Santachya Amrut Katha - 2 in Marathi Motivational Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | संताच्या अमृत कथा - 2

Featured Books
Categories
Share

संताच्या अमृत कथा - 2

4 संत चोखामेळा.                                                                    संत चोखामेळा.                                                            चोखामेळा हे विठ्ठलभक्त होते. ते पंढरीत राहत असून जातीने महार होते. दररोज भीमेचे स्नान करुन  पांडुरंगाच्या मंदिराला प्रदिक्षणा घालाव्या हा त्यांचा नित्यक्रम होता. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्याचा आपला अधिकार नाही म्हणून ते बाहेरूनच पंढरपूरचे पांडुरंगाचे दर्शन घेत असत.     एकदा चोखोबा महाद्वारात बसला असता त्याला पाहून काही लोक म्हणाले " विठोबाचे तुझ्यावर प्रेम असते तर त्याने तुला मंदिरात नेेले असते तुला तर पांडुरंग दिसत नाही तर तू विनाकारण त्याची भक्ती का करतोस? "  त्यावर चोखोबा म्हणाले     "पांडुरंगाने दर्शन देण्याइतकी माझी लायकी नाही सूर्य दूर असला तरी तो जसा कमळीनीचे  संरक्षण करतो तसा विठ्ठल माझे संरक्षण करतो" लोकांच्या बोलण्याचे दुःख झालेला चोखोबा घरी गेले आणि विठ्ठलाचे नामस्मरण करीत बसले. तो उदास झाला हे पाहून रात्री पांडुरंग त्याच्याकडे गेले. श्री विठ्ठलाने चोखोबाला हाताला धरून मंदिरात नेले. विठ्ठल आणि चोखामेळा यांच्यात जो संवाद ( गोष्टी) झाला तो दारात झोपलेल्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी हीं संवाद ऐकला. मग ते एक साक्षीदार आणून ते आत गेले. तर तेथे त्यांनी पाहिले की "कुलुप असताना तु आत कसा आला?" याबाबत ते चोखामेळाला विचारणा करू लागले. देवाला विटाळ झाला असा पुजारी विचार करु लागले असतानाच  " तु मंदिरात कुलूप असतांना कसा गेला? " असा प्रश्न त्यांनी चोखोबाला विचारल्यावर चोखोबा म्हणाले "मला पांडुरंगाने हाताला धरून आणले. आता तुम्ही मला क्षमा करा." परंतु त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करीत चोखामेळाला शिक्षा करायचे ठरविले. शिक्षा करण्याकरिता म्हणून त्याला चंद्रभागेच्या तीरावर राहण्यास सांगितले. या देवळाच्या समोर दीपमाळ बांधले व तेथे ते राहु लागले. एकदा झाडाखाली जेवायला बसला असता पांडुरंग त्याच्याबरोबर जेवायला आला देवळाचा पुजारी काही कामासाठी तिकडे आला होता. तो पांडुरंगाचा हा चमत्कार दुरून पाहत होता. चोखामेळाची  पत्नि त्यांना वाढत असताना तिच्या हातून घाडगे फुटले. अन त्यामुळे देवाचा पितांबर खराब झाला. चोखामेळा म्हणाला " त्या झाडावर एक कावळा बसला होता त्याला दुसऱ्या फांदीवर जाऊन बस" असे चोखोबा म्हणाले ते ऐकून पुजार्याला  वाटले, चोखोबांनी आपल्याला उद्देशून कावळा म्हटले. म्हणून पुजाऱ्याने त्याच्या श्रीमुखात मारली आणि विटाळ  झाला म्हणून चंद्रभागेत अंघोळ केली. देवळात आल्यावर त्याला देवाच्या पितांबर दह्याने  भरलेला दिसला व देवाचे डोळे डोळे पाणावलेले व देवाचा गाल सुजलेला होता हे पाहून पुजारी ब्राह्मण मनात खजील झाला. तो  चोखोबाला शरण गेला त्याने चोखोबाला हाताला धरून देवळात आणले देव भक्तांची भेट झाल्यावर देवाचा उजलेला गाल सूज उतरून नेहमीसारखा पूर्ववत झाला. त्या दिवशीपासून चोखोबा नित्यनेमाने देवळात जाऊ लागला.   संत चोखामेळा यांची पत्नी गरोदर होती दिवस सरत आले होते पत्नी म्हणाली " तुम्ही  तुमच्या बहिणीकडे जा व त्यांना बाळंतपणासाठी घेऊन या" संत चोखोबा बहिणीला आणायला गेले जाता जाता विश्रांतीसाठी झाडाखाली थांबले. नामस्मरण करता करता समाधी लागली.  या अवस्थेत  किती वेळ गेला हे त्यांनाही कळले नाही. इकडे पत्नीला असंख्य वेदना होऊ लागल्या. पांडुरंगाला काळजी पडली. पांडुरंगाने चोखामेळ्याच्या बहिणीचे रूप घेतले व घरी आले. चोखामेळाच्या पत्नीने विचारले " कसे आलात वन्स? " त्यावर वन्सचे रूप घेतलेल्या पांडुरंगाने उत्तर दिले " दादाने निरोप पाठवला म्हणून मी आले." बाळंतपणाची सर्व व्यवस्था पांडुरंगाने केली. इकडे चोखोबा समाधीतुन जागे होऊन भानावर आले. आपण बहिनीला आणायला चाललो आहोत याचे त्यांना स्मरण होऊन ते बहिणीच्या घरी जाऊन बहिणीला घेऊन चोखोबा आले. तर पत्नी सुखरूप बाळंत झालेली पाहून त्यांनी विचारले, " अग कोणी केले तुझे बाळंतपण?" पत्नी म्हणाली "वन्सनी". हे ऐकल्यावर चोखोबाच्या सर्वं काही लक्ष्यात आले. अग मी तर आज आले ही कोण वन्स आणखी चोखोबाना कंठ दाटुन आला माझ्या पांडुरंगाने हे पण काम केलेे डोळ्यातून अश्रू वाहू लागले  ----------------------------------------------------               मच्छिन्द्र माळी, छत्रपती  संभाजीनगर