आर्या - हम्म..
आई - चल आता जेवून घेऊया मला फार भूक लागलीय.
आर्या - हो चालेल. तू बस मी ताट वाढून घेऊन येते आपल्यासाठी.
आता पुढे.....
जेवून झाल्यावर आर्या रूम मधे आली. सकाळी लवकर उठल्यामुळे तिला झोप येत होती. तिने आपलं अंग बेडवर झोकून दिलं आणि निद्रेच्या अधीन झाली..
इथे गंधार सुद्धा त्याच्या घरी पोहचला होता. त्याची आजी बाहेर गार्डन मधे झोपल्यावर बसली होती. गांधारला बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्यांनी प्रेमानी त्याला हाक मारली आणि गंधार त्यांच्याकडे वळला...
गंधार - आजी इथे काय करतेस?
आजी - काही नाही रे असच जरा वाऱ्यावर बसले होते. घरात बसून बसून कंटाळा आला होता म्हणून.
गंधार - का? आज आजोबा कुठे गेले?
आजी - अरे ते कुठे थांबतात घरी? ते गेलेत त्यांच्या मित्रांसोबत बाहेर..
गंधार - ह्या वेळी?
आजी - नाही रे बराच वेळ झाला. आता यायला हवेत.
गंधार - हा म्हणूनच तू बाहेर बसलीस ना ? आजोबांची वाट बघत. ते आज तुला चिडवायला घरात नाही म्हणूनच तुला करमत नसेल घरात...गंधार आजी ला चिडवत म्हणाला.
आजी - खूपच आगाऊ झाला आहेस आजी त्याच्या पाठीत थपडा मारत म्हणाल्या..
गंधार - हम्म. तुमचीच कृपा. बरं चल आत जाऊया.
गंधार आजीला घेऊन आत आला. तिला सोफ्यावर बसवून तो त्याच्या रूम मधे फ्रेश होण्यासाठी निघून गेला. शर्ट काढताना त्याला सकाळचा क्षण आठवला जेव्हा आर्याच्या धक्क्याने त्याचा शर्ट ओला झाला होता त्यावेळच आर्यांच त्याला एकटक पाहण नंतर कॅन्टीन मधे तीच त्याच्याशी बोलणं.. सगळ आठवून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली.
आज पहिल्यांदाच अस काहीतरी होतंय तो मनातच म्हणाला आणि तिचा निरागस चेहरा आठवत होता. ह्या सगळ्यात तो कितीवेळ शॉवर खाली होता त्याच त्यालाच कळलं नाही. दारावर जेव्हा टकटक झाली तेव्हा तो भानावर आला. आणि अंग पुसून कमरेला टॉवेल बांधून बाथरूम च्या बाहेर आला. बाहेर पार्थ त्याची वाट पाहत होता.
पार्थ - अरे किती वेळ दादा? अंघोळ करत होतास की मस्करी? कधीचा आवाज देतोय मी, कशात हरवला होतास इतका?
गंधार - तुझ काय काम होत का?
पार्थ - आईने जेवायला बोलावलाय तेच सांगायला आलो होतो.
गंधार - तू पुढे हो मी आलोच.
लवकर खाली ये सगळे थांबलेत तुझ्यासाठी अस बोलून पार्थ निघतच होता की त्याच्या कानावर गंधार चा आवाज पडला गंधार आरशात बघत गाण गुणगुणत होता.
पहिली नजर मे
कैसा जादू कर दिया
तेरा बन बैठा है
मेरा जिया
जाने क्या होगा
क्या होगा क्या पता
इस पल को मिलके
आ जी लें ज़रा
मे हुं यहाँ, तु हे यहाँ
मेरी बाहों में आ...
गंधार गाता गाता थांबला, त्याच लक्ष पार्थ वर गेल जो आ वासून सध्या त्यालाच बघत होता.
गंधार ने डोळ्यानेच त्याला काय झालं विचारलं त्यावर तो गंधार जवळ आला आणि त्याच्या कपाळाला हात लावून हाथ उलट सुलट करून बघत होता. त्यावर गंधार ने वैतागून त्याला विचारलं काय करतोय?
पार्थ - दादा तू बारा आहेस ना? काही होतय का तुला?
गंधार - मला काय झालंय? मी अगदी व्यवस्थित आहे.
पार्थ - मग आज चक्क तू गाण गातोयस? कस काय? आणि आज तुझा मूड पण वेगळाच वाटतोय. खरं खरं सांग आज अस काय झालंय?
त्याच्या बोलण्याने गंधार थोडा बावराला पण लगेच भानावर आला आणि पार्थ ला हाताला धरून बाहेर घेऊन गेला आणि म्हणाला मला जाब विचारण्या पेक्षा स्वतःच्या अभ्यासावर लक्ष दे नाहीतर आईला सांगेन तुझे सगळे कारनामे. आणि त्याच्या चेहऱ्यावर दार लाऊन घेतलं.
पार्थ घाबरला तो बाहेरूनच दारावर थाप मारत बोलत होता
पार्थ - अरे यार दादा मी मस्करी करत होतो. तू तर सिरीयस झालास. मी फक्त सहज विचारलं. एवढी कुठली हिम्मत माझी की The गंधार कारखानीस ला जाब विचारेन. I am sorry तू प्लीज आईला काही बोलू नकोस.
गंधार - आता गेला नाहीस तर नक्कीच सांगेन.
पार्थ - जातो बाबा जातो. पण तू लवकर ये.
गंधार हो म्हणाला आणि आरशात बघत केस विंचरू लागला. त्याच्या मनात आर्यांचा विचार आला त्याने डोळे बंद करून उघडले का तिचा विचार करतोय मी अस बोलत त्यांनी कंगवा जोरात टेबल वर फेकून दिला आणि changing रूम मधे निघून गेला.
त्याने रागारागाने कपाटातील कपडे घेतले. ट्रॅक पँट आणि टीशर्ट घालून तो खाली डायनिंग टेबल वर येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर राग दिसत होता त्याच कारण वेगळं होत पण पार्थ ला वाटलं त्याच्यामुळेच त्याचा दादा चिडलाय.
त्याने गंधार ला कोपर मारत सॉरी ना दादा अस म्हटलं. गंधार ने its okay बोलत चेहरा नॉर्मल केला आणि जेवू लागला.
जेवून झाल्यावर सगळे लिव्हिंग रूम मधे बसले होते. गांधारला आजीला चिडवायचा मूड झाला त्याने लगेच आजोबाना विचारलं.
गंधार - आजोबा तुम्ही जास्त वेळ बाहेर राहत नका जाऊ.
आजोबा - का रे? अस का बोलतोयस?
गंधार - अहो आजीला करमत नाही तुमच्याशिवाय. तुम्ही बाहेर गेला होतात म्हणून ती भर उन्हात बाहेर थांबली होती तुमची वाट पाहत.
आजोबा - काय ग खर बोलतोय का हा?
आजी - त्याच काय ऐकता तुम्ही. मला घरात करमत न्हवत म्हणून बाहेर जाऊन बसलेले. आजी उगाच सावरसावर करत बोलल्या
आजोबा - हम्म तरीच म्हटलं एवढं आमच नशीब कुठलं की बाहेर गेल्यावर घरी येण्यासाठी बायकोने वाट पाहावी. त्यावर सगळे हसायला लागले
आजी - हम्म. राहुदे म्हणे नशीब. मी होते म्हणून टिकले तरी तुमच्यासोबत. दुसरी असती ना एखादी मग तुम्हाला कळलं असत. तुम्हाला तुमच्या मित्रांपुंढे काही दिसत का?
आजोबा - मग विचारलं तेव्हाच सांगायचं ना वाट बघत होते म्हणून. त्यात लाजायच काय? आणि चिडायला काय झालं? आता तू नाही माझी वाट पाहणार तर काय हेमा मालिनी पाहणार आहे का?
आजी - तोंड पहिलाय का आरशात? म्हणे हेमा मालिनी वाट बघणार आहे का. ती कशाला वाट बघतेय तुमची तिला काही काम नाहीत का दुसरी? हुं आजीने तोंड फिरवलं.
देवा काय वाकड केलं होत मी तुझं की ह्यांच्या सोबत लग्न लाऊन दिलंस माझं?
आजोबा - भोग भोगल्या शिवाय माणसाला मुक्ती मिळत नाही. 😄 देवाने काहीतरी विचार करूनच मला पाठवलंय तुझ्या आयुष्यात.
आजीने आजोबांकडे रागाने पाहिल आणि माझ्याशी बोलू नका अजिबात अस बोलून रूम मधे निघून गेली.
दिवसातून दहा वेळा तरी बोलत असतेस बोलू नका बोलू नका म्हणून पण माझ्याशी भांडल्या शिवाय तुला करमणार आहे का? आजोबा सुद्धा आजीच्या मागे रूम मधे गेले.
कशाला त्यांना चिडवत असतोस रे? आईने गंधार ला दटावलं. अगं आई त्या दोघांची लुटुपुटूची भांडण बघितल्या शिवाय माझा दिवस जात नाही म्हणून मी आजीला सतावत असतो. हम्म जा आता तू सुद्धा जाऊन आराम कर. आईने गंधार ला सांगितले.
गंधार, पार्थ दोघंही आपापल्या रूम मधे निघून गेले. रूम मधे जाऊन गंधार ने बुक्स काढले आणि वाचत बसला.
.............................
दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन तो कॉलेज ला निघाला. रोहन ने त्याला बाहेरच थांबायला सांगितलं होत म्हणून तो रोहन ची वाट बघत बाहेरच थांबला होता.
तेवढ्यात आर्या स्कूटी ने त्याला गेट मधून आत येताना दिसली. ब्लॅक कलर चा फ्लॉवर प्रिंट वन पीस घालता होता तिने. केस मोकळे सोडले होते. एका हातात वॉच आणि दुसऱ्या हातात नाजुकस ब्रेसलेट होत. ओठाला लिपस्टिक आणि डोळ्यात काजळ. इतकाच मेकअप केला होता तिने. एकदम बाहुली सारखी वाटत होती. ती गाडी पार्क करत होती आणि गंधार एकटक तिलाच बघत होता.
मोबाईल च्या रिंग मुळे तो भानावर आला. रोहन चा मेसेज होता.त्याने वाचून मोबाईल खिशात ठेवला आणि बघितलं तर बरीचशी मुलं फक्त आर्यालाच बघत होती. गंधार ला त्यांचा राग येत होता पण जास्त राग आर्यांचा येत होता.
ही कॉलेज ला आलीय की पार्टीला? एवढ तयार होऊन यायची काय गरज आहे? आणि ह्या सगळ्यांना मुलींना बघण्याशिवाय दुसरी काही काम नाहीत का? तो तसाच रहात तिथल्या कट्ट्यावर बसला.
तो फक्त आर्यालाच बघत होता. तिने गाडी पार्क केली आणि वैशाली ची वाट पाहत तिथेच थांबली. थोड्याच वेळात वैशाली तिथे आली आणि त्या दोघी आत निघून गेल्या.
वैशाली - ohh My god! आज काही special आहे का?
कमाल दिसतेय आज.
आर्या - हो आहे सांगते नंतर.
वैशाली - ok. चल तुला सगळ्यांशी ओळख करून देते. त्या दोघी क्लास मधे आल्या. हा आहे मंदार, ही सानवी, आणि हा अंश. तिनी सगळ्यांची ओळख करून दिली आर्याला. आर्या पण सगळ्यांना हॅलो बोलत हात मिळवत होती. तिने जेव्हा अंशाच्या हातात हात दिला तेव्हाच गंधार आणि रोहन क्लास मधे आले. त्याने ते पाहिल आणि रागात त्याच्या जगावर जाऊन बसला...
..............,.. ............
To be continued.....