Santachya Amrut Katha - 3 in Marathi Motivational Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | संताच्या अमृत कथा - 3

Featured Books
  • Gangster Innocent Wife - 4

    --- Gang of Black Eagle – Chapter 4Royal Mirage का massacre...

  • कश्मकश

    रात का सन्नाटा पूरे शहर को ढक चुका था। घड़ी की सुइयाँ बारह ब...

  • अनुबंध - 3

    ---   अनुबंध – एपिसोड 3     शादी का दिन आखिरकार आ ही गया थ...

  • कॉलेज लव स्टोरी

    अध्याय 1: पहली मुलाक़ातदिल्ली यूनिवर्सिटी का पहला दिन।नए स्ट...

  • नशा ( प्रेमचंद)

    ईश्वरी एक बड़े ज़मींदार का लड़का था और मैं एक ग़रीब क्लर्क क...

Categories
Share

संताच्या अमृत कथा - 3

4 संत चोखामेळा.                                                                    संत चोखामेळा.                                                            चोखामेळा हे विठ्ठलभक्त होते. ते पंढरीत राहत असून जातीने महार होते. दररोज भीमेचे स्नान करुन  पांडुरंगाच्या मंदिराला प्रदिक्षणा घालाव्या हा त्यांचा नित्यक्रम होता. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्याचा आपला अधिकार नाही म्हणून ते बाहेरूनच पंढरपूरचे पांडुरंगाचे दर्शन घेत असत.     एकदा चोखोबा महाद्वारात बसला असता त्याला पाहून काही लोक म्हणाले " विठोबाचे तुझ्यावर प्रेम असते तर त्याने तुला मंदिरात नेेले असते तुला तर पांडुरंग दिसत नाही तर तू विनाकारण त्याची भक्ती का करतोस? "  त्यावर चोखोबा म्हणाले     "पांडुरंगाने दर्शन देण्याइतकी माझी लायकी नाही सूर्य दूर असला तरी तो जसा कमळीनीचे  संरक्षण करतो तसा विठ्ठल माझे संरक्षण करतो" लोकांच्या बोलण्याचे दुःख झालेला चोखोबा घरी गेले आणि विठ्ठलाचे नामस्मरण करीत बसले. तो उदास झाला हे पाहून रात्री पांडुरंग त्याच्याकडे गेले. श्री विठ्ठलाने चोखोबाला हाताला धरून मंदिरात नेले. विठ्ठल आणि चोखामेळा यांच्यात जो संवाद ( गोष्टी) झाला तो दारात झोपलेल्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी हीं संवाद ऐकला. मग ते एक साक्षीदार आणून ते आत गेले. तर तेथे त्यांनी पाहिले की "कुलुप असताना तु आत कसा आला?" याबाबत ते चोखामेळाला विचारणा करू लागले. देवाला विटाळ झाला असा पुजारी विचार करु लागले असतानाच  " तु मंदिरात कुलूप असतांना कसा गेला? " असा प्रश्न त्यांनी चोखोबाला विचारल्यावर चोखोबा म्हणाले "मला पांडुरंगाने हाताला धरून आणले. आता तुम्ही मला क्षमा करा." परंतु त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करीत चोखामेळाला शिक्षा करायचे ठरविले. शिक्षा करण्याकरिता म्हणून त्याला चंद्रभागेच्या तीरावर राहण्यास सांगितले. या देवळाच्या समोर दीपमाळ बांधले व तेथे ते राहु लागले. एकदा झाडाखाली जेवायला बसला असता पांडुरंग त्याच्याबरोबर जेवायला आला देवळाचा पुजारी काही कामासाठी तिकडे आला होता. तो पांडुरंगाचा हा चमत्कार दुरून पाहत होता. चोखामेळाची  पत्नि त्यांना वाढत असताना तिच्या हातून घाडगे फुटले. अन त्यामुळे देवाचा पितांबर खराब झाला. चोखामेळा म्हणाला " त्या झाडावर एक कावळा बसला होता त्याला दुसऱ्या फांदीवर जाऊन बस" असे चोखोबा म्हणाले ते ऐकून पुजार्याला  वाटले, चोखोबांनी आपल्याला उद्देशून कावळा म्हटले. म्हणून पुजाऱ्याने त्याच्या श्रीमुखात मारली आणि विटाळ  झाला म्हणून चंद्रभागेत अंघोळ केली. देवळात आल्यावर त्याला देवाच्या पितांबर दह्याने  भरलेला दिसला व देवाचे डोळे डोळे पाणावलेले व देवाचा गाल सुजलेला होता हे पाहून पुजारी ब्राह्मण मनात खजील झाला. तो  चोखोबाला शरण गेला त्याने चोखोबाला हाताला धरून देवळात आणले देव भक्तांची भेट झाल्यावर देवाचा उजलेला गाल सूज उतरून नेहमीसारखा पूर्ववत झाला. त्या दिवशीपासून चोखोबा नित्यनेमाने देवळात जाऊ लागला.   संत चोखामेळा यांची पत्नी गरोदर होती दिवस सरत आले होते पत्नी म्हणाली " तुम्ही  तुमच्या बहिणीकडे जा व त्यांना बाळंतपणासाठी घेऊन या" संत चोखोबा बहिणीला आणायला गेले जाता जाता विश्रांतीसाठी झाडाखाली थांबले. नामस्मरण करता करता समाधी लागली.  या अवस्थेत  किती वेळ गेला हे त्यांनाही कळले नाही. इकडे पत्नीला असंख्य वेदना होऊ लागल्या. पांडुरंगाला काळजी पडली. पांडुरंगाने चोखामेळ्याच्या बहिणीचे रूप घेतले व घरी आले. चोखामेळाच्या पत्नीने विचारले " कसे आलात वन्स? " त्यावर वन्सचे रूप घेतलेल्या पांडुरंगाने उत्तर दिले " दादाने निरोप पाठवला म्हणून मी आले." बाळंतपणाची सर्व व्यवस्था पांडुरंगाने केली. इकडे चोखोबा समाधीतुन जागे होऊन भानावर आले. आपण बहिनीला आणायला चाललो आहोत याचे त्यांना स्मरण होऊन ते बहिणीच्या घरी जाऊन बहिणीला घेऊन चोखोबा आले. तर पत्नी सुखरूप बाळंत झालेली पाहून त्यांनी विचारले, " अग कोणी केले तुझे बाळंतपण?" पत्नी म्हणाली "वन्सनी". हे ऐकल्यावर चोखोबाच्या सर्वं काही लक्ष्यात आले. अग मी तर आज आले ही कोण वन्स आणखी चोखोबाना कंठ दाटुन आला माझ्या पांडुरंगाने हे पण काम केलेे डोळ्यातून अश्रू वाहू लागले  -----           -----------------------------------------------                                                मच्छिन्द्र माळी, छत्रपती  संभाजीनगर

                   🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

              5      समर्थांचे  राम  पंचायतन 

     

              समर्थ्यांचे  राम पंचायतन.

                     आपल्यापैकी बर्‍याच जणांनी सज्जनगड पाहिला असेल. गडावर असलेले समर्थांचे समाधी मंदीर सुद्धा पाहिले असेल आणि त्यांचा राहता वाडा किंवा मठ तो देखील पाहिला असेल.

       छत्रपती संभाजी महाराजांनी केवळ पावणे दोन महिन्यांमध्ये बांधलेल्या ह्या मंदिरामध्येच वरच्या बाजूला प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती आहेत, परंतु हे मंदिर ही गडावरची सगळ्यात जुनी वास्तू नाही. तर शिवछत्रपतींनी स्वतःच्या निवासासाठी बांधलेला वाडा ही गडावरची सर्वात जुनी वास्तू आहे.

          समर्थांनी आपल्या आयुष्यातला अखेरचा महत्त्वाचा काळ सज्जनगडावरती व्यतीत केला आणि तशी त्यांना शिवछत्रपतींनी विनंती केली होती. परंतु आपल्या राहत्या वाड्यामध्ये समर्थांना मुक्कामास ठेवून घेतलेल्या शिवछत्रपतींनी गडावरती आल्यावर जेव्हा वाड्याशेजारी असलेला मोठा खड्डा पाहिला, तेव्हा त्यांनी तो खड्डा बुजवून टाकण्याची आज्ञा मावळ्यांना दिली. त्यावर श्री समर्थांनी शिवरायांना विनंती केली की कृपया तो खड्डा बुजवू नये कारण पुढे त्याचा मोठा उपयोग व्हावयाचा आहे. समर्थाचा हा दूरदृष्टी पणा राजेंना समजला नाही.

        समर्थांनी संपूर्ण भारतभरात मठस्थापना केली हे तर आपनास माहिती a त्यातील बरेचसे मठ आजच्या तमिळनाडू राज्यामध्ये आहेत. तमिळनाडूमध्ये अरणी नावाचे एक गाव आहे. येथील हातमागावर विणलेल्या आणि अक्षरशः काडीपेटी मध्ये बसेल इतकी छोटी घडी होणाऱ्या आरणीच्या रेशमी साड्या माता-भगिनींना सुपरिचित असतीलच. तेच हे अरणी गांव जिथे समर्थांचे नेहमी येणे जाणे असे. हे ठिकाण तंजावर पासून तसे जवळ आहे. तंजावर मध्ये समर्थांचे आजही सात मठ कार्यरत आहेत, असो.

         तर या अरणी गावांमध्ये पितळयापासून किंवा पंचधातूपासून देवदेवतांच्या अत्यंत सुंदर मूर्ती घडविणारे अनेक कारागीर परंपरागत राहत आहेत. आजही आहेत. 

         गुणग्राहकतेचा सदैव ध्यास असलेल्या समर्थांना निश्चितच असे वेड लागले की या सर्व मूर्तीकारांमध्ये सर्वात उत्कृष्ट कला अंगी असलेला मनुष्य कोण असेल ? तेव्हा त्यांना असे कळले की असा एक वृद्ध कारागीर तिथे आहे परंतु मूर्ती करताना उडणारे धातूचे कण डोळ्यामध्ये गेल्यामुळे त्याची दृष्टी अधू झालेली आहे त्याला अजिबात दिसत नाही त्यामुळे आता त्याने मूर्तिकला थांबविली आहे.

            समर्थांना खूप वाईट वाटले आणि त्या वृद्ध कारागिराने आयुष्यभर केलेल्या परमेश्वराच्या सेवेचे फळ म्हणून की काय साक्षात समर्थ त्यांच्या दारात जाऊन हजर राहिले. समर्थ त्या कारागिराला म्हणाले की "मला माझ्या नित्य पूजेसाठी रामाचे पंचायतन बनवून हवे आहे आणि ते तुमच्या हातूनच बनविले पाहिजे असा माझा अट्टाहास आहे". वृद्ध कारागीर रडू लागला. त्याने समर्थांना सांगितले की" हे साधू मला आता दृष्टी उरलेली नाही त्यामुळे आपली ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता नाही." यावर समर्थांनी त्या कारागिराला जे उत्तर दिले ते अक्षरशः हृदयात kaymकोरून ठेवण्या सारखे आहे.

         समर्थ त्याला म्हणाले, "अरे बाबा माझ्या प्रभूरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी या चर्मचक्षूंची अजिबात आवश्यकता नाही. तो आत्माराम तर तुझ्या माझ्या अंतरंगात वास करतो आहे. त्याचे दर्शन आपल्याला आपल्या अंत:चक्षूंनी सुद्धा होऊ शकते आणि बहुतेक रामरायाची अशी इच्छा दिसते की तुझ्या हातूनच पुन्हा प्रकट व्हावे त्यामुळे तुच त्या मूर्ती घडविणार आहेस." असे म्हणत समर्थांनी त्या कारागिराच्या डोक्यावरती हात ठेवला आणि पाहता पाहता त्याचे देहभान हरपले त्याच्यासमोर तेजाचा एक मोठा झोत दिसू लागला ! पाहता पाहता त्या तेजाच्या गोळ्याचे रूपांतर प्रभू रामचंद्राच्या अत्यंत सुंदर, मनोहर अशा मूर्तित झाले. साक्षात प्रभू रामचंद्रानीं त्या मूर्ती कारागीराला दर्शन दिले.समर्थांच्या भेटीनं त्या कारागीराला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्यानें विनाविलंब सुंदर अशा प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण व उभा असलेला दास मारुती मूर्ती साकार केल्या. त्या मूर्ती पाहून समर्थ अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी त्या कारागीराला विचारले कीं, "तूला काय हवे ते माग" त्यावर अरणीकर म्हणाला, " समर्थ आपले दर्शन झालें. आपण साक्षात प्रभू रामचंद्रांचे दर्शन मज अभाग्यास घडविले. या डोळ्यांनी आता आणखी काही पाहण्याची इच्छाच उरली नाही. त्यामुळे माझी दृष्टी पूर्ववत आंधळी करून टाकावी इतकीच प्रार्थना  म्हणजे मला त्या आत्मारामाचे चिंतनात राहता येईल." समर्थानी त्याची दृष्टी काही घालविली नाही. उलट समर्थानी त्याला आत्मदृष्टी देऊन अनुग्रहही दिला. समर्थ गडावरती आले. त्या पंचायतन मूर्ती शेजघरात ठेवून 14 दिवस त्यांनी पूजा केली. आजही त्या खोलीमध्ये सुबक कलाकुसर केलेल्या चंदनी लाकडी पाटावर आहेत. पंधराव्या समर्थ आपल्या आसनावरून खाली जमिनीवरती बसले. पद्मासन लावले. दृष्टी नासाग्री स्थिर झाली. डोळे मिटले. त्रिवार रामायणाचा जयजयकार केला. आणि त्यांच्या देहातून प्राण ज्योतीचा मोठा लोळ बाहेर पडून तो थेट त्या राममूर्तिमध्ये विलीन झाला. हे सर्वं उपस्थित शिष्यांनी स्वतःच्या डोळयांनी पाहिले तो दिवस होता माघ वद्य नवमीचा.

     मठाच्या शेजारी जो मोठा खड्डा होता तिथेच समर्थांचे दहन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी चितेच्या ठिकाणी "स्वयंभू समाधी" प्रकट झाली. त्या समाधीवरच पावनेदोन महिन्यात छ. संभाजी महाराजांनी समाधी मंदिर बांधले. समाधीच्या बरोबर वरच्या बाजूला प्रभू रामचंद्राच्या ह्याच मूर्तीची वेगळी प्राणप्रतिष्ठा केलेली नाही. कदाचित भारतातील हे असे एकमेव मंदीर असावे. ह्या मूर्ती वर्षातून पाच वेळा जागेवरून हलविल्या जातात. स्वच्छ धुतल्या जातात. या विधीला " उद्धार्चन " असे म्हणतात.

                 ********************

             मच्छिन्द्र माळी, छत्रपती संभाजीनगर.