उमेदवार त्यातही महिला तिही देण देणारी महिला मिळत नसेल, म्हणून माझी नियुक्ती. तसंच दुसरं कारण असेल ते कारण म्हणजे पैसा कमविणं. संस्थाचालकाला वाटलं असेल की असा देण म्हणून मिळणारा पैसा हा माझ्याकडून दर महिन्याला मिळेल. तसा पैसा त्यांनी लुटलाय व त्यांचं पोटंही भरलं आहे. आता त्यांचं काय कमी झालं आहे. त्यात कमी झालं आहे माझं. मी बिचारी अभागण आज नोकरी सोडून घरी बसली. जशी मी गुन्हेगारच आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध मी दादही मागितली नाही. खरं तर मी दोषी नसल्यानं माझ्या नोकरीसंदर्भातील खटला मी लढायलाच हवा.
तो तिचा विचार तोच तीन महिने झाले होते. जास्त वेळ झाला नव्हता. अशातच तिनं ठरवलं. आपली तक्रार न्यायालयात न्यावी. जे खरं असेल तेच वदावं. संस्थाचालक फसत असेल व आपली नोकरी वाचत असेल तर तेही करावं.
तो तिचा विचार. त्यातच तिनं एका वकीलातर्फे न्यायालयात खटला दाखल केला व सांगीतलं की मी दोषी नाही. दोषी आहे यंत्रणा. कारण यंत्रणेनं पैसा घेवून मान्यता द्यायला हवी नव्हती. त्यांनी पडताळणी करायला हवी होती.
तो तिचा खटला. तो खटला बरेच दिवस चालला. शेवटी त्यातून निष्कर्ष निघाला की त्यात दोष शिक्षकांचा नाही. दोष यंत्रणेचा आहे. यंत्रणा कोणती? तर ते अधिकारी. ज्यांना गलेलठ्ठ वेतन असूनही ज्यांनी पडताळणी न करता केवळ संस्थाचालकाच्या म्हटल्यानं मान्यता दिली. ते दोषी, कारण त्याच अधिकाऱ्यांनी अशा स्वरुपाची मान्यता जर नाकारली असती तर कदाचित अशा स्वरुपाचा शालार्थ आयडी घोटाळाच झाला नसता.
शालार्थ आयडी घोटाळा व्यवहारात संस्थाचालक व शालेय प्रशासनालाच दोषी धरण्यात आलं. त्याला हुंड्याचं प्रमाण देण्यात आलं व म्हटलं गेलं की हुंडा देणारा जसा दोषी, तसाच घेणाराही दोषी असतोच. त्यात शिक्षक म्हणजे माध्यम आहेत व त्या शिक्षकांचा अजिबात दोष नाही. त्यानुसार शेवटी तो निकाल सृष्टीच्या बाजूनं लागला व तिला शेवटी राहत मिळाली.
सृष्टी आपला खटला जिंकली होती. ती खटला जिंकल्यानं तिला नोकरीवरही घेतलं होतं. परंतु तिचे त्या खटल्याच्या माध्यमातून संस्थाचालकाशी संबंध वाईट झाले होते. कारण त्या खटल्यात त्यालाही दोषी ठरवून काही दिवसासाठी कैद झाली होती. बरेच अधिकारीही दोषी ठरले होते.
सृष्टी खटला जिंकताच परत आपल्या नोकरीवर रुजू झाली होती. मात्र तिच्या रुजू होण्यानं शाळा प्रशासन खुश नव्हतं. तिला तद्नंतर फार त्रास सुरु झाला होता. जरी तिचा दोष नव्हता तरी. तिचा खटला लढण्यानं तिचा संस्थाचालक तुरुंगात गेल्यानं शाळा प्रशासन तिलाच दोषी ठरवून तिच्यावर ताशेरे ओढत होता. अशीच नोकरी व संघर्ष करता करता वीस वर्ष निघून गेले होते.
ती परिस्थिती व त्या परिस्थितीशी लढत लढत सृष्टी आपलं आयुष्य काढत होती. त्यातच अशी परिस्थिती सांभाळून घेत घेत सृष्टी जगत होती आणि असं जगत असतांना सर्वोच्च न्यायालयानं एक जी आर काढला होता नव्हे तर शिक्षकांच्याच मुद्द्यावर एक महत्वपूर्ण निकाल दिला होता. तो निकाल होता टेट परिक्षा. टेट परिक्षा ही शाळेत लागलेल्या सर्व शिक्षकांनी द्यावी. अन्यथा घरी बसावे असं न्यायालयानं सांगीतलं होतं. त्यामुळंच टेट परिक्षा ही शिक्षकांचा जीव घेणार की काय? असं संबंध शिक्षकांना वाटू लागलं होतं. त्यातच सृष्टीलाही तसंच वाटायला लागलं होतं. त्याचं कारण होतं शिक्षकांना असलेला त्रास. शिक्षक रोज इमानदारीनं काम करणारे असूनही त्यांना शासन व्यवस्थित जगू देत नव्हतं. त्यातच संस्थाचालकही त्यांना त्रासच देवून त्यांच्याकडून त्यांना मिळणाऱ्या वेतनातून पैसा घेत असे. ही गुंडेगिरीच होती. मात्र संस्थाचालकाला कोणीच बोलत नव्हतं. शासनही ऑनलाईन कामाचा तकादा लावून शिक्षकांना छळतच होतं. त्यातच शिक्षकांना वेगवेगळ्या कामाला लावत होतं.
ती टेट परिक्षा, शिक्षकांचा जीवच घेणार. अशी भीती आज वाटायला लागली होती. त्याचं कारण होतं, शिक्षकांची अभ्यास करण्याची तुटलेली सवय व त्याला पुरेसा वेळ न मिळणे. ज्यातून शिक्षण सुटल्यानंतर परिक्षेचा अभ्यास करणं जडच जाणार असून शिक्षक टेट परिक्षा पास होतीलच याची शाश्वती नव्हती. ज्यातून शिक्षकांना दोन वर्षानंतर नोकरी जाईल ही भीती होती. कारण टेट परिक्षा पास करण्यासाठी दोनच वर्षाची सवलत होती. दोन वर्षात टेट परिक्षा पास न झाल्यास संबंधित शिक्षकांना नोकरीतून डच्यू देण्याची भुमिका न्यायालयानं आपल्या निकालात मांडली होती. न्यायालयानं टेट संबंधाने दिलेला निर्णय न्यायालयाला रास्त जरी वाटत असला तरी तो शिक्षकांच्या जीवावरच बेतणारा होता. त्यामूळं याचा न्यायालयानं विचार करावा व त्यातील परिक्षेच्या अटी बदलवाव्यात. असं सृष्टीला वाटत होतं.
सृष्टीला वाटत होतं की एक शिक्षक. ज्याला कधी मजूर समजून अपमान केला जातो तर कधी त्याला वेगवेगळी कामं देवून अपमान केला जातो. तरीही तो अपमानास्पद वागणूक जगूनही ती सहन करतो. आता न्यायालयानंही अपमान केल्यासारखाच टेट परिक्षेचा निकाल दिलेला आहे व हा जरी न्यायालयाला चांगला निकाल वाटत असला तरी त्या निकालानं शिक्षकांचा अपमानच नाही तर जीव घेण्याचा प्रयत्न झाल्यासारखं वाटत आहे.
शासन तर शिक्षकांना वेगवेगळ्या कामाला लावून छळत असतं. शिवाय संस्थाचालकही शिक्षकांचा छळच करतो. अन् आता नुकत्याच जाहीर झालेल्या न्यायालयाच्या निर्णयानं असं वाटायला लागलं आहे की न्यायालयही आता शिक्षकांना छळायलाच लागलं आहे.
ती टेटची परिक्षा. सृष्टीला वाटत होतं की ही परिक्षा शिक्षकांची योग्यता परिसिद्ध करणारी परिक्षा आहे. परिक्षा असायलाच हवी. त्याशिवाय कोणत्याही व्यक्तीची योग्यता सिद्ध केली जात नाही. सिद्ध होत नाही. त्यातच जशी विद्यार्थ्यांच्या बाबतीत परिक्षा योग्य आहे. तशीच परिक्षा शिक्षकांसाठीही योग्य आहे. अन् ती असावी. त्यामुळंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकेची सुनावणी करतांना त्या स्वरुपाचा महत्वपुर्ण निर्णय दिला.
शिक्षकांचीही परिक्षा असावीच. कशासाठी तर त्याला देय असलेल्या महत्वपुर्ण गोष्टी त्याला प्रदान करण्यासाठी. आजच्या काळात ते अतिशय गरजेचे आहे. परंतु ती परिक्षा कोणासाठी असावी? तर ती परिक्षा असावी, त्या शिक्षकांसाठी असावी. ज्यांना लाभ हवे असतात. ज्यांना पदोन्नती हवी असते. त्यातच अशा परिक्षेनं जे योग्य असतील. त्यांनाच पदोन्नती असावी. कारण असं न केल्यास पदोन्नतीच्या स्थानावर असेही व्यक्ती बसू शकतात की ज्यांची त्या पदावर बसण्याची योग्यताच नाही.
टेट परिक्षा असावी व प्रत्येक शिक्षकांनीच द्यावी. परंतु केव्हा? जेव्हा त्याला नोकरीवर लागायचे असेल तेव्हा. मात्र ही परिक्षा न्यायालयीन निर्णयानुसार नोकरीची अर्धी हयात गेल्यावर घ्या असू न्यायालय याचिकेत म्हणत असून ज्या वयात परिक्षेचा अभ्यास करण्याची सवय तुटली आहे, ज्या वयात परिक्षेला पुरेसा वेळ नाही. त्या वयात द्यायची आहे. शिवाय ही परिक्षा पास न झाल्यास नोकरी गमाविण्याची चिंता आहे. म्हणूनच शिक्षकांची चिंता वाढली आहे.
टेट बाबत सांगायचं झाल्यास टेटनं फायदा त्या शिक्षकांचा होईल. ज्या शिक्षकांची पदोन्नती शाळा संस्थाचालक नाकारतात व आपल्याच नातेवाईकांना पदोन्नती देत असतात. शिवाय अशाही लोकांसाठी योग्य आहे की जे संस्थाचालकांचे नातेवाईक नसतात वा जवळचे नसतात.
टेटची परिक्षा देणे व पास करणे म्हणजे योग्यतेला संधी देणे होय. जो योग्य असेल व पात्र असेल तो त्या योग्यतेत बसविणे असून आता मुख्याध्यापक पदावर तोच व्यक्ती बसेल की जो जेष्ठ नसेल व ज्युनियर असेल. अन् काही अंशी शासन तेच योग्य मानत आहे. परंतु असे असले तरी टेट परिक्षा कोणासाठी योग्य असावी. याचा साधा विचारही सर्वोच्च न्यायालयानं केलेला नाही.
सर्वोच्च न्यायालय, अशी एक संविधानीक तरतूदीतून निर्माण झालेली व देश चालविणारी सक्षम असलेली यंत्रणा की जी गुन्ह्यांवर नियंत्रण आणू शकते. त्यातच असेही निकाल देवू शकते की जे निकाल देशाला बदलवू शकतात. त्यांनी दिलेले निर्देश हे ठोस आणि सक्षम असे असून ते शक्यतोवर बदलविण्याची गरज राहात नाही अन् राहूही नये. असं असल्यानं सर्वोच्च न्यायालय हे कोणतेही उटपटांग निर्णय घेत नाही की ज्या निर्णयावर लोकं ताशेरे उठवतील. असाच टेटचा निर्णय. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. ज्या निर्णयावर देशातील सर्वच नोकरीला लागलेले शिक्षक ताशेरे ओढत आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. त्या टेट च्या अशा निर्णयानं संबंध देशातील सर्वच शिक्षकांच्या नोकऱ्या संकटात आलेल्या आहेत. त्यातच अशी टेट परिक्षा पास करा, नाहीतर घरी बसा अशाच स्वरुपाचा तो आदेश आहे. त्यामुळंच शिक्षकांना त्या निर्णयावर विचार करायला लावलाय. कारण ज्याचे वय वर्ष चाळीसच्या वर आहे. ज्यांना लाढत्या वयाबरोबर विस्मरणाची सवय जडतेय.
न्यायालयानं शिक्षकांनी टेट परिक्षा द्यावी. अशी याचिका निकालात काढली. ज्यात निर्णय देतांना काय व कोणता विचार केला हे समजणे कठीण आहे. खरं तर जो प्रयोगक्षम शिक्षक आहे. जो शिक्षक खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांसाठी कार्य करतो. त्या शिक्षकांना त्याची नियुक्ती झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी काम करीत असतांना पुरेसा वेळ मिळत नाही. तो शिक्षक टेट चा अभ्यास कसा करु शकेल? त्यातच अशी टेट पास करणं म्हणजे अभ्यास आलाच. अन् नोकरी जर टिकवायची असेल तर ते करणं गरजेचं. अशावेळेस तसा अभ्यास करीत असतांना शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत शिकवतीलच. याची शाश्वती देता येत नाही. सगळेच शिक्षक हे न्यायालयाच्या निर्णयानं टेट पास करण्यासाठी शाळेतही शिकवितांना विद्यार्थ्यांना शिकविण्याचं काम कमी व टेट अभ्यासाचं काम जास्त करतील. ज्यातून विद्यार्थी घडविण्याऐवजी त्यांचं नुकसान होईल. यावर पालक जरी कुरकूर करणारे असले तरी त्यावर शिक्षक कोणताच उपाय काढू शकणार नाही. कारण तसा न्यायालयाचाच निर्णय आहे. तसं पाहिल्यास कोण आपली नोकरी खतऱ्यात टाकणार? हाही प्रश्नच आहे.
सर्वोच्च न्यायालयांनी तशा स्वरुपाचा निर्णय दिला. कारण त्यांना शिक्षकांची कामं माहिती नसतील, असं वाटतंय. अलिकडील काळात कोणताच शाळेत शिकविणारा शिक्षक हा रिकामा राहात नाही. तो दुपारी दहाची जर शाळा असेल तरीही सकाळीच चारला उठतो. पुरेशी झोपही घेता येत नाही त्याला. त्यानंतर त्याला आपल्या जेवनाचा डबा बनवावा लागतो व शाळेत जाण्याची तयारी करावी लागतो. तसे सात आठ वाजले की तो शाळेत जायला निघतो. कारण शाळा ही दूर असते. त्यातच जेव्हा तो शाळेत पोहोचतो. तेव्हा बरीचशी कामं रखडलेली असतात. त्यातच शाळेत पोहोचताच शाळेतील परीसर स्वच्छ करण्यापासून तर शाळेची ऑनलाईन कामं करेपर्यंत शिक्षकांनाच राबावं लागतं. सकाळी शाळा भरण्यापुर्वी शिक्षक हा शाळा परीसर स्वतः स्वच्छ करतो. तो मुलांकडूनही तशी कामं करुन घेवू शकत नाही. कारण पालक ओरडतात. अलिकडील काळातील शिक्षकांना तिही कामं करावी लागतात. कारण प्राथमिक शाळेत बाबू नसतोच आणि शिपाई देखील नसतोच. त्यातच शिक्षकांना बाबू व शिपायाची कामं स्वतःच करावी लागतात. तशी दुपार झाली की विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करतांना तिही त्यालाच करावी लागते. त्यानंतर जेव्हा शाळा संपते. त्यानंतरही शिक्षकांना बसून पुरेशी उसंत घेता येत नाही. तशी उसंत घ्यायला सवडच मिळत नाही. त्याला शाळा सुटल्यावर शाळा झाडावी देखील लागते व ही वास्तविकताच आहे. त्यातच तो जेव्हा घरी यायला निघतो व घरी पोहोचतो. तेव्हाही घरात रात्रीचे सात आठच वाजलेले असतात. त्यातच तो जेव्हा सात आठला घरी पोहोचतो. तेव्हा थकलेला असतो. तरीही त्याची पर्वा न करता तो आपल्या थकलेल्या शरीरात थोडंसं त्राण आणण्यासाठी जेवन तयार करतो. ते करीत असतांना त्याला रात्रीचे दहाच वाजतात. तद्नंतर संपुर्ण कामं झाली की झोपायची तयारी होते. परंतु शिक्षकांसमोर प्रश्न असतो की जर आपण पुरेसा अभ्यास केला नाही तर आपण विद्यार्थ्यांना उद्या काय शिकवणार? त्यातच ते रात्रीच्या दहा वाजता थकलेले असतांनाही व डोळ्यात झोप येत असतांनाही आपल्या विद्यार्थ्यांसाठी ते अभ्यास करीत असतात. कारण ते खरे शिक्षक असतात. ही झाली शिक्षकांची दिवसभराची कामं. रात्री झोपायलाही त्याला अकराच वाजतात आणि उठायला चार. म्हणजेच फक्त पाच तास झोप घेत असतात शिक्षक. शिवाय त्यात बी एल ओ, निवडणूक, प्रशिक्षण ही देखील कामं असतात. आता शासन म्हणतं की शहरात न राहता अधिवासाच्या ठिकाणी राहा. परंतु असं जरी केलं तरी टेटची परिक्षा देणं शक्य नाही. कारण शिक्षक जेव्हा अपडाऊन करतो. त्या फावल्या वेळेत तो मोबाईल पाहतो. ज्यात शासनाच्या ऑनलाईन कामाचा लेखाजोखा येत असतो. त्याच ऑनलाईन कामाचे लेखेजोखे तो यावेळेस पुर्ण करीत असतो. अशावेळेस शिक्षक कुठं टेटचा अभ्यास करतील. जे शिक्षक खरे शिक्षक असतात. जे शिक्षक शाळेत बरोबर शिकवीत नाहीत. जे शिक्षक संस्थाचालकांचे नातेवाईक असतात वा जवळचे असतात. ज्यांनी शाळेत शिकवलं बरं व नाही शिकवलं बरं. अशी वस्तुस्थिती असते. त्या शिक्षकांना टेट परिक्षा कधीच अवघड वाटणार नाही व देतीलही ते. त्यातच ते चांगल्या गुणानं पासही होतीलच. यात शंका नाही. या गोष्टीची कल्पना न्यायालयाला नसेल. तशीच याचीही कल्पना नसेल की आजचे बरेचसे हाडाचे शिक्षक हे नदी, नाले पार करुन जातात. डोंगरदऱ्यात राहतात. जिथं आजही पुरेशा प्रमाणात वीज पोहोचलेली नाही. जिथं जाणं येणं करता येत नाही. जिथं सतत वाघ, सिंहासारख्या हिंस्र प्राण्यांचा सतत सामना करावा लागतो. जिथं रोजच डोंगर चढावा लागतो शिक्षकांना. सायंकाळी उतरावंही लागतं. तो डोंगरदऱ्यात शिकविणारा शिक्षक खरंच टेटची परिक्षा देवू शकेल काय? दुसरा महत्वाचा प्रश्न असा की जेव्हा अशा शिक्षकांची नियुक्ती झाली. तेव्हा त्याचं शाळेतील शिक्षण सुटलं. त्याच्या शाळेतील पात्रता परिक्षेचा अभ्यास करण्याची सवय तुटली. मग अशा तुटलेल्या सवयीनं आज जर त्याला म्हटलं की टेटचा अभ्यास करा तर ते त्याला शक्य होईल काय? हाही एक प्रश्नच आहे. याचा विचार न्यायालयानं केलेला नाही. महत्वपुर्ण बाब ही की सर्वोच्च न्यायालयाच्या या संशयास्पद निर्णयानं शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे की टेटचा अभ्यास करायचा? हा प्रश्न सर्वच शिक्षकांना पडलेला असून सर्वच शिक्षक या धाकानं संभ्रमात आहेत. त्यातच त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शिवाय आधीच शाळेत पटसंख्या नाही. ज्यासाठी त्याला चिंता आहे. ती पटसंख्या मिळवीत असतांना बऱ्याच शिक्षकांना त्रेधातिरपीट करावी लागते. त्यात या टेट परिक्षेची एक चिंता. या चिंतेनं भर टाकलेली आहे. विशेष म्हणजे टेट परिक्षा असावीच. परंतु ती सक्तीची नसावीच. तशीच ती पदोन्नतीसाठी असावी. नोकरी टिकविण्यासाठी नाही. याचा सर्वोच्च न्यायालयाने विचार करावा. विचार करावा की दिलेला निर्णय तसाच न ठेवता बदलवावा. ज्यातून कोणत्याच शिक्षकांचा संसार उघड्यावर येणार नाही. शिवाय त्यांची लहान लहान मुलं व त्यांच्या पत्नीचंही पोटपाणी त्याचेवर अवलंबून असतं. तेही बंद होणार नाही. त्यामुळंच याचा जरी न्यायालयानं विचार केलेला नसेल तरी तो करावा म्हणजे झालं व तसा निर्णय न्यायालयानं वेगळ्या स्वरुपात घेतलाही असेल तरी त्यात फेरबदल करुन शिक्षकांच्या वाढलेल्या चिंतेवर मलम लावण्याचे काम न्यायालयानं करावे. जेणेकरुन जे शिक्षक वर्गात चांगलं शिकवितात. त्यांच्यात न्यायालयाबद्दल विश्वास निर्माण होईल. जर असं झालं नाही तर उद्या कोणताच व्यक्ती शिक्षक बनायला पुढे सरसावणार नाही. शिक्षक बनणारच नाही. कारण त्यांनाही वाटेल की शासन जसं शिक्षकांना छळणारं वेळी अवेळी पत्र काढतं. जे न्यायालयात दाद मागून बदलवता येतं. तेच पत्र न्यायालयात काढत असल्यानं आपली नोकरी अर्ध्यावर धोक्यात येते व आपली अवस्था ही अर्ध्यावरती डाव मोडिला अशी होते. त्यापेक्षा नोकरी न करता एखादा कामधंदा केलेला बरा.
विशेष म्हणजे टेटची परिक्षा शिक्षकांसाठी असावी की असू नये. ती कोणासाठी असावी की कोणासाठी नसावी. याबाबतचे निर्णय हे शासनानं घ्यायचे असतात व ते बरोबर आहे किंवा नाही यावर निकाल न्यायालय देत असतात. ते निर्णय रद्दबातल करीत असतात. परंतु या निर्णयानं न्यायालयानं पहिल्यांदाच शिक्षकांच्या शिकविण्यावर प्रश्नचिन्हं लावलेले असून शिक्षकामुळंच देश सुरळीत चालत आहे. देशाचा कारभार तसेच न्यायालयाचाही कारभार सुरळीत चालत आहे. शिक्षक जर नसले तर देशाची व न्यायालयाची अवस्था ही अनागोंदीची होवून देश संपुर्णपणे रसातळाला जाईल यात शंका नाही. तेव्हा टेट परिक्षेत न्यायालयानं टाकलेल्या अटी बदलविणं ही काळाची गरज असून न्यायालयाला जरी टेट परिक्षा योग्य वाटत असली तरी ती प्रत्येक शिक्षकांच्या जीवावर बेतणारी आहे व शिक्षकांच्या आत्महत्या करविणारी बाब आहे. ज्याला जबाबदार असेल न्यायालयच. जरी न्यायालयानं दिलेला निर्णय योग्य असला तरीही.
सृष्टी त्यावर विचार करीत होती. विचार होता की ही टेट परिक्षा या उतारवयात आपण पास होवू शकणार नाही. कारण या वयात साधा पेन कुठं ठेवला, ते आठवत नाही. मग एवढ्या प्रश्नांची उत्तरं कुठून आठवणार? त्याच विचारात तिला झोप येत नव्हती. तशी इतरही बर्याच शिक्षकांना झोप येत नव्हती. जे तिच्याच समकक्ष वयातील होते.
अन्न निर्माण करणारा स्रोत नष्ट नाही ना होणार? तिचा प्रश्न. कारण न्यायालयानं तिच्यासमोर प्रश्न निर्माण केला होता. जणू ती विचार करीत करीत खंगत चालली होती.
शिक्षक वनस्पतीसारखा अन्न निर्माण करणारा स्रोत. चंद्र सुर्यालाही ग्रहण लागतं. तसं पृथ्वीलाही ग्रहण लागतं. तसा टेट परिक्षेचा निकाल म्हणजे शिक्षक नावाच्या पृथ्वीला लागलेले ग्रहणच.
सुर्य हा स्वयंप्रकाशित असून तो पृथ्वीच नाही तर संबंध सृष्टीलाच प्रकाश देतो. त्याचेवरच सर्व जीवांचं अस्तित्व अवलंबीत असून तो आहे, म्हणून सर्व जीव जीवंत आहेत व अस्तित्वातही आहे. तो जसा पृथ्वीला प्रकाश देतो. तसाच तो प्रकाश देतो, चंद्रालाही. ज्यानुसार चंद्रही प्रकाशमान झालाय. तशी पृथ्वीही प्रकाशमान. पृथ्वी ही स्वयंप्रकाशित नाही तर तिला सुर्यापासून प्रकाश मिळतो व त्याच प्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती स्वतःच स्वतःचं अन्न तयार करतात.
शिक्षक हा पृथ्वीसमान आहे. तो विद्यार्थ्यांना शिकवतो व त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभे करतो अर्थात असा विद्यार्थी घडवतो की आपल्या पायावर उभा राहू शकेल व एखादा उद्योगधंदा करुन वा नोकरी करुन आपलं पोट पालवू शकेल. जणू पृथ्वीसारखा. हा शिक्षक म्हणजे पृथ्वी व ते विद्यार्थी म्हणजे पृथ्वीवर असलेल्या वनस्पती. खरं तर शिक्षकही तसाच आहे पृथ्वीसारखाच. तोही स्वतः ज्ञान मिळवून प्रकाशित झालेला असला तरी त्याला प्रकाशित केलंय ते शासनरुपी सुर्यानं. त्यानुसार शिक्षक हा ज्ञानरुपी पृथ्वी ठरतो. तो सर्वच मानवजातीला आपल्यातील ज्ञानरुपी कणानं उभारी देतो. आपल्यातील ज्ञानात्मक शिकविण्यानं तो संबंध जनतेला अन्न मिळवून देतो नव्हे तर त्यांचं पोट भागवतो. तो आहे, म्हणून सर्वांना दिव्य ज्ञान आहे व त्या ज्ञानाचा वापर करुन आपल्या सर्वांना पोट भरता येतं. निष्कर्षही काढता येतो.
शासन रुपी सुर्य केवळ ज्ञानरुपी पृथ्वी नावाच्या शिक्षकांनाच प्रकाश देत नाही तर न्यायालयरुपी चंद्रालाही प्रकाश देत असतो. परंतु जसे सुर्याच्या किरणाला अडविणारे ओझोन वायूचे थर हे पृथ्वी व चंद्राच्याच माध्यमातून तयार होतात. ते ओझोन वायूचे थर सुर्याचा प्रखर प्रकाश पृथ्वीवर पोहोचू देत नाही. तीच भुमिका कधीकधी शिक्षक व न्यायालय करीत असतात. ज्यावेळेस शासनाकडून अन्याय होतो तेव्हा. मात्र आजच्या टेट परिक्षेच्या निर्णयानं चंद्रच कोपला असल्याचं दिसत असून चंद्र हा पृथ्वीच्या अतिशय जवळ आलाय, असं वाटतंय. ज्यानुसार त्याच्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती ही पृथ्वीपेक्षा जास्त झालीय. ती आता समुद्रात त्सुनामी आणून संबंध पृथ्वीच बुडवून टाकते की काय असंच वाटायला लागलं आहे. कारण शिक्षक असतील तर ज्ञान असेल. अन् ते जर नसतील तर ज्ञानही नसेल. हे तत्वज्ञान पृथ्वी, चंद्र व सुर्य जेव्हापासून अस्तित्वात आले. तेव्हापासून अस्तित्वात आहे. आज हेच शिक्षकांच्या बाबतीत साकार होत असल्याचे दिसत आहे. चंद्ररुपी न्यायालय, जे वर्षानुवर्ष महिन्यानुसार चंद्राच्या पौर्णिमा, अमावश्या आणण्यासारखे व पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण निर्माण करुन समुद्रात भरती, ओहोटी आणून पृथ्वीला मदत करीत होते. त्याच चंद्ररुपी न्यायालयानं आज शिक्षकांच्या आयुष्यात जास्तच डोकावून पाहात त्यांनी पृथ्वीरुपी शिक्षकांच्या आयुष्यात टेट परिक्षा आणून त्सुनामी आणलेली आहे. त्यामुळंच आता संबंधित पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वच जीवांना चिंता लागली आहे की आता कसं होणार? तसं पाहिल्यास शिक्षक नावाची पृथ्वी बऱ्याच वर्षांपासून आंदोलनरुपी ओझोनचे थर निर्माण करीत होती व शासनाकडून येणाऱ्या कामाच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करीत होती. त्यात शासनरुपी सुर्यानं आपली आणखी क्षमता वाढवीत त्यात ऑनलाईन नावाच्या आणखी एका अतिनील किरणांची भर टाकलेली आहे. ज्या किरणांची तीव्रता एवढी आहे की पृथ्वीनं निर्माण केलेल्या ओझोन वायुच्या थराला छिद्र पडलेय. कारण आता ऑक्सिजनची निर्मिती जास्त प्रमाणात होत नाही. त्याचं कारण आहे कॉन्व्हेंट. कॉन्व्हेंट नावाचा प्लॉस्टीकचा कचरा निर्माण झालेला असून तो विचारांच्या आगीनं जाळला जातोय रोजच. ज्यातून प्रदुषण निर्माण झालंय व ओझोन वायुच्या थराला छिद्र पडलंय. आता जी ऑनलाईन नावाच्या अतिनील किरणांची निर्मिती झाली आहे. तिची तोड नाही. ज्यातून शासनरुपी सुर्याचा प्रकाश जास्त प्रमाणात पृथ्वीवर पोहोचणार. असं वाटतंय. त्यातच टेट परिक्षा नावाचं न्यायालयरुपी चंद्रानं सोडलेलं गुरुत्वाकर्षण हे तर वाखाणण्याजोगंच आहे. आता काय होणार? ज्याप्रमाणे सुर्याची उष्णता, चंद्राचं गुरुत्वाकर्षण त्यातच चंद्राचं पृथ्वीच्या जवळ येणं. पृथ्वीच्या कामात ढवळाढवळ करणं. पृथ्वीला स्वतःच्या क्रिया करु न देणं. स्वतःची आपल्यातील प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून अन्न निर्मिती करु न देणं. त्यातच ऑक्सिजनची निर्मिती करु न देणं. या गोष्टी पृथ्वीच्या नक्कीच विनाशाच्या गोष्टी दर्शवितात.
चंद्र, सुर्य व पृथ्वी. हे तीन महत्वपुर्ण घटक. हे पृथ्वीवरील संपुर्ण जीवाला जगविण्याचं काम करीत असून तेच घटक पृथ्वीवर वारा, पाणी आणतात. कधी पृथ्वीवर अतिवृष्टी होते तर कधी पृथ्वीवर वादळं निर्माण होतात.
पृथ्वीवर वादळं व पाऊस कसे निर्माण होतात? हा एक महत्वपुर्ण प्रश्न आहे व तो कुणालाही पडेलच. त्याचं उत्तर आहे, सुर्य हा प्रकाश देणारा महत्वपुर्ण घटक असून तो पृथ्वीच नाही तर संबंध घटकालाच प्रकाश देत असतो. तो घटक चंद्र व पृथ्वीलाही प्रकाश देतो. हा सुर्य जेव्हा पृथ्वीला प्रकाश देत असतो. तेव्हा त्यात असलेल्या प्रचंड उष्णतेनं पाण्याची वाफ होते व ही वाफ वर आकाशात जाते. ती जेव्हा आकाशात जाते. तेव्हा ती थंड होते व त्याचे बाष्पात रुपांतर होते. हे बाष्पाचे कण हवेत तरंगत असतात. त्याचं कारण असतं, गुरुत्वाकर्षण. त्या बाष्पांचं वर जाताच चंद्राचं गुरुत्वाकर्षण खेचून ठेवतं व हवा ही जड असल्यानं हवाही त्यांना खाली येवू देत नाही. वाफेचे बाष्पात रुपांतर झाले की ते बाष्पाचे कण हे जड असल्यानं हवेच्या दाबानं हलत असतात. ज्यातून पाऊस पडू शकतो.
हवेची निर्मिती कशी होते? हा एक प्रश्न आहे. हवा ही स्थिर राहात नाही. ती हलतांना वा वाहतांना का दिसते? हा दुसरा प्रश्न. त्याला कारण आहे चंद्र. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतांना दर पौर्णिमेला तो पृथ्वीच्या अगदी जवळ येतो. ज्यातून समुद्राला भरती येवून समुद्रातील पाणी वर येवून हवेवर दाब टाकत असतो. ज्यातून हवा दाबली जाते व दाब निर्माण होतो. याला हवेचा दाब म्हणतात. ज्यातून हवेवर पाण्याचा दाब निर्माण झाला की हवा अधू भागात सरकते. अर्थात हवेची हालचाल होते. त्यातच हवेचे सुर्याच्या उष्णतेनं गरम होणे व तिचे थंड होणे, अर्थात हवेचं आंकृचन प्रसरण होणे. यातून हवेची निर्मिती होते. शिवाय पाऊस कसा पडतो? हे सांगत असतांना एवढंच सांगता येईल की ज्यावेळेस पृथ्वीभोवती फिरतांना एखाद्यावेळेस चंद्र जेव्हा पृथ्वीच्या अगदी जवळ येतो. तेव्हा समुद्रात जास्त भरती येते व वादळं निर्माण होतात. चंद्र जर पृथ्वीच्या अधिक जवळ असेल किंवा सुर्याचे अधिक तीव्र ऊन्हं पृथ्वीच्या एखाद्या भागावर पडत असेल तर पृथ्वीवर त्सुनामी सुद्धा येवू शकते. ज्यातून अति तीव्रतेचं वादळ तयार होवू शकते. अन् याच वाऱ्यानं जेव्हा बाष्पाचे थंड झालेले कण वाहात असतात व ते एकमेकांवर जेव्हा आदळतात. तेव्हा ढगफुटीही होते. तसेच या बाष्पाच्या मोठ्या कणांचे तुकडे होवून ते पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणानं पृथ्वीकडे येत असतात. हे बाष्पाचे कण बर्फ रुपात असतात. ते पृथ्वीला जसे लगत येतात. तेव्हा ते पृथ्वीच्या जवळ येत असतात. अन् जवळ आले की पृथ्वीच्या लगतच्या अति उष्णतेनं ते पिघलतात. त्यातच त्या कणाचं पाण्यात रुपांतर होवून पाऊस येतो.
पृथ्वीवर सुर्याचे पडणारे किरण हे सारख्या प्रमाणात पडत नाहीत. काही ठिकाणी त्याला बाष्परुपी ढग अडवत असतात. ज्यातून सुर्याचा प्रकाश तेवढ्या भागावर पडत नाही. साहजिकच तेवढ्या भागात ऊन नसतेच. त्यातच ज्या भागावर ऊन असते. त्या भागातील तापमान हे वाढते व त्या भागातील हवा ही जास्त गरम होवून तिचं आकारमान वाढते व ती थंड असणाऱ्या भागाकडे वाहात असते. साहजिकच त्यानं हवेचा दाब वाढतो. ज्या दाबाचा परिणाम वर असलेल्या बाष्पाच्या ढगांना धकलण्यात होतो. तसंच सुर्य, चंद्र व पृथ्वीच्या फिरण्यानंही उष्णता निर्माण होत असते, या सर्व प्रकारच्या गोष्टीचा परिणाम पृथ्वीवर वातावरणाची निर्मिती करण्यात होतो. म्हटलं व मानलं जातं की सुर्य हा आगीचा एक प्रचंड गोळा आहे. त्यावर हेलिअम आहे, जे हेलिअम हायड्रोजन वायूच्या कितीतरी पट आहे. जो जळतो. परंतु तो सहजच जळत नाही तर त्याला जाळलं जातं. मग कोण जाळतो त्या हेलिअमला. साहजिकच त्याचं उत्तर असेल सुर्याभोवती फिरणारे इतर ग्रह. ते कसे जाळू शकतात? त्याचं उत्तर आहे, सुर्याचं स्थिर असणं व त्याभोवती इतर ग्रहांचं कमीअधिक प्रमाणात फिरणं. ज्यातून उष्णता निर्माण होवून साहजिकच हेलिअम जळेल. हीच क्रिया घडते सुर्यावर हेलिअम जाळण्याची. साहजिकच हेलिअम जळतो व सुर्य हा आगीचा गोळाच वाटतो. हेलिअम सुर्यावर सतत जळत असतो. कारण सुर्याभोवती फिरणारे ग्रह हे सतत फिरत असतात. ते आपलं कार्य तसूभरही थांबवत नाहीत. ज्याचा परिणाम नव्हे तर दुष्परिणाम पृथ्वीवरील वातावरणावर होत असतो. त्यातच जेव्हा चंद्र व सुर्य यामध्ये चंद्र येतो, तेव्हा सुर्यग्रहण होतं व सुर्य येतो तेव्हा चंद्रग्रहण.
अलिकडेच अशीच व्यथा टेट परिक्षेनं शिक्षकांच्या जीवनात केलेली आहे. शासन नावाचा सुर्य वेगवेगळी कामं लादून शिक्षकांचा छळ करीत असून त्याला आता चंद्र नावाचं न्यायालयही छळू लागलेलं आहे, टेट परिक्षा आणून. हे टेट नावाचं वादळच आहे की ज्यातून शिक्षकांचं जगणं असह्य करुन टाकलंय. असंच जर चालत राहिलं तर एक दिवस ही पृथ्वीच अशा प्रकारानं नष्ट होईल हे तेवढंच खरं. कारण जो अन्ननिर्मिती करणारा घटक आहे. तो घटक टेट परिक्षेनं बेकार होणार आहे व त्याला असलेलं ज्ञान हे त्याच्या टेट परिक्षा नापास होण्यानं व्यर्थ जाणार आहे. महत्वपुर्ण बाब ही की न्यायालय रुपी चंद्रानं आपली भुमिका बदलवून शिक्षकरुपी पृथ्वीचं संरक्षण करावं. जेणेकरुन पृथ्वी नष्ट होण्यापासून वाचेल. तशीच पृथ्वीवरील जीवसृष्टीही शाबूत राहिल यात शंका नाही.
सृष्टीलाही तेच वाटत होतं. वाटत होतं की हा सुप्रीम कोर्टाचा निकाल. ज्याला आव्हान देता येत नाही. हं, आंदोलन तेवढं करता येतं. परंतु आंदोलन जरी केलं तरी उपाय हा निघणारा नाही. कारण तो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे.
दिवसरात्र टेट परिक्षेबाबत आंदोलनाचा विचार करणारी सृष्टी. टेटच्या आधारावर भविष्यात येणाऱ्या संकटाची वाट पाहात होती. विचार करीत होती की काल याच शिक्षण क्षेत्रातील एक शालार्थ आयडी घोटाळा वर काढून शिक्षकांचा गुन्हा नव्हता तरी त्याला छळलं आणि आता टेट परिक्षा आणून शिक्षकांच्या नोकऱ्या हिसकावून घेत आहेत.