Without you... - Part 5 in Marathi Love Stories by swara kadam books and stories PDF | तुझ्याविना... - भाग 5

Featured Books
Categories
Share

तुझ्याविना... - भाग 5

रोहन - मस्त नजारा आहे ना?
गंधार - हम्म. 

रोहन हसायला लागला. त्याच्या हसण्याने गंधार भानावर आला आणि आता आपण काय माती खाल्ली याची जाणीव त्याला झाली. त्याने रोहन कडे रोखून बघितलं आणि म्हणाला लेक्चर मधे लक्ष दे.

आता पुढे.....

रोहन - अरे माझं लक्ष लेक्चर मधेच आहे. पण तुझं मात्र न्हवत हे मी खात्रीने सांगतो.   

गंधार - गप्प बसतोस का आता?

रोहन - ओके बॉस. 

गंधार ला आता आपण काय विचार करत होतो याचा राग आला. नाही गंधार तुझं ध्येय नेहमी लक्षात ठेव. तुला विचलित होऊन चालणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीत तुला पडायचं नाहीय. गंधार ने डोक्यात आलेले सगळे विचार झटकले आणि संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं....

दोन लेक्चर नंतर रेसेस झाली. गंधार आणि रोहन बाहेर कॅन्टीन मधे निघून गेले. ह्यावेळी गंधार ने मुद्दाम आर्या कडे बघणं टाळलं. आर्या एकटीच बसली होती तिला पाहून एक मुलगी तिच्या शेजारी आली...

मुलगी - Hi! मी वैशाली.

आर्या - hello. मी आर्या.

वैशाली - तिने हात पुढे करून विचारलं.  फ्रेंड्स?

आर्या - आर्या ने सुद्धा तिच्या हातात हात देत फ्रेंड्स म्हणाली.

वैशाली - मी तुझ्या शेजारी बसू का?

आर्या - अगं विचारतेस काय? बस ना. तस पण मला एकटीला खूपच बोर होतय.

वैशाली - ठीक आहे मी आज पासून तुझ्या शेजारी बसेन.
माझे अजून सुद्धा फ्रेंड्स आहेत. आमचा चौघांचा ग्रुप आहे. पण ते तिघे बाहेर गेलेत म्हणून आले नाहीत. उद्या आले की तुझी ओळख करून देते.

आर्या - हो चालेल.

वैशाली - चल बाहेर जाऊया. तुला कॅन्टीन दाखवते. इथल सँडविच खूप छान आहे टेस्टला. माझं फेवरेट आहे. चल जाऊया खायला.

आर्या - अगं मी येतानाच नाश्ता करून आलेय मला भूक नाही. तू जाऊन ये.

वैशाली - एकटी?

आर्या - त्यात काय झालं?

वैशाली - एकटीला खूप बोर होत यार, जाऊदे मी पण नाही जात. आपण इथेच बसूया.

आपल्यामुळे ती उपाशी राहील हा विचार करून आर्या तिला म्हणाली चल जाऊया. मी येते तुझ्या सोबत. माझं कॅन्टीन बघून सुद्धा होईल आणि  तू सँडविच खा. त्यावर वैशाली खुश झाली आणि तिला side hug करत thank you म्हणाली.

आर्या - अगं thanks काय त्यात?

वैशाली - मला खरच खूप भूक लागली आहे ग. पण एकटीला नाही आवडत मला जायला. नेहमी आम्ही सोबत जातो ना  सगळे...

आर्या - बर चल आता जाऊया नाहीतर रिसेस संपेल.
वैशाली - हो चल जाऊ. 

आर्या आणि वैशाली कॅन्टीन मधे आल्या. वैशालीने तिची ऑर्डर दिली आणि दोघी येऊन एका टेबल वर बसल्या.  बऱ्याच स्टूडेंट च्या नजारा आर्या वर होत्या. बरेच जण तिला वळून वळून बघत होते. आणि आपापसात कुजबुजत होते...

आर्याला बघून दोन मुले येऊन नेमके गंधार आणि रोहन जवळच्या टेबल वर बसले आणि बोलू लागले.

पहिला मुलगा - कोण होती रे ती?

दुसरा मुलगा - नवीन ॲडमिशन आहे वाटत.

पहिला मुलगा - हम्म. भारी आहे पण.  बोलूया का तिच्याशी?

दुसरा मुलगा - वेड लागलंय का तुला? ती कोणासोबत आहे ते तरी बघ. ती महामाया वैतागली ना तर आपली काही खैर नाही.

पहिला मुलगा - हो रे. कसली डेंजर आहे ती. पण आज एकटी कशी?   बाकीचे कुठे आहेत?

दुसरा मुलगा - मी PA आहे का त्यांचा? मला काय माहित? आणि सोड तो विषय. 

पहिला मुलगा - हम्म. कधीतरी एकटी असेल तेव्हा बोलायला पाहिजे.  कसली भारी आहे यार हसताना कसली गोड दिसतेय उफ्फ...मैत्री तर मी करणारच कोणी सांगाव नात मैत्रीच्या पलीकडे गेल तर?

त्या दोघांच बोलण गंधार आणि रोहन ऐकत होते त्यांना कळलं ते कोणाबद्दल बोलत आहेत ते. गंधार ला हे सगळ ऐकून राग येत होता पण का ते अजून त्यालाही माहीत न्हवत.

रोहन मात्र आर्या कुठे आहे ते शोधू लागला. आणि एका टेबल वर त्याला आर्या आणि वैशाली दिसले. त्याने लगेच वैशालीला हाक मारली आणि हाथ हलवून इथे या बसायला अस सांगितलं.

गंधार ने रोहन कडे डोळे मोठे करून बघितलं. त्यावर रोहन ने असूदे रे काही होत नाही. आपल्याच क्लास मधे आहे मैत्री करायला काय हरकत आहे? तशी पण नवीन आहे ती कॉलेज मध्ये.

गंधार ने नकारार्थी मान हलवली आणि त्याच त्याच खाऊ लागला.आर्या आणि वैशाली त्यांच्या टेबल वर आले आणि वैशालीने डोळ्यानेच त्याला काय झालं अस विचारलं.

रोहन - काही नाही ग. सहज बोलावल तुम्ही दिसलात म्हणून. बसा ना तुम्ही. तसे त्या दोघी बसल्या, आर्याने एकदा गंधार कडे बघितलं तो त्याच त्याच खात होता. त्याने वर बघायचे पण कष्ट केले नाहीत. आर्याने मनातच त्याला खडूस म्हटलं आणि रोहन आणि वैशाली सोबत बोलायला लागली.

रोहन - आर्या तू अस लास्ट इयर साठी कस addmission घेतलंस?

आर्या - अरे माझे बाबा गवर्नमेंट employee आहेत. त्यांची ट्रान्स्फर इथे झाली.... बाबा मला एकटीला पुण्याला सोडून यायला तयार न्हवते. आणि काकांच्या ओळखीने इथे addmission पण मिळत होत म्हणून मग आले मी इथे.

रोहन - अरे वाह! तू पुण्याची आहेस का?  माझं आजोबांचं घर आहे पुण्याला. मी नेहमी जात असतो.

आर्या - हो का? चांगल आहे मग.

रोहन - हम्म. आज तू एकटी कशी काय? त्याने वैशाली कडे बघून विचारलं.

वैशाली - अरे आमचा प्लॅन होता बाहेर जाण्याचा ऐन वेळी माझं कॅन्सल झालं मग ते तिघे गेले.

रोहन - ohh! अच्छा. बाकी सुट्टी कशी गेली?

रोहन, वैशाली आर्या बोलत होते. गंधार मात्र गप्प होता. इतक्या वेळात तो एक शब्दही बोलला नाही की त्यांच्याकडे बघितलं नाही.

आर्याला त्याचा राग पण येत होता किती attitude आहे ह्याला ती मनातच बोलली. पण नंतर तिला आठवलं आपल्यामुळे सकाळी त्याच शर्ट खराब झालं असेल म्हणून कदाचित रागावला असेल.  म्हणून तिने पुन्हा एकदा सॉरी बोलायचं ठरवलं.

आर्या -  हा.. हाय.. तिने हळूच त्याला आवाज दिला. पण त्याने मात्र तिच्याकडे बघितलं नाही त्याच लक्ष मोबाईल मधे होत.  तिने परत आवाज दिला excuse me. त्यावर गंधार ने तिच्याकडे काय या आविर्भावात बघितलं. 

आर्या - ते सकाळ साठी सॉरी. माझं लक्ष न्हवत चालताना अणि चुकून तुला धक्का लागला. 

गंधार - हम्म. तो फक्त एवढच म्हणाला आणि पुन्हा डोक मोबाईल मधे घातलं. 

आता आर्याला त्याचा जास्तच राग आला. काय समजतो हा स्वतःला? इतका attitude दाखवतोय जसा काय मोठा हिरोच आहे. हुं आर्याने तोंड मुरडल.

आणि इथे गंधार तिचा आवाज ऐकून स्तब्ध झाला होता. मघाशी त्याच लक्ष न्हवत पण आता ती त्याच्याशी बोलत होती तर तिचा गोड आवाज त्याच्या कानात जादू करत होता.

ती काय बोलतेय हे त्यांच्या कानात तर गेल पण मेंदू पर्यंत पोहचलं नाही. त्याला तिच्याशी बोलायचं होत पण त्याच्या तोंडून शब्दच फुटत न्हवता.

त्याने फक्त हम्म केलं आणि परत मोबाईल मधे बघत बसला. त्याला अचानक काय होत होतं हे त्यालाच समजत न्हवत. काहीतरी नवीन भावना होती ती. खूप वेगळी खूप गोड पण नेमकं काय ते मात्र माहित न्हवत.

ती अजून का बोलत नाही आहे काही असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याच्या विचारांवर तो चमकला. तो रागाने उठला आणि रोहन ला बाय करून निघून गेला.

रोहन, वैशाली आणि आर्या थोडा वेळ बोलून कॅन्टीन मधून निघाले. ते तिघ क्लास मधे आले. रोहन ने विषय काढला पण गंधार ने त्याला तिथेच अडवल आणि अभ्यास करत बसला. नंतर बाकीचे लेक्चर अटेंड करून सगळे निघाले.

आर्या ने तिची स्कूटी स्टार्ट केली आणि कॉलेज मधून निघाली घरी येऊन ती तिच्या रूम मधे गेली. फ्रेश होऊन बाहेर हॉल मधे येऊन आईसोबत गप्पा मारत बसली.

आई - काय ग कसा गेला कॉलेज चा पहिला दिवस?

आर्या - चांगला होता आई. माझी आज एका मुलीशी मैत्री झाली वैशाली नाव आहे तिचं. खूप छान आहे स्वभावाने. आणि रोहन नावाचा मुलगा आहे त्याच्याशी पण ओळख झाली तो सुद्धा ठीक आहे पण त्याच्या सोबत जो मुलगा होता ना एक नंबर का खडूस आहे इतका attitude आहे ना त्याला. मला खूप राग आला त्याचा कोण समजतो स्वतःला काय माहित. इडियट कुठला. हुं आर्याने तोंड मुरडल.

आई - काय ग काय झालं? पहिल्याच दिवशी भांडलीस की काय कोणाशी?

आर्या - भांडली नाही ग आई माझ्याकडून एक चूक झालेली फक्त...
आई - काय झालं?

त्यावर आर्याने घडलेला सगळा प्रकार आईच्या कानावर घातला. आणि ते सगळ आठवून परत गंधार ला काही बाई बोलू लागली. आईला आर्यचं बोलण ऐकून हसू आलं. आईला हसताना बघून आर्याला अजूनच राग आला.

आर्या - आई तू हसतेस माझ्यावर? माझी चूक झाली म्हणून मी  त्याला सॉरी बोलली आणि त्याने काय केलं?

आई - अगं बाळा  मी तुझ्यावर नाही हसत आहे पण तू अशी पहिल्यांदा चिडचिड करतेयस ते पाहून हसायला आलं. तुला कधीपासून एवढा फरक पडायला लागला? हे बघ ज्यांना तुझ्याशी मैत्री करायची असेल ते करतील ज्यांना नसेल आवडत ते नाही करणार. त्यात एवढ मानलं लावून घेण्यासारखं काय आहे?  त्यापेक्षा जे तुझे मित्र झालेत त्यांच्याशी मैत्री वाढव म्हणजे तुझं मन रमेल आणि तुला तुझ्या जुन्या मित्रांची कमी भासणार नाही.

आर्या - हम्म..

आई - चल आता जेवून घेऊया मला फार भूक लागलीय. 

आर्या - हो चालेल. तू बस मी ताट वाढून घेऊन येते आपल्यासाठी.

......,.............................................,..................

हॅलो फ्रेंड्स. आजचा भाग कसा वाटला ते समीक्षा देऊन नक्की कळवा. स्टोरी कशी वाटतेय ते सुद्धा सांगा. मला फॉलो करायला विसरू नका..