* संत रोहिदासांची परीक्षा *
हिंदूंची पवित्र तीर्थक्षेत्रे संपूर्ण भारतभर प्रस्थापित असून अस्तित्वात आहेत. उत्तर प्रदेशातील काशी, (वाराणसी, बनारस) हे भारतातील एक सर्वोच्च धार्मिक तीर्थस्थान आहे. याच काशी क्षेत्राच्या जवळ सिरगोवर्धनपुर नावाचे गाव आहे. या गावात चर्मकार समाजाचे मोठी वस्ती होती. याच वस्तीत श्री संतोखदास व कलसा देवी नावाचे जोडपे राहत होते. त्यांना अपत्य नव्हते. एका महात्म्याने त्यांना आशीर्वाद दिला तुझ्या घरी असा पुत्र जन्म घेईन कीं ज्याच्यामुळे तुमच्या कुळाचे नाव होईल. संतोखदासला आनंद झाला. ते लगबगीने घरी आले व त्यांनी पत्नीला साधू महाराजांनी दिलेल्या आशिरवचनाचा वृत्तान्त सांगितला. पत्नी आनंदी झाली सन 13 76 मध्ये माघ पूर्णिमा रविवारच्या दिवशी कलसादेवीच्या पोटी एक बालकाचा जन्म झाला. या बालकाचे "रोहिदास" नाव ठेवले. पुढे लोक त्यांना रविदास या नावाने देखील संबोधू लागले. रोहिदास यांनी वयाच्या सातव्या वर्षिच नवविधा भक्ति आत्मसात केली हाेती. आपला चर्मकार धंदा करून उदरनिर्वाह ते भागवत असत. रोहिदासाना लहानपणापासूनच प्रभु भक्तिची आवड होती. रोहिदासाना जबाबदारीची जाणीव व्हावी त्याने सुखाचा संसार करावा म्हणुन आई वडिलांची इच्छा होती. म्हणून त्यांनी रोहिदासांचे लग्न 'लोनाबाई' यांच्याशी करून देण्याचा निर्णय घेतला. लग्न झाले पतीच्या भक्तीला लोनाबाईने कधी विरोध केलाच नाही. पती-पत्नी उदरनिर्वाहा साठी चप्पला शिवणे विकणे हे काम करू लागले. एका पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करण्यासाठी सर्व लोक गंगाकिनारी चालले होते. पवित्र गंगेत त्या दिवशी स्नान केल्याने पापाचा नाश होतो असा लोकात समज रूढ झाला होता म्हणून प्रत्येक जण गंगाजलात स्नान करण्यासाठी जात आहेत. हे पाहुन रविदासजीना देखील वाटले,आपणही जावे स्नानाला. मोठ्या आनंदाने ते गंगास्नान करण्यासाठी घाटावर जाऊ लागले. स्त्री-पुरुष मोठे साधुसंत मंडळी आली होती. लोकांची गर्दी झाली होती. रविदास ईश्वराचे नामस्मरण करत गंगेच्या पाण्यात उतरले आणि आनंदाने गंगास्नान करून लागले. त्यांना पाहून आजूबाजूचे लोक पाहूं लागले. तेथे काही ब्राह्मण पंडितहीं होते.मोठ्या उत्कंठेने ते रविदास जवळ आले व विचारणा करू लागली "आपण आपला परिचय आम्हाला सांगा,कोणत्या कुळातले आहात? हे आम्ही ऐकायला उत्सुक आहेत " रविदासजी म्हणाले "मी चर्मकार जातीचा आहे. मी हरिभक्त आहे" हे ऐकून ब्राम्हण क्रोधीत झाले. "हा चर्मकार जातीचा असून पवित्र गंगेत स्नान करतो आहे. याने हे कृत्ये करून आमचा अपमान केला असून स्वतःच्या मोठा धर्म समजत आहे." ब्राह्मणाचे बोलणे ऐकुन परमज्ञानी रविदास म्हणाले, "पंडितजी माझे ऐका एकच ब्रह्मतत्वा पासून आपण सर्वजण बनलो आहेात. आपणा सर्वांचा आत्मा एकच असून आपणा सर्वा ठायी एकच चैतन्य नांदत आहे.जर सर्व माणसे एकाच ब्रह्मतत्त्व ज्योती पासून निर्माण झाली आहे तर त्यांच्यात हा ब्राह्मण आणि हा चांभाराचा उच्च-नीच भेदभाव कसा होईल? हे पंडित जनहो हे शरीर पाच तत्वा पासून बनलेले आहे आत्मा अमर आहे तर सर्वांमध्ये आहे. सर्वं मानवाची जात मानव आहे. अन्य जाती प्रकार (जातीभेद) समजतो तो पापी आहे". तेव्हा पासुन ब्राम्हण मंडळी रविदासांचा द्वेष करू लागली. रविदास हा चांभार असून सुवर्ण लोकांना उपदेश करतो.दीक्षा देतो आणि मोक्षमार्ग दाखवतो. हा अधिकार फक्त ब्राह्मणाशिवाय इतर कोणालाही नाही. रविदास जी मंदिरात प्रभूच्या ज्या मूर्ती ठेवल्या आहेत त्याची ते रोज पूजा करतात. पूजेचा अधिकार फक्त आम्हाला आहे. अशाप्रकारे रविदासच्या विरोधात काशी नगरात प्रचार केला. एक दिवस काशीचे सर्व ब्राह्मण एकत्र येऊन काशीच्या नवाबाकडे रविदासजीच्या विरोधात तक्रार घेऊन गेले. नवाबाला सांगितले महाराज हा तर अधर्म होऊ लागला आहे.हे क्षुद्र वर्णाचे असून धर्माचे सर्व नियम तोडून भगवंताच्या मूर्तीची पूजा करू लागला आहे. एवढेच नाही तर तो लोकांना उपदेश देऊ लागला आहे. त्यामुळे धर्म भ्रष्ट होत आहे तेव्हा आपण रविदास याला समज द्यावी.आमची तक्रार आहे नवाब एक सज्जन पुरुष होता. साधुसंतांना कधी त्रास देत नव्हता नवाबाने ब्राम्हणाला धीर देत सांगितले "आता त्याला बोलावून तुम्हाला न्याय मिळवून देतो". मुसलमान असणारे नवाब मूर्तीच्या विरोधात होता. तसेच नबाबाने शिताफीने फिर्यादी आणि आरोपी या दोन्ही पक्षांसमोर एक आगळा वेगळा प्रश्न ठेवला. नवाब रविदासांना बोलू लागला "यांचे म्हणणे आहे की तुम्हाला मूर्तिपूजेचा अधिकार नाही. आपण तर आपल्या देव्हा-यात देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत त्याची आपण पूजा करत आहात हा सर्व प्रकार आम्हाला नीट समजत नाही त्यावर एक उपाय आहे आपण त्या मूर्ती गंगेच्या पैलतीरावर ठेवून द्या.तुम्ही तुमच्या प्रेम भक्तीने त्यांना स्वतःजवळ बोलवा. ज्यांच्या भक्तीने मूर्ती ज्यांच्या जवळ येतील त्यांचा पूजेचा अधिकार आहे.यावरून हे सिद्ध होईल की माणसा माणसात भेद नाही.व नबाबाने सर्वांना विचारले,"ब्रम्हवृंदानो तुम्हा सर्वांना ही परीक्षा मान्य आहे का?" यावर रविदास म्हणाले मला मान्य आहे देव तर सर्वव्यापी आहे. पंडिताना विचारले त्या पंडितानी मोठ्या खुशीने परीक्षा मान्य केली. आणि हे आमचे देव आहेत पंडितांना अभिमान होता की आपल्याला विद्या तंत्र मंत्र येतात. त्याना खात्रीने वाटत होते कीं आपल्या मंत्र सामर्थ्याने मूर्ती हालतील पण नाही मूर्ती जागच्या हालल्या नाहीत तेव्हा ते म्हणु लागले हे कलियुग आहे मुर्ति हालत नाहीत तर शांत राहुनच भक्ताला प्रसन्न होतात. नवाबला वाटले या दोन्ही पक्षकारांना खोटे करून मूर्तिपूजेला विरोध करता येईल कारण तो शेवटी मुसलमान होतान. चलाआता रेाहीदास तुमचा नंबर, त्यांनी येथील मूर्ती उचलून मोठ्या आदराने चंदनाच्या पाटावर ठेवून गंगेच्या तिरावर नेऊन ठेवल्या व प्रार्थना करु लागले. अन काय चमत्कार घडला, मुर्ति चालत त्यांच्याजवळ आल्या. हा प्रकार हे दृश्य सर्व नगरवासीयांनी पाहिले व रविदास महाराजांची माफी मागू लागले. उत्कठ व प्रमोच्च भक्ती घडते तेव्हा उच्च पातळीला पोहचतो व तो स्वतःचे भान विसरून परमेश्वरा मध्ये हरपून जातो. त्याला शुद्ध रहात नाहीत. अशी स्थिती झाली म्हणजे त्यास अनन्य भक्ती असे म्हणतात. म्हणजे खऱ्या प्रभु प्रेमाचे लक्षण आहे. या प्रकारचे प्रेम केवळ नाम भक्तीच्या द्वारे प्राप्त करता येते * * * * मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर