त्याच सिक्रेट फक्त अविनाश ला माहित होत. त्यामुळे तो त्याच्या मागे washroom मध्ये आलेला.
निखिल च्या डोळ्यात पाणी बघून अविनाश बोलला चील यार ती काय out of India nahi जात आहे
आता पुढे.....
इथे चार तासावर तर आहे मुंबई. तुला वाटलं तर तू कधीही जाऊन तिला भेटू शकतोस ना? आणि शिवाय रोज तिला मेसेज करत जा व्हिडिओ कॉल कर म्हणजे ती तुझ्यापासून लांब आहे असं तुला वाटणार नाही.
त्यावर निखिल ने फक्त हम्म असा हुंकार भरला.
अविनाश - चल आता बाहेर जाऊया आणि हा पडलेला चेहरा जरा नॉर्मल कर. मी जातो पुढे तू सुद्धा लवकर ये.
निखिल - हो तू पुढे हो मी आलोच.
मग निखिल ने स्वतःचा चेहरा पाण्याने धुतला त्याला थोड फ्रेश वाटलं. चेहऱ्यावर हसरे भाव ठेवून तो टेबल जवळ आला. सगळ्यांनी मस्त गप्पा मारत खाणं संपवलं आणि आर्या ला बाय बोलून निघाले. सगळ्यांनी आर्या कडून नेहमी टच मधे राहण्याचं प्रॉमिस घेतलं. निखिल ने जाताना आर्या ला मिठी मारली. त्याच्या अशा अचानक वागण्याने आर्या गोंधळली. तिला काय रिॲक्ट व्हावं तेच कळलं नाही. निखिल आता बाजूला झाला आणि आर्याचा हात हातात घेऊन तिला म्हणाला तुला कधीही कशाचीही गरज लागली तर मला सांगायचं. तिथे तू एकटी आहेस अस अजिबात समजू नकोस मी तुझ्या सोबत नेहमी आहे हे कायम लक्षात ठेव. ..
आर्याने हो मध्ये मान डोलावली तिला निखीलच इतक भाऊक होन जरा विचित्र वाटत होत. म्हणजे तिच्या सगळ्या फ्रेंड्स पेक्षा निखिल ला तिच्या जाण्याचा जास्तच फकर पडतोय अस तिला वाटत होत.
निखिल ने तिला side hug केलं आणि कायम टच मधे रहा असं सांगून निघाला. खरं तर त्याचा पाय निघत न्हवता पण जर आणखी थोडा वेळ थांबला तर त्याला त्याच्या भावना कंट्रोल करता आल्या नसत्या म्हणून तो निघून गेला.
आर्या आणि मेघा ने एकदा एकमेकींकडे आणि नंतर निखिल गेला त्या दिशेला पाहिल.
ह्याला काय झालं ? मेघा ने आर्या ला विचारलं. त्यावर आर्याने माहित नाही या आविर्भावात मान डोलावली. मग दोघीने डोक्यातले विचार झटकले आणि स्कूटी वरून घरी निघाल्या. आर्याने मेघाला तिच्या घरी सोडलं तिला घट्ट मिठी मारून बाय बोलली आणि घरी निघाली. वाटेत तिला निखिलच वागणं आठवलं, तिला आज तो थोडा विचित्रच वाटला, मग तिने डोक्यातले विचार झटकले आणि ड्राईव्ह करू लागली.
घरी आल्यावर आईने तिला जेवण वाढू का अस विचारलं पण ती बाहेर खाऊन आल्यामुळे भूक नाही अस सांगून तिच्या रूम मधे निघून गेली. तिच्या रूम कडे बघून तिला भरून येत होत. तिच्या सगळ्या आठवणी होत्या ह्या रूम मधे. उद्या पासून आपण इथे नसणार ह्या विचारांनी तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती एक एक वास्तूवर हाथ फिरवत अख्ख्या रूमभर फिरत होती. तिच्या सगळ्या हालचाली बाबा दारातून पाहत होते. त्यांनी तिला आवाज दिला. बाळा आत येऊ का?
आर्याने बाबांना पाहिल आणि डोळ्यातलं पाणी पुसून म्हणाली बाबा अहो परमिशन कसली मागताय? या ना...
श्रीधर राव आत आले त्यांनी आर्याला जवळ घेतलं. आर्या लगेच त्यांच्या कुशीत शिरली.
श्रीधर राव - माझी परी खूपच हळवी आहे.
आर्या फक्त मुसमुसत होती. तिला वाईट वाटत होत.
श्रीधर राव - बाळा अग अस काय करतेस? इतक मनाला लाऊन घेण्यासारख काय आहे ह्यात? आपण थोडीच कायमचे मुंबईला जात आहोत? जस आता ट्रासफर झाली तशी नंतर ही होऊच शकते ना?
कोणास ठाऊक परत पुणे Branch मिळाली तर...
बाबांचं बोलणं ऐकून आर्याच्या तोंडावर smile आली. बाबा खरच अस होईल?
त्यावर बाबांनी होऊ शकत अस उत्तर दिलं.
आर्या हिरमुसली, होऊ शकत म्हणजे फक्त शक्यता होती खात्री नाही. तिचा पडलेला चेहरा बघून बाबा बोलले..
बरं ठीक आहे जेव्हा केव्हा तुला तुझ्या फ्रेन्ड ची खूप आठवण येईल तेव्हा मी तुला पुण्याला घेऊन येईन मग तर झालं?
त्यावर आर्या खुश झाली तिने लगेच बाबांना मिठी मारली आणि म्हणाली चालेल बाबा thanks you so much. I love you.
श्रीधर - बर चल झोप आता खूप उशीर झालाय. उद्या सकाळी लवकर निघायचं आहे.
आर्यांनी होकारार्थी मान हलवली. बाबा तिला गुड नाईट बोलून त्यांच्या रूम मधे गेले. बाबांशी बोलून आर्याला बरंच हलकं वाटत होत. ती तशीच बेडवर पडली. थोड्या वेळाने तिला झोप लागली.
दुसऱ्या दिवशी पहाटे देसाई कुटुंब मुंबई साठी रवाना झालं. आर्यचं मन उदास झालं होत आईने तिचा उदास चेहरा बघून तिला कुशीत घेतलं आणि म्हणाली बाळा जसे इथे तुझे मित्र मैत्रिणी होत्या तश्या तिथेही होतील. थोडा वेळ जाईल पण तुझ्या गोड स्वभावाने तू तिथेही तुझे असेच चांगले फ्रेंड्स बनवशील खात्री आहे मला. त्यामुळे जास्त उदास चेहरा करू राहू नको. आर्याने हो मधे मान डोलावली आणि डोळे मिटून आईच्या कुशीत झोपून राहिली.
दुपारी एक वाजता ते सगळे लोक त्यांच्या मुंबईच्या घरी पोहचले होते. घर पाहून आर्या खुश झाली.
तिच्या पुण्यातल्या घरा एवढ मोठ न्हवत पण छान असा 2bhk होता. आर्यासाठी बाबांनी मास्टर बेडरूम दिलेली. कारण मास्टर बेडरूम ला बाल्कनी होती त्यात बाबांनी झोपाळा लाऊन घेतला होता. कारण तिला झोपाळा खूप आवडायचा.
पुण्याला ती तासनतास झोक्यावर बसून असायची. कधी अभ्यास करत, कधी पुस्तक वाचत, कधी गाणी ऐकत तर कधी अशीच. झोपला पाहून आर्या खुश झाली आणि लगेचच जाऊन बसली आणि झोका घेऊ लागली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून बाबांना समाधान मिळालं.
दुपारचं जेवण बाबांनी बाहेरूनच मागवलं. जेवण करून सगळ्यांनी थोडा आराम केला आणि संध्याकाळी सगळ समान व्यवस्थित लावलं. आर्याने तिच्या खोलीत समान लावून खोली छान सजवली.
तिच्या फ्रेंड्सचा ग्रुप फोटो सुद्धा तिने टेबल वर ठेवला, त्याला पाहून तिचे डोळे पाणावले पण तिने स्वतःला सावरलं आणि आईची मदत करायला किचन मधे गेली. आर्या आणि बाबांच्या मदतीने आईने सगळ घर व्यवस्थित लावलं. सगळेच खूप थकले होते.
रात्रीच जेवण झाल्यावर सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले. दिवसभराच्या दगदगी मुळे त्यांना लगेच झोप लागली.
सकाळी सात वाजता आर्या ला जाग आली. आज तिला कॉलेज मध्ये जायचं होत सगळ्या फॉर्मलिटी कंप्लीट करायला. तिने तिचं आवरलं आणि आईला मदत करायला किचन मध्ये गेली...
आर्या - good morning आई.
आई - good morning बाळा.
आर्या - काही मदत करू का आई?
आई - नको अगं झालंच आहे. मी नाश्ता घेऊन जाते बाहेर तू चहा घेऊन ये..
आर्याने चहा कप मधे ओतला आणि बाहेर टेबल वर ठेवला. सगळ्यांनी मिळून नाश्ता केला.
आर्याला मुंबई ची जास्त ओळख न्हवती म्हणून तिच्या बाबांनी तिला कॉलेज ला सोडलं आणि नंतर ऑफिसला गेले..
आर्याने कॉलेज मध्ये सगळ्या फॉर्मलिटी केल्या. दोन दिवसांनी कॉलेज चालू होणार होत. आर्या स्कूटी ने घरी आली.
दुपारी आईसोबत गप्पा मारत जेवण केलं. तिने आईला जायला सांगून किचन मधलं आवरलं आणि तिच्या रूम मधे गेली. झोपल्यावर बसून मस्त गाणी ऐकत बसली होती. तेवढ्यात तिच्या मोबाईल मधे निखिलचा मेसेज आला.
निखिल - Hi!
आर्या - hello! कसा आहेस?
निखिल - मी मस्त. तू कशी आहेस? कशी वाटली मुंबई?
आर्या - मी सुद्धा मस्त. आणि मुंबई छान आहे पण मला इथे करमत नाही. कोणीच नाही ओळखीचं.
निखिल - होईल हळूहळू ओळख. बाकी कॉलेज कधी पासून सुरू होणार आहे?
आर्या - परवा पासून.
निखिल - ओके. काळजी घे. काही लागलं तर मला बिनधास्त कॉल कर.
आर्या - हो. चल बाय.
निखिल - बाय. टेक केअर.
.....................,...........................
दोन दिवस असेच निघून गेले. उद्या पासून कॉलेज सुरू होणार होत. आर्याने तिची तयारी आदल्या रात्रीच करून ठेवली होती. नवीन कॉलेज नवीन लोक तिला थोड दडपण आलेलं. तिने तिच्या मनाची तयारी केली होती. रात्री विचार करत करत कधी तरी तिला झोप लागली.
सकाळी अलार्म वाजला तशी आर्या उठली. तिने तिचं आवरलं आणि बाहेर आली. देवाला नमस्कार केला आणि किचन मधे आली.
आज आईने तिच्या आवडीचे थालीपीठ केलं होत. किचन मधे जाताच थालीपीठचा सुगंध आर्याच्या नकात शिरला. तिने आईला मिठी मारली आणि म्हणाली wow आई आज खूप दिवसांनी थालीपीठ बनवलं.
आई - हो. तुला आवडत ना म्हणून आज मुद्दाम केलं. आज तुझा कॉलेज चा पहिला दिवस आहे तर म्हटलं माझ्या लाडूबाईच्या आवडीचा नाश्ता बनवूया.
आर्या - thank you आई. खूप छान झालंय वाह! आर्या एक तुकडा तोंडांत टाकत बोलली.
आई - अगं इथे उभ राहून काय खातेस? जा बाहेर जाऊन टेबल वर बस आणि पोटभर खा.
आर्या - हो.
आई - आर्या आज तू एकटी जाशील ना? की बाबांना सांगू तुला सोडायला?
आर्या - नको आई मी जाईन एकटी. तसही फार लांब नाही आहे अर्ध्या तासात पोहचेन मी. बाबांना उगाच त्रास होईल त्याचं ऑफिस दुसऱ्या बाजूला आहे. मी जाईन माझी माझी.
आई - बर ठीक आहे. सावकाश जा आणि पोहचली की कॉल कर.
आर्या - हो आई.
आर्यानी नाश्ता संपवला आणि कॉलेज साठी निघाली. रस्त्यात तिची गाडी एका सिग्नल जवळ थांबली होती तेवढ्यात तिच्या बाजूला एका मुलाने त्याची बाईक थांबवली.
आर्याने एक चोरटा कटाक्ष त्याच्या बाईक वर टाकला. लेटेस्ट मॉडेल ची व्हाइट कलर ची बाईक होती. नवीनच वाटत होती एकदम. बाईक बघता बघता तीच लक्ष त्याच्या गोऱ्या हाताकडे गेल. त्यावरच ब्रँडेड वॉच आणि त्यानंतर असलेल्या टॅटू मुळे तिला एकदा त्याच तोंड पहायची इच्छा झाली.
ती बघणार इतक्यात सिग्नल सुटला आणि त्याची गाडी पुढे निघून गेली. तीच मन उगाच खट्टू झालं मग तिने मनातले विचार झटकले आणि गाडी स्टार्ट केली.
.....,................,...................... ............................................
To be continued.....